शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नवं आयुष्य देणारं ‘वॉकर’

By admin | Published: March 23, 2017 9:30 AM

बिहारच्या पटण्याची शालिनी कुमारी. लहानपणापासून ती पाहात होती आपल्या आजोबांचं पानाफुलांचं आणि गार्डनचं वेड.

 पाटण्याच्या शालीनीची कल्पक कमालबिहारच्या पटण्याची शालिनी कुमारी. लहानपणापासून ती पाहात होती आपल्या आजोबांचं पानाफुलांचं आणि गार्डनचं वेड. घरात जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी थेट आपल्या घराच्या टेरेसवरच छान बाग फुलवली. दिवसाचा त्यांचा बराचसा वेळ या बागेतच जायचा. या बागेनं त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अतिशय प्रसन्न केली होती आणि नवी ऊर्जाही त्यांना दिली होती. त्यांच्या प्रेमामुळे गच्चीवरची बागही कशी फुलून आली होती. या बागेनं अख्ख्या घरातच आनंदाचे गुलाब फुलवले होते.

अचानक एके दिवशी शालिनीच्या आजोबांना अपघात झाला. त्यांचं चालणं-फिरणं बंद झालं. वॉकर घेऊन त्यांना चालावं लागू लागलं. या वॉकरच्या साहाय्यानं अंगणात तर ते फिरत, पण गच्चीवरच्या आपल्या आवडत्या बागेत जाणं मात्र त्यांचं कायमचं बंद झालं. त्याचा विषाद त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकायचा. छोट्या शालिनीला आजोबांकडे पाहून फार दु:ख व्हायचं. एवढंसं साधं वॉकर. पण ज्याच्या सहाय्यानं तुम्ही जिने चढू आणि उतरुही शकाल असं वॉकर मार्केटमध्ये का मिळू नये? त्यासाठी तिनं आणि घरातल्या लोकांनी अख्खं मार्केट पालथं घातलं, पण सगळीकडे नन्नाचा पाढा!काय करावं काही सूचत नव्हतं. त्यावेळी ती नववीत शिकत होती.

तिच्या मोठ्या भावाचा मित्र चांगलाच खटपट्या होता. सतत काही ना काही करत राहायचा. ‘आॅटोमॅटिक फूड मेकिंग मशीन’ त्यानं बनवलं होतं आणि त्याबद्दल त्याला ‘एनआयएफ’चा पुरस्कारही मिळाला होता. त्यानं शालिनीला प्रोत्साहन दिलं आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनशी (एनआयएफ) संपर्क साधायला सांगितला. ‘एनआयएफ’च्या सांगण्यावरुन तिनं आपल्या प्रोजेक्टला सुरुवात केली. अगोदर आपली कल्पना तिनं कागदावर लिहून काढली. आपल्या आजोबांना आणि त्यांच्यासारख्या वृद्ध, अपघातग्रस्त आणि अपंग लोकांना ज्या अडचणी येतात, त्या डोळ्यांसमोर ठेवल्या. त्यांच्या सर्व समस्या कमी करू शकतील असा वॉकर कसा तयार करता येऊ शकेल यासाठीची असंख्य डिझाइन्स तयार केली. चित्रं काढली. आपली कल्पना स्पष्ट केली आणि आपला हा प्रोजेक्ट दिला ‘एनआयएफ’कडे पाठवून.आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार हजार प्रवेशिकांमधून शालिनीचा हा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आणि तरुण संशोधकांसाठीचा ‘इग्नाइट’ पुरस्कारही तिला मिळाला. ‘एनआयएफ’ एवढ्यावरच मात्र थांबलं नाही. त्यांनी शालिनीची ही आयडिया आणखी डेव्हलप केली. वेगवेगळ्या डिझाइन्सचे आणखी काही आराखडे तयार केले. या वॉकरसाठी स्वस्त आणि दर्जेदार असं कुठलं मटेरिअल वापरता येईल यासाठीच्या चाचण्या घेतल्या आणि शालिनीच्या कल्पनेतलं वॉकर प्रत्यक्षात तयारही केलं. या वॉकरचं पेटण्ट शालिनीला मिळावं आणि बाजारात हे उत्पादन लोकांना उपलब्ध व्हावं यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. नागपूरच्या एका उत्पादकानं व्यापारी तत्वावर त्याचं उत्पादनही सुरू केलं. अशा प्रकारची दहा हजार वॉकर्स तयार करायचा संकल्प त्यांनी केला आहे. शालिनीच्या कल्पनेनुसार तयार झालेलं हे वॉकर अतिशय आगळंवेगळं आणि अगदी लहान मुलापासून कोणालाही ते वापरता येईल असं आहे. या वॉकरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अ‍ॅडजस्टेबल आहे. चार पायांच्या या वॉकरचे पुढचे दोन पाय कोणत्याही प्रकाराच्या चढउतारासाठी अ‍ॅडजेस्टबल असे आहेत. ‘स्प्रिंग लोडेड सेल्फ लॉकिंग सिस्टीम’ त्यात आहे. त्यामुळे केवळ जिने चढणं उतरणंच नाही, तर चढ-उताराच्या जमिनीवरही हे वॉकर अत्यंत उपयुक्त आहे. या वॉकरला घंटी आहे. अंधारातही ते वापरता यावं यासाठी दिव्याची सोय आहे. एवढंच नाही, तर थकल्यावर बसता यावं यासाठी फोल्डेबल सिटची सोयही त्यात केलेली आहे. या वॉकरचं डिझाईन तयार करताना शालिनीनं या सर्वच गोष्टींचा अगदी बारकाईनं विचार केला होता.या वॉकरचं वजन आहे केवळ चार किलो, पण शंभर किलोपर्यंतचं वजन हे वॉकर सहजपणे पेलू शकतं. वृद्ध, लहान मुलं, अपंग, अपघातामुळे शरीराचा खालचा भाग पंगू झालेले अपघातग्रस्त, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण, आजारी व्यक्ती, वृद्धाश्रमातील लोक, पुनर्वसन केंद्रं, ज्याठिकाणी लिफ्टची सोय नाही अशा जागा, बहुमजली इमारती.. अशा अनेक ठिकाणी आणि लोकांसाठी हे वॉकर अत्यंत उपयोगी ठरेल. शालिनी म्हणते, माझ्या आजोबांसाठी अ‍ॅडजस्टेबल वॉकर तयार करण्यासाठी मी धडपडले, पण लाखो लोकांना त्याचा उपयोग होणार आहे, याचा मला खूपच आनंद आहे!