Want to lose weight, but how? | वजन कमी करायचंय, पण कसं?

वजन कमी करायचंय, पण कसं?

मी स्वत: जेव्हा अगदी जाड झाले होते, त्यावेळी एक प्रकारचा न्यूनगंड मनात निर्माण झाला होता. मित्रमंडळींमध्येही चेष्टेचा विषय बनले होते. त्यावेळी कुठेही जाता येताना मनात फार भीती असायची. त्यामुळेच मी ठरवले की काहीही करून आता बारीक व्हायचेच. त्यातून मला शालेय जीवनापासून खेळांची आवड होती. म्हणूनच मी योगा आणि जिम करण्याकडे लक्ष वळवलं. मी तब्बल 27 किलो वजन कमी करून आता एकदम तंदुरुस्त झाले आहे. आता मी स्वत:च एक फिटनेस ट्रेनर असून, जाडेपणाला कंटाळलेल्यांना मार्गदर्शन करते. माङयाकडे फिटनेसविषयी तक्रार घेऊन येणा:यांना मी काही टिप्स नेहमी देते.
1. फिटनेस म्हणजे वजन खूप कमी करणो असे नाही.
2. 90 किलो वजन असणारी व्यक्ती एकदम 40 किलोवर आली तर ती फिट न होता अशक्त होते.
3. अगदीच ङिारो फिगरचा अट्टहास न धरता उंची आणि वयाच्या मानाने आवश्यक वजन असावे व अंग लवचिक होणं आवश्यक आहे.
4. चालताना धाप लागणं, खाली वाकून बसता न येणं, एखादी वस्तू उचलल्यास दम लागणं ही अनफिट असण्याची लक्षणं आहेत.
5. लठ्ठ व्यक्तींना अनेक वेळा न्यूनगंड येतो. वजन कमी होत नसते, त्यामुळे नैराश्य येऊन हार पत्करतात आणि अधिक खाणो सुरू करतात. याचा उलट परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे असं करणं टाळावं.
6. प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला शरीराची हालचाल, व्यायाम दररोज करणो आवश्यक आहे. सुरुवातीला योगा, स्ट्रेचिंग, बॉल एक्सरसाइज करावेत.
7. ग्राउंड एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं. मैदानावर सूर्यनमस्कार, जॉगिंग करणं, जम्पिंग जॅक, धावणं, फुटबॉल, व्हॉलिबॉल अशा खेळांद्वारेही शरीराची हालचाल होऊन व्यायाम होतो.
8. कोणताही व्यायाम 20 मिनिटांत होतो. त्यासाठी एक-दोन तास खर्ची करण्याची गरज नसते.
9. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60 टक्के डाएट आणि 40 टक्के व्यायाम करावा. डाएटमध्येही कोणताही पदार्थ बंद करू नये असा सल्ला मी देते. हवं ते खावं पण प्रमाणात खावे.
10. कोणताही पदार्थ पूर्णपणो चाऊन खाल्ल्यास पचन व्यवस्थित होते.
...
- रूपाली टांकसाळे
 फिटनेस ट्रेनर

Web Title: Want to lose weight, but how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.