शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

नवं आयुष्य देणारं ‘वॉकर’

By admin | Updated: March 10, 2017 16:12 IST

देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली.

 देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला  आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं.अशा प्रतिभावंतांची ही ओळख.. लेखांक : दोन#Innovationscholars- 2बिहारच्या शालिनी कुमारीचा राष्ट्रपतींकडून सन्मानबिहारच्या पटण्याची शालिनी कुमारी. लहानपणापासून ती पाहात होती आपल्या आजोबांचं पानाफुलांचं आणि गार्डनचं वेड. घरात जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी थेट आपल्या घराच्या टेरेसवरच छान बाग फुलवली. दिवसाचा त्यांचा बराचसा वेळ या बागेतच जायचा. या बागेनं त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अतिशय प्रसन्न केली होती आणि नवी ऊर्जाही त्यांना दिली होती. त्यांच्या प्रेमामुळे गच्चीवरची बागही कशी फुलून आली होती. या बागेनं अख्ख्या घरातच आनंदाचे गुलाब फुलवले होते.अचानक एके दिवशी शालिनीच्या आजोबांना अपघात झाला. त्यांचं चालणं-फिरणं बंद झालं. वॉकर घेऊन त्यांना चालावं लागू लागलं. या वॉकरच्या साहाय्यानं अंगणात तर ते फिरत, पण गच्चीवरच्या आपल्या आवडत्या बागेत जाणं मात्र त्यांचं कायमचं बंद झालं. त्याचा विषाद त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकायचा. छोट्या शालिनीला आजोबांकडे पाहून फार दु:ख व्हायचं. एवढंसं साधं वॉकर. पण ज्याच्या सहाय्यानं तुम्ही जिने चढू आणि उतरुही शकाल असं वॉकर मार्केटमध्ये का मिळू नये? त्यासाठी तिनं आणि घरातल्या लोकांनी अख्खं मार्केट पालथं घातलं, पण सगळीकडे नन्नाचा पाढा!काय करावं?आपल्यालाच काही करता येईल का?त्यावेळी ती नववीत शिकत होती.तिच्या मोठ्या भावाचा मित्र चांगलाच खटपट्या होता. सतत काही ना काही करत राहायचा. ‘आॅटोमॅटिक फूड मेकिंग मशीन’ त्यानं बनवलं होतं आणि त्याबद्दल त्याला ‘एनआयएफ’चा पुरस्कारही मिळाला होता. त्यानं शालिनीला प्रोत्साहन दिलं आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनशी (एनआयएफ) संपर्क साधायला सांगितला. ‘एनआएफ’तर्फे तरुण संशोधकांसाठी स्पर्धा घेतली जाते आणि त्यांना प्रोत्साहनही दिलं जातं. ‘एनआयएफ’च्या सांगण्यावरुन तिनं आपल्या प्रोजेक्टला सुरुवात केली. अगोदर आपली कल्पना तिनं कागदावर लिहून काढली. आपल्या आजोबांना आणि त्यांच्यासारख्या वृद्ध, अपघातग्रस्त आणि अपंग लोकांना ज्या अडचणी येतात, त्या डोळ्यांसमोर ठेवल्या. त्यांच्या सर्व समस्या कमी करू शकतील असा वॉकर कसा तयार करता येऊ शकेल यासाठीची असंख्य डिझाइन्स तयार केली. चित्रं काढली. आपली कल्पना स्पष्ट केली आणि आपला हा प्रोजेक्ट दिला ‘एनआयएफ’कडे पाठवून.आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार हजार प्रवेशिकांमधून शालिनीचा हा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आणि तरुण संशोधकांसाठीचा ‘इग्नाइट’ पुरस्कारही तिला मिळाला. ‘एनआयएफ’ एवढ्यावरच मात्र थांबलं नाही. त्यांनी शालिनीची ही आयडिया आणखी डेव्हलप केली. वेगवेगळ्या डिझाइन्सचे आणखी काही आराखडे तयार केले. या वॉकरसाठी स्वस्त आणि दर्जेदार असं कुठलं मटेरिअल वापरता येईल यासाठीच्या चाचण्या घेतल्या आणि शालिनीच्या कल्पनेतलं वॉकर प्रत्यक्षात तयारही केलं. या वॉकरचं पेटंट शालिनीला मिळावं आणि बाजारात हे उत्पादन लोकांना उपलब्ध व्हावं यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. नागपूरच्या एका उत्पादकानं व्यापारी तत्वावर त्याचं उत्पादनही सुरू केलं. अशा प्रकारची दहा हजार वॉकर्स तयार करायचा संकल्प त्यांनी केला आहे. शालिनीच्या कल्पनेनुसार तयार झालेलं हे वॉकर अतिशय आगळंवेगळं आणि अगदी लहान मुलापासून कोणालाही ते वापरता येईल असं आहे. या वॉकरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अ‍ॅडजस्टेबल आहे. चार पायांच्या या वॉकरचे पुढचे दोन पाय कोणत्याही प्रकाराच्या चढउतारासाठी अ‍ॅडजेस्टबल असे आहेत. ‘स्प्रिंग लोडेड सेल्फ लॉकिंग सिस्टीम’ त्यात आहे. त्यामुळे केवळ जिने चढणं उतरणंच नाही, तर चढ-उताराच्या जमिनीवरही हे वॉकर अत्यंत उपयुक्त आहे. या वॉकरला घंटी आहे. अंधारातही ते वापरता यावं यासाठी दिव्याची सोय आहे. एवढंच नाही, तर थकल्यावर बसता यावं यासाठी फोल्डेबल सिटची सोयही त्यात केलेली आहे. या वॉकरचं डिझाईन तयार करताना शालिनीनं या सर्वच गोष्टींचा अगदी बारकाईनं विचार केला होता.या वॉकरचं वजन आहे केवळ चार किलो, पण शंभर किलोपर्यंतचं वजन हे वॉकर सहजपणे पेलू शकतं. जिन्यावरही हे वॉकर सटकत नाही आणि पडण्याची भीती अजिबात नाही. कोणाच्याही साहाय्याशिवाय एकट्यानं हे वॉकर कुणीही वापरू शकतं. वृद्ध, लहान मुलं, अपंग, अपघातामुळे शरीराचा खालचा भाग पंगू झालेले अपघातग्रस्त, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण, आजारी व्यक्ती, वृद्धाश्रमातील लोक, पुनर्वसन केंद्रं, ज्याठिकाणी लिफ्टची सोय नाही अशा जागा, बहुमजली इमारती.. अशा अनेक ठिकाणी आणि लोकांसाठी हे वॉकर अत्यंत उपयोगी आहे. एवढंच नाही, अविकसित भाग आणि विकसनशील देशांतील लोकांसाठीही हे अतिशय स्वस्त आणि मस्त वॉकर मोठी देण ठरणार आहे. शालिनीनं जे काही केलं, त्याबद्दल तिला स्वत:ला कोणताच गर्व नाही. माझ्या आजोबांसाठी अ‍ॅडजस्टेबल वॉकर तयार करण्यासाठी मी धडपडले, पण लाखो लोकांना त्याचा उपयोग होणार आहे, याचा मला खूपच आनंद आहे, असं शालिनी नम्रपणे सांगते. शालिनीच्या या संशोधनामुळे वेगवेगळ्या पुरस्कारांनी तर तिचा गौरव झालाच, पण थेट राष्ट्रपतींची पाहुणी म्हणून राष्ट्रपती भवनातही परवाच तिचा सत्कारही झाला.

- प्रतिनिधी