शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

दिल्लीत युपीएससी करणार्‍या मराठी मुलांच्या जगातलं वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:12 PM

मागच्या तीन-चार वर्षातच मराठी मुलं युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत येण्याचं प्रमाण खूप वाढलंय. इथलं सगळं वातावरणच असुरक्षित असतं. अभ्यासिकांमध्ये मुलं अरुंद क्युबिकल्समध्ये बसतात. त्या क्युबिकल्सनाही पुन्हा दोन्ही बाजूंनी पठ्ठे लावले जातात. का? -तर बाजूला बसणार्‍याला आपण नेमका कुठला ‘अभ्यास’ करतो ते दिसू नये!

ठळक मुद्देअनेक मोठमोठय़ा क्लासेसच्या फॅकल्टीज मुलांना अजिबातच भेटत नाहीत. अनेक क्लासेसनी कौन्सिलर्सचं गोंडस नाव देत त्याजागी पोपटपंची करणारे रिसेप्शनिस्ट टाइप लोकच बसवलेत.

-शर्मिष्ठा  भोसले  मागच्या तीन-चार वर्षातच मराठी मुलं युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत येण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या युनिक अकॅडमीचीही ओल्ड राजेंद्र नगरमध्ये शाखा आहे. तिथलं काम सांभाळणार्‍या मयूरकडे राजेंद्र नगरबद्दलच्या माहितीचा खजिनाच आहे न संपणारा. इथलं सगळं वातावरणच असुरक्षित असतं. अभ्यासिकांमध्ये मुलं अरुद क्युबिकल्समध्ये बसतात. त्या क्युबिकल्सनाही पुन्हा दोन्ही बाजूंनी पठ्ठे लावले जातात. का? तर बाजूला बसणार्‍याला आपण नेमका कुठला ‘अभ्यास’ करतो ते दिसू नये! अनेक मोठमोठय़ा क्लासेसच्या फॅकल्टीज मुलांना अजिबातच भेटत नाहीत. क्लासेसच्या बॅनर्सवर मात्न त्यांचेच फोटो झळकावत मुलांना आपल्याकडे खेचलं जातं. शिवाय अनेक क्लासेसनी कौन्सिलर्सचं गोंडस नाव देत त्याजागी पोपटपंची करणारे रिसेप्शनिस्ट टाइप लोकच बसवलेत. ते लोक सगळे ‘नीम हकीम खतरे जान’ असतात! एरवी ओल्ड राजेंद्र नगर हा एरिया तसा अगदीच नॉन-प्रॉडक्टीव आहे. इथं मोठे उद्योग नाहीत की कसली बडी ऑफिसेस नाहीत. आहेत ते फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे पूर्णतर्‍ ‘कमर्शियल’ क्लासेस! त्यांनीच मग इथली अर्थव्यवस्था उभी केली. गेल्या दहा वर्षात ती इतकी फोफावली की आता या भागातल्या मुलभूत सुविधांवर प्रचंड ताण पडतो. अक्षरशर्‍ ड्रेनेजवर घरं उभी राहिलीत. या सगळ्याचा आरोग्यावर परिणाम होतो. या भागात फंगल-बॅक्टेरियल संसर्गाचं, त्वचारोगांचं प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच राजेंद्र नगर आणि आसपासच्या पटेल नगर, शादीपूर, रैगरपुरा, करोल बाग, झन्डेवालान या भागांमध्ये अतिक्र मण विभागानं कारवाई केली. खूप पाडापाडी आणि तणाव झाला होता तेव्हा.- ही गजबजलेली घुसमट मलाही जाणवतेच त्या गल्ल्यांमधून फिरताना.** गुरुनानक मार्केटमध्ये रिअल इस्टेटवाल्यांची असंख्य अनेक दुकानं आहेत. तिथले सुनील मिश्रा सांगत होते, ‘अरे, बकरा जितना मोटा हो, हमें उतना ही ज्यादा माल मिलता है! पर जो बच्चे गरीब है, उनका कमिशन हम लेते भी नही। इधर ओल्ड राजिंदर नगर में करीब पांचसो डीलर होंगे। इसमें सबसे फायदे मे तो मकान-मालिक होते है। मनमर्जी पैसा वसूलते है, उचक्के!’दुपार उलटली होती. समोरच एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. पंजाबी चायनीज अशा सगळ्या मेन्यूची जंत्नी होती. भिंतीवर खाद्यपदार्थाची चित्नं लावलेली. त्या सगळ्या चित्नांवर डिस्क्लेमर म्हणून छापलेली एक ओळ मात्न खूप लक्षवेधी वाटली मला. ‘नॉट द अ‍ॅक्चुअल पिक्चर, ओनली फॉर रेफरन्स’. बाजूलाच एका क्लासचा बोर्ड टॅगलाइन झळकवत उभा होता, ‘सरकारी नोकरी, उच्च पद और मान, अब पाना हुआ बेहद आसान’ .. इथं मात्र  कसलंच डिस्क्लेमर नव्हतं! **

(...पुढे ? वाचा  उद्या इथेच .. )

क्रमशः भाग 3

( लोकमत  दीपोत्सव  २०१८  दिवाळी  अंकात  "स्वप्नांचे  गॅस  चेंबर" हा लेख  प्रसिद्ध झाला आहे. )