रात्रीस सायकल चाले

By Admin | Updated: July 14, 2016 23:04 IST2016-07-14T23:04:55+5:302016-07-14T23:04:55+5:30

रात्रीची मुंबई नेमकी दिसते कशी हे पाहत आणि शहराचा निवांतपणा अनुभवत ‘मिडनाइट सायकलिंग’ करणारा एक उत्साही ग्रुप.

Walk to the night cycle | रात्रीस सायकल चाले

रात्रीस सायकल चाले

>- स्नेहा मोरे 
 
रात्रीची मुंबई नेमकी दिसते कशी हे पाहत 
आणि शहराचा निवांतपणा अनुभवत
‘मिडनाइट सायकलिंग’ करणारा
एक उत्साही ग्रुप.
 
‘जिवाची मुंबई’ करायला हजारो पावलं रोज मुंबईकडे वळतात. काही लोकं तर खास ‘मुंबई दर्शन’ करायला मुंबापुरीत येतात. मात्र घडय़ाळाच्या काटय़ावर जगणा:या मुंबईकरांचा दिवस मात्र अनेकदा हे शहर ख:या अर्थानं न पाहताच संपतो. आपलं शहर नेमकं रात्री कसं दिसतं, निवांत कसं असतं आणि शांतपणो त्याकडे कसं पाहता येतं हे समजून घ्यायचं म्हणून मुंबईतल्याच काही उत्साही तरुण मुला-मुलींनी मिळून ‘मिडनाइट सायकलिंग’चा एक नवा पर्याय शोधून काढलाय.
मूळच्या ठाण्याच्या असणा:या वेदांत कोळी, प्रसाद जोशी आणि रोहन बाटे या तरुणांनी ही हटके कन्स्पेक्ट प्रत्यक्षात उतरवली आहे. आपापल्या क्षेत्रत नोकरी सांभाळून हे तिघे सायकलिंगची आवड जपतात. मिडनाइट सायकलिंगप्रमाणोच मान्सून रायडिंग, डे सायकलिंग आणि अॅडव्हेंचर्स ट्रेक्सही ही मुलं काढतात. ‘ट्रॅव्हल 316 डिग्री’ या ग्रुपअंतर्गतही हे सायकलिंग केलं जातं.
एकमेकांची ओळख नसताना एका रात्रीत माणसं जोडायला लावणारा हा प्रवास. सायकलवरून फिरताना ‘फॉर्मल’ ओळखीने सुरू झालेला प्रवास ब:याचदा ‘बेस्टीज्’र्पयत पोहोचतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींसोबत सायकल चालवताना रात्रीची मुंबईही कधी आपलीशी होते हे कळत नाही.
दिवसा मुंबईत गर्दीने ओसंडून वाहणारी रेल्वे स्टेशन्स, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लागणा:या लांबच लांब रांगा, बेस्टसाठी ताटकळत उभी राहिलेली माणसं, पॉइंटच्या कट्टय़ावरची वर्दळ हे नेहमीचंच. पण ही मुंबई झोपते का? रात्रीच्या वेळी मुंबईच्या कानाकोप:यात काय चालतं? नेमकी रात्रीची मुंबई दिसते कशी? - याच विचारातून सुरू झालेल्या ‘मिडनाइट सायकल राइड’ला सध्या तरुणाईची पसंती मिळतेय.
रात्रीच्या बाराच्या ठोक्याला छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळून हा सायकलिंगचा प्रवास सुरू होतो. एरवी मुंग्यांप्रमाणो एकाच दिशेला जाणा:या हजारो लोकांची वर्दळ असलेलं व्हीटी स्टेशन. बाराच्या दरम्यान हे स्टेशनही काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकत असतं. प्रत्येकाला आपापल्या वाटेवर सोडल्याचा आनंद त्याच्या चेह:यावर पाहायला मिळतो. त्यानंतर सायकलचं पँडल मारत ही मंडळी मुंबापुरीचं शेवटचं टोक गाठतात. मग दिवसाढवळ्या प्रेम करण्यासाठी, अपूर्ण स्वप्नांची गोष्ट शेअर करायचं हक्काचं ठिकाण असणा:या नरिमन पॉइंटचं रात्रीचं अस्तित्व थक्क करणारं असतं. काही वेळ रात्रीचा समुद्र, मोकळं आकाश, लाटांचा आवाज हे सारं आत सामावून घेत हे सायकलस्वार वाळकेश्वरच्या दिशेला वळतात.
मलबार हिल. म्हणजे मुंबईचा तसा अनोळखी कोपरा. उच्चभ्रू वस्ती असलेल्या या परिसराची शानच निराळी! या परिसरातील रस्त्यावर सायकलचं असणं हेच भाग्य. कारण या परिसराला सवय आहे ती चारचाकी वाहनांची. त्यामुळे या परिसरात फिरतानाही आंतरिक समाधानाची उणीव भासत असते. मलबार हिलवरून मग हा प्रवास हाजीअलीच्या दिशेने सुरू होतो. अवघ्या काही मिनिटांत समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून असणारा हा दर्गा नजरेत भरतो. हाजीअली परिसरातून प्रभादेवी मार्गे ही मंडळी थेट सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होतात.
मुंबईच्या कानाकोप:यात सायकलवरून केलेली भटकंती काहीसा वेगळा अनुभव देते. दिवसा आपल्या शेजारी कोण बसलंय हे पाहण्याची फुरसत नसते; मात्र या मिडनाइट सायकलिंगमधून वेगळ्याचं अनुभवाचं गाठोडं हाती लागतं. रोजच्या कामात सोसायटी-चाळीच्या पार्किगमध्ये धूळ खात पडलेल्या सायकलचं असणंही या भटकंतीतून अधोरेखित होतंय!
 
रात्रीची मुंबई डोळ्यांत साठवायची, एक वेगळा अनुभव गाठीशी घ्यायचा याच आणि एवढय़ाच भावनेतून ‘मिडनाइट’ राइड सुरू केली. आणि याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. हा सगळा प्रवास खूप रिलॅक्स करणाराही ठरला, हे विशेष.
- वेदांत कोळी

Web Title: Walk to the night cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.