द अग्ली इंडियन्स काम चालू, मूंह बंद

By Admin | Updated: September 4, 2014 17:34 IST2014-09-04T17:14:39+5:302014-09-04T17:34:06+5:30

ते स्वत:ला घाणोरडे, गलिच्छ असं राजरोस म्हणवून घेतात. का? ‘त्यांचा’ प्रश्न अगदी सोपा आणि थेट आहे.

The Ugly Indians work on, mouth shut | द अग्ली इंडियन्स काम चालू, मूंह बंद

द अग्ली इंडियन्स काम चालू, मूंह बंद

चिन्मय लेले

भारतात रस्तोरस्ती प्रचंड कचरा, घाण का दिसते ? या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते काही पर्यायही आपल्या समोर ठेवतात. त्यांच्या वेबसाइटवर गेलोच तर विचारतात आपल्याला, सांगा तुमचं काय मत आहे.
1) ही आपली सिस्टिमच ‘स्टुपिड’ आहे?
2) करप्टच आहे आपलं सरकार?
3) ओह, आपल्या अवतीभोवतीचे अशिक्षित लोक, काय करणार?
4) खरं सांगायचं, तर आपणच घाणोरडे आहोत, आपण करतो सगळा कचरा !
हे सारे पर्याय वाचून त्यापैकी एक पर्याय निवडताना आपण जर प्रामाणिक असू तर आपलंही मन सांगतंच आपल्याला की, चौथा पर्यायच खरा आहे. आपणच घाणोरडे आहोत, आपल्याला स्वच्छतेचं भान नाही, आपणच करतो सगळा कचरा !
आपणच आहोत, ‘अग्ली इंडियन’!
स्वत:कडे असं थेट पाहण्याची आणि स्वत:ला ‘गलिच्छ’ अर्थात ‘अग्ली’ म्हणण्याची हिंमत केली आहे, बंगळुरूतल्या काही तरुण टेकप्रोफेशनल तरुण-तरुणींनी !
त्यांना शोधायला गेलं तर त्यांची नावं, मत, पेपरातले बडेबडे फोटो असं काही सापडत नाही. ते आपल्या चेह:यावर मास्क बांधतात. आपली नावं कुणाला सांगत नाहीत, त्यांचं नाव एकच ‘द अग्ली इंडियन’.
त्यांना विचारलंच की, असं निनावी राहून काम करण्यात काय हाशिल? तर ते म्हणतात, आमची नावं, चेहरे, व्यक्तिगत आयुष्यात आम्ही कोण आहोत हे काही महत्त्वाचं नाही. त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, आम्ही उपस्थित करत असलेल्या समस्या आणि त्या समस्यांवर उत्तर म्हणून आम्ही करत असलेलं काम.
आमच्या त्या कामाची चर्चा व्हावी, ते काम आपापल्या भागात इतरांनी सुरू करावं असं आम्हाला वाटतं. पण म्हणजे, करतात काय ते काम.! तेच खरंतर खूप इंटरेस्टिंग आणि नवी नजर देणारं आहे.
बंगळुरुतला एक अत्यंत गजबजलेला, तरुण मुलांच्या गर्दीत हरवलेला श्रीमंती चकचकाटातला रस्ता आहे. चर्च स्ट्रीट.
साधारण 300 दुकानं, शंभर ऑफिसेस, 30 लहान-मोठी रेस्टॉरण्ट्स या रस्त्यावर आहे. खूप लोक, खूप कचरा, रस्त्याच्या कडेला, एखाद्या कोप:यात सतत कचराकुंडय़ा वाहत्याच. महानगरपालिकेनं कितीही स्वच्छ केलं तरी येणारी गर्दी घाण करणारच.
बंगळुरु शहराचा स्वभाव ज्या रस्त्यावरून कळतो, तो रस्ता इतका घाण हे या ‘अग्ली इंडियन्स’ना खटकत होतं. त्यात त्या रस्त्यावरचे, सबवे, पंर्स,  रस्ता क्रॉस करण्याचे अंण्डरग्राउण्ड मार्ग, हे तर कायम कोंदट, गळके, अंधारे भयानकच.
मुद्दा काय, सगळ्याच लहानमोठय़ा शहरात अनेक रस्त्यांची हीच अवस्था, हेच चित्र असतं.
या मुलांनी ठरवलं, आपण हे बदलायचं. त्यांनी रस्ते सफाई सुरू केली. डस्टबिन्स ठेवले. बंगळुरू महानगरपालिकेच्या मदतीनं हा रस्ता स्वच्छ राखण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ती गेले काही महिने उत्तम सांभाळलीही आहे.
अलीकडे त्यांनी एक नवीन काम केलं. शहरातल्या के. आर. सर्कलजवळचा सबवे. खरंतर सार्वजनिक मुतारीच स्वरूप त्या अंधा-या सबवेला आलं होतं. लोक नाक दाबून जा-ये करत, नावं ठेवत, पण करत कुणी काहीच नव्हतं. या मुलांनी हा सबवेच रंगवून टाकला. बंगळुरूचे आयुक्तही त्यात सहभागी झाले. सबवे रंगला. त्यात सुंदर चित्र आली. अनेक तरुण मुलं स्वत: हातात ब्रश घेऊन त्या अंधारात रंग भरत होते. अनेकांनी आपली पेंटिग्ज तिथं आणून लावली. काहींनी स्वत: तिथं उत्तम पेण्ट केलं.
आज तो सबवे म्हणजे एक सुंदर चित्रप्रदर्शन बनलं आहे. शहरात असे अनेक सबवे आहेत, अनेक रस्ते आहेत, त्या त्या भागातील मुलांनी एकत्र येऊन ते सारं रंगवून का टाकू नये. पानांच्या पिचका-या, मुतारीचे वास आणि कच:याचे ढीग हे सारं कोण निर्माण करतं, आपणच ! मग आपणच ते स्वच्छ करू, दुसरं कुणी करेल याची वाट न पाहता असं या मुलांचं म्हणणं आहे. 
त्यांच्या साइटवरुन आणि फेसबूक पेजवरून ते सतत आव्हान करताहेत, की तुम्ही तुमच्या शहरात असं काहीतरी करा. आमच्याशी जोडले जा.
आपलं शहर स्वच्छ करा !
स्वत:ला अग्ली म्हणवून घेत, हे स्वच्छतेचं व्रत हातात घेणा:या सुंदर कामसू हातांचं हे काम, हाथ बढाओ म्हणावं असं नक्की आहे, नाही?
---------------
कोण आहेत हे अग्ली इंडियन्स?
स्वत:ची वैयक्तिक ओळख न सांगता, एकत्र येत बंगळुरू शहरात तरुण मुलांनी सुरू केलेला हा ग्रुप. त्यांच्यापैकी अनेकजण आयटीत काम करतात. ‘काम चालू मुंह बंध’  हे त्यांचं सिम्पल लॉजिक आहे. 
--------------
‘अग्ली इंडियन्स’ व्हायचंय? 
मग हे लक्षात ठेवावं लागेल !
भारताभरातील शहरातली, गावातील मुलांनी आपापल्या परिसरात स्वच्छता करत, आपल्या रस्त्यांचं, सबवेचं, इमारतींच्या रिकाम्या कोप:याचं सौंदर्यीकरण करावं अशी ही कॅम्पेन असली तरी या मुलांनी स्वत:ची काही ‘गाईडलाइन्स’ स्वीकारल्या आहेत. ज्यांना हे काम करायचं, त्यांनी ही सूत्रं मान्य करायला हवीत, असा त्यांचा आग्रह आहे. ही सूत्रं मान्य असतील तर तुम्ही तुमच्याही शहरात असं काही काम करून द अग्ली इंडियनशी स्वत:ला जोडू शकतात.
काय आहेत ती सूत्रं?
1) भाषणबाजी करायची नाही, नैतिकतेचे ङोंडे फडकवायचे नाही, कार्यकर्तागिरी करत रस्त्यावर राडे करायचे नाहीत.
2) वाद घालायचे नाहीत, निषेधाचे मोर्चे काढायचे नाहीत. पत्रकं वाटायची नाहीत आणि आम्हीच कसे भारी म्हणून भास मारायचा नाही.
3)  आदर्शवादाच्या लढाया लढत कुणाचीच बाजू घेऊन उगीच भांडणात उडी मारायची नाही.
4) सध्या जी सरकारी व्यवस्था आहे, तिच्याशी भांडायचं नाही. उलट ते अधिक चांगलं काम कसं करतील यासाठी त्यांना मदत करायची.
5) सोबत काम करणा:या सगळ्यांचा आदर करायचा, आपण सारे एकसमान आहोत, फार काही ग्रेट करत नाहीत, एक साधं प्रॅक्टिकल काम करतोय हे लक्षात ठेवायचं.
6) फुटकळ सोल्यूशन काढून प्रश्न सोडवायचा नाही. सोल्यूशन असं हवं जे किमान सलग 9क् दिवस तरी तग धरेल. म्हणजे सतत सुपरव्हिजन नको, सतत तपासणी नको, धाक नको. जे करू ते सहज हवं. कमीत कमी खर्चात व्हायला हवं.
7) आपल्या कामामुळे कुणाची नोकरी जायला नको, कुणाला त्रस व्हायला नको.
8) या सा:यातून अत्यंत शांतपणो, धीर धरून आपण स्वच्छता करत राहणं, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं महत्त्वाचं !
---------------
संपर्क?
वेबसाइट -    http://www.theuglyindian.com
ई-मेल पत्ता -   theuglyindian@gmail.com
फेसबुक पेज - https://www.facebook.com/theugl.yindian
------------------ 
वाहतं पाणी खडक फोडून आपली वाट शोधतंच, कशाच्या जोरावर? -जिद्दीच्या ! आपण ठरवलं तर काय नाही घडू शकत. हिंमत केली, पुढाकार घेतला, तर आपणच आपलं ‘जगणं’ बदलू शकू. स्वत:साठी  एक उत्तम आयुष्य घडवू शकू..-राजेंद्र दर्डा
 
www.facebook.com/social.teamaurangabad

 

Web Title: The Ugly Indians work on, mouth shut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.