शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नवा कॅम्पस लूक हवा आहे? - हे करुन पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 4:52 PM

कॅम्पसमध्ये आपण करतो ती स्टाइल हे कायम लक्षात ठेवा; इतरांना कशाला फॉलो करता?

ठळक मुद्देकॉलेज लाइफमध्ये आपण जसे आहोत तसे जगू. नवीन वर्ष आहे, मस्त अभ्यास करू आणि जगून घेऊन कॉलेजचे फुलपाखरी दिवस. 

-निकिता महाजन

पाऊस आला. जुलैचा पहिला आठवडा आला. आता रुटीन सुरू होण्याचे, अ‍ॅडमिशनचं टेन्शन जरा बर्‍यापैकी कमी होण्याचे हे दिवस आहे. ते टेन्शन ओसरलं आणि धावपळ संपली, कागदपत्रांच्या जंजाळातून आपण बाहेर पडलो आणि चौकशी खिडक्यांसह तमाम खिडक्यांवर रांगा लावून थकलो की वाटतं, चला आता लवकर रुटीन सुरू झालेलं बरं.कधी नव्हे ते लेर कधी सुरू होतात असं होऊन जातं. अ‍ॅडमिशनचा बहर ओसरला आणि कॉलेज रेग्युलर सुरू झालं की कॅम्पसचा माहौल हवाहवासा वाटू लागतो. आणि मग कळतं आपलं कॉलेज लाइफ सुरू झालेलं आहे. ते ही कलरफुल, एकदम कुल. आणि स्टायलिश. जरी पाऊस असला आणि भिजत कॉलेजात यावं लागत असलं तरीपण प्रत्येकजण येतो किंवा येते टीपटॉपच. जरा कॅम्पसमध्ये नजर फिरवली की एकसेएक मुलंमुलं दिसू लागतात. फॅशनेबल. त्यांच्या स्टाइल्स. त्यांचा ऑरा. त्यांचा अ‍ॅटिटय़ूड. सगळंच भारी वाटतं. आणि मग आपल्याला येतो कॉम्प्लेक्स. आपण आरशात पहायला लागतो की आपण कसे दिसतोय. आपला लूक कसा मस्त करायचा. काही केलं नाही तरी मनात विचार येतोच छान प्रेझेण्टेबल रहायचा. कॉलेज सुरू होतानाच काहीजण हौशीनं नवे कपडे, नवा हेअरकट करून घेतात. मात्र तरीही आपण स्टाइल आयकॉन नाही असं वाटतंच कॅम्पसमध्ये आल्यावर.  वजन एक किलो जास्त असलं तरी  किती ती घालमेल होते अनेकींची. आणि किती तो धडपडाट बारीक होण्याचा. त्यामुळे कॅण्टिनमध्येपण जात नाही कुणी. आणि जे बारीक आहे त्यांचा जाडजुड होण्याचाही खटाटोप सुरू होतो.एक बटाटावडा खायचा, एखादं वेफर्स तोंडात टाकायचं तरी मनात केवढा गिल्ट की, काय हे किती अनहेल्दी खात सुटलोय आपण.एखादाच येतो पिंपल चेहर्‍यावर, एखादाच पांढरा केस चमकायला लागतो केसात. जरा एक शेड सावळा होतो रंग. कधीतरी थोडी कोरडी होते स्किन, कधीतरी भयानकच दिसतात केस, पिंजारलेले, अजिबात सेट न होता वार्‍यावर उडणारे.आणि हे सगळं असं झालं की, आपण कमालीचे अस्वस्थ होतो.ज्याला त्याला विचारतो, काय करू? काय केलं म्हणजे वजन चटकन कमी होईल? काय केलं म्हणजे केस पांढरे व्हायचे थांबतील? काय केलं म्हणजे एकही काळं वतरुळ नाहीच येणार डोळ्याखाली, एकही सुरकुती चेहर्‍यावर  पडणार नाही?उत्तरं तर मिळत नाहीतच; पण मनस्ताप मात्र आपल्याला चिक्कार होतो.आपल्याकडे काय खास आहे, हे राहतं बाजूलाच. गालावरचा एक पिंपल, वाढलेलं दोन किलो वजन तेवढं छळतं.!कशाला एवढं जिवाला लावून घ्यायचं?उलट सांगायचं स्वतर्‍ला. हवीये कोणाला झिरो फिगर, जमानाच गुटगुटीत असण्याच्या फॅशनचा आहे. आणि मुख्य म्हणजे फॅशन काही का असेना, आपण जे आहोत ते असे आहोत.कितीही कमी खाल्लं तरी नाही ना होत चटकन वजन कमी, मग त्यासाठी उगाच झुरत बसायचं नाही.कितीही क्रीम लावले तरी येतात ना चेहर्‍यावर एक-दोन पिंपल्स तर येतातच, जसे येतात तसे जातीलही, त्यांचे त्यांचे त्यांना काही मी फार भाव नाही देणार.म्हणजे प्रेझेंटेबल असणं असतं महत्त्वाचं; पण सतत इतरांच्या नजरेनं स्वतर्‍कडं पहाण्याची सवयच मी सोडून मी देईन.मुद्दा काय, मनात आणलं तर हे दिसण्याचे, वाढत्या वजनाचे, नकोसे लोड घेण्याची सवयच एकदाची सोडून देऊ.आणि कॉलेज लाइफमध्ये आपण जसे आहोत तसे जगू.नवीन वर्ष आहे, मस्त अभ्यास करू आणि जगून घेऊन कॉलेजचे फुलपाखरी दिवस.