Vision Beyond: 3 Teenage friends make Quiz game for the visually challenged. | Vision Beyond : १७ वर्षांच्या ३ दोस्तांनी बनवला अंधांसाठी क्विझ गेम 

Vision Beyond : १७ वर्षांच्या ३ दोस्तांनी बनवला अंधांसाठी क्विझ गेम 

ठळक मुद्देयशोवर्धन, देव आणि ध्रुव : तीन मित्रंनी बनवलेल्या एका ‘खास’ गेमची कहाणी

17 वर्षाचे तीन दोस्त. यंदा बारावीला आहेत. ते दहावीला होते तेव्हाची गोष्ट. अभ्यासासोबतच या तिघांना अजून एका गोष्टीचा ध्यास लागलेला होता. ते म्हणजे गेम बनवणं. एकदा सोबत गेम खेळताना त्यांच्या लक्षात आलं की, आपला एक मित्र; ज्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्याला अनेक गेम्स खेळता येत नाही किंवा खेळताना अडचणी येतात. आणि तिथून त्यांच्या गेमच्या बनवण्याच्या पॅशनने एक वेगळीच दिशा शोधली. या तिघांनी ठरवलं की, आपण असा गेम बनवायचा की, जो अंध मुलांना, व्यक्तींना सहज खेळता येईल. वापरायलाही सोपा असेल आणि स्वस्तही असेल.

यशोवर्धन कोठारी, देव कपाशी आणि ध्रुव जव्हेरी या तीन दोस्तांची ही गोष्ट.

ध्रुवचा भाऊ मोक्ष अंध आहे, त्याला आपल्यासोबत खेळण्यात अडचणी येतात. त्याला मजा येईल, एन्जॉय करता येईल असा गेम बनवला तर अशी कल्पना त्यांना सुचली. अधिक चौकशी केल्यावर त्यांना कळलं की भारतात अंध मुलांसाठी असे गेम फारसे उपलब्ध नाहीत. आहेत ते परदेशीच आहेत, आणि ते वापरायलाही फार सोपे नाहीत. कॉम्प्लेक्स आहेत. मोक्षकडे तसे काही गेम्स होते. मात्र ज्यांच्याकडे गेम नाही त्यांच्यासाठी असा गेम बनवला तर.

- या एका प्रश्नाने त्यांचा नवा प्रवास सुरूझाला.

यशोवर्धन सांगतो, ‘आम्ही ठरवलं की, असा गेम बनवावा जो अंधांना सहज खेळता येईल, पोर्टेबल-यूजर फ्रेण्डली असेल आणि किंमतही रास्त असेल. मुख्य म्हणजे तो रंजकही असेल. त्यातून समाजाचा त्यांच्याशी संवाद वाढेल, त्यांनाही सगळ्यांसोबत खेळता येईल अणि आपण अलग, एकेकटं आहोत असं वाटणार नाही. मग आम्ही बरेच गेम्स खेळून पाहिले. त्यांची ऑपरेटिंग सिस्टिमही पाहिली आणि ठरवलं फार बटणं नसतील, फार गुंतागुंतीची रचना नसेल, असा ‘फिजिकली’ खेळता येईल असा गेम हवा. मग आम्ही इलेक्ट्रॉनिक बेस कॉम्प्युटर गेम बनवायचं ठरवलं. त्याची साधारण रचना कौन बनेगा करोडपतीसारखी क्विझबेस गेम अशी आहे. तो इण्टरॅक्टिव्ह आहे. पायथॉन ही प्रोग्रॅमिंग लॅग्वेंज वापरून आम्ही हा जनरल नॉलेज बेस गेम बनवला आहे.’

देव कपाशी सांगतो, तीन गोष्टींवर काम करूया असं आम्ही ठरवलं होतं. एक म्हणजे साइज, दुसरं म्हणजे प्राइज आणि तिसरं म्हणजे सिम्पलिसिटी! फार बटणं, फार सूचना असं काही न करता अत्यंत रंजक गेम तयार करायचा असं आम्ही ठरवलं. -या मुलांनी मग अनेक गेम्स पाहिले, अंध मुलांशी गप्पा मारल्या, त्यांच्या शाळेत जाऊन गेम्स खेळताना त्यांना काय अडचणी येतात हे समजून घेतलं. मग एकेक करत त्यांनी आपल्या गेमची रचना सुरूकेली. टेबलसाइज-इलेक्ट्रॉनिकली रन होणारा असा गेम बनवण्याचं काम सुरूझालं. किमान दीड वर्षे ही मुलं झपाटल्यासारखं या गेमवर काम करत होती. गेम बनवणं, त्याचं कोडिंग, डाटाबेस, त्याच्या ट्रायल हे सारं पुन्हा पुन्हा तपासून घेत करून पाहत होती. आणि त्यातून त्यांचा गेम आकाराला आला. त्याचं नाव ‘व्हिजन बियॉण्ड’.

या तिन्ही दोस्तांना विचारलं की, अभ्यास सांभाळून हे जमवलं कसं? यशोवर्धन सांगतो, एखादी कल्पना डोक्यात येणं ही वेगळी गोष्ट; पण ती प्रत्यक्षात उतरवणं हे सोपं काम नसतं. आम्ही तिघंही या गेम बनवण्याच्या विचारानेच पछाडलेलो होतो. सतत. आमच्या कल्पनेत असलेलं एक प्रॉडक्ट आम्हाला सत्यात उतरवायचं होतं. ते काम सोपं नव्हतं. स्केच करणं, कोडिंग लॅँग्वेज शिकणं, थ्रीडी मोडय़ुल तयार करणं, व्हाइस इम्पोर्ट करणं, सतत ट्रायल अॅण्ड एरर करणं हे सगळं चॅलेजिंग होतंच. अनेकदा आयडिया सोपी वाटते; पण प्रत्यक्षात ते उतरवणं हा प्रवास मोठा इंटरेस्टिंग आणि चॅलेजिंग असतो. तसा आमचाही होता.

देव म्हणतो, याकाळात आम्ही इतकं ब्रेनस्टॉर्मिग केलं, भरपूर वाचलं, आमच्या कल्पनांविषयी एकमेकांशी बोललो. मार्केट सव्र्हे, लोकांना काय हवं आहे, आज मार्केटमध्ये काय आहे, काय नाही, कशाची गरज आहे यासा:याचाही आम्ही अभ्यास केला. त्यावरही वारंवार ब्रेनस्टॉर्मिग केलं. आणि त्या सा:यात आम्हाला कामाचीही मजा आली आणि चॅलेंजही नव्यानं समजत गेलं!’ हे तीनही मित्र आता हा गेम अंध मित्रंर्पयत पोहोचविण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत.

गेम  बनवला,पुढे काय?
- या तीन पॅशनेट दोस्तांनी गेम तर बनवला. आता त्या गेमचं पुढं काय करायचं?
यशोवर्धन, देव आणि ध्रुव सांगतात की, 
‘हा गेम अधिकाधिक मुलांर्पयत पोहोचावा, त्यांना तो खेळून मजा यावी असं आम्हाला वाटतं. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग व्हावं. तो मार्केटमध्ये उपलब्ध व्हावा. अंधांसाठी काम करणाऱ्या  संस्थांना हा गेम डोनेट करण्याचाही आम्ही विचार करतो आहोत. व्हिज्युअली चॅलेंज्ड मित्रंर्पयत हा गेम पोहोचावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत’.

काय आहे या गेममध्ये?
1.     ‘व्हिजन बियॉण्ड’ हा अंधांसाठी 
बनवलेला क्विझ गेम आहे. 
2.     एका वेळी चार जण, दोन जण किंवा कुणी एकटाही हा गेम खेळू शकतो. 
3.     प्रत्येक पुढची लेव्हल यात कम्पिटिटिव्ह बनत जाते. पॉइण्टस मिळतात.
4.     आपल्याकडे अजूनही सगळ्याच अंध व्यक्तींना ब्रेल भाषा येत नाही, त्यामुळे ती भाषा न येणा:यालाही हा गेम खेळता यावा म्हणून हा गेम संवादी आहे. 
5.     या थ्रीडी प्रिण्टेड गेमच्या अधिक माहितीसाठी : http://visionbeyond.org.in/
 

 

 

Web Title: Vision Beyond: 3 Teenage friends make Quiz game for the visually challenged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.