...असं इतकं ‘टिपीकल’ का झालंय आपलं सगळंच?

By Admin | Updated: July 12, 2016 15:46 IST2016-07-12T15:31:51+5:302016-07-12T15:46:27+5:30

आज डब्यात काय आणलयं ? संध्याकाळी डीनरला जाऊया, पण आईला काय सांगू ? अशा ‘वायफळ’ संवादांची ‘गर्दी’ अगदीच ‘टिपिकल’..

... this is a 'typical' thing, all of us? | ...असं इतकं ‘टिपीकल’ का झालंय आपलं सगळंच?

...असं इतकं ‘टिपीकल’ का झालंय आपलं सगळंच?

>- स्नेहा मोरे
‘हाय..गर्ल्स व्हॉट्सअ‍ॅप..’,
‘गुडनाइट बच्चा’, 
‘अरे यार, आॅनलाइन ये ना..’ 
रात्री डोक्यावर चादर घेऊन प्रत्येक घरात सुुरु असणारी ही कसरत..
मग रात्री उशिरा किंवा थेट मध्यरात्री तीनच्या सुमारास ‘त्याच्या’शी-‘तिच्या’शी भांडण झालं म्हणून, बॅटरी उतरली म्हणून, आई ओरडते म्हणूनही..
कारणं अनेक पण रागानं हातातून खाली दाणकन मोबाईल ठेवणं..
हे सगळं कसं अगदी ‘टिपिकल’ होऊन बसलयं.
पुन्हा सकाळी साखरझोपेत असताना कानाजवळ सातच अलार्म झाला की, साडे आठला जागं येणं, मग अर्ध्या झोपेत आंघोळ आवरुन, चप्पल घालत नाश्ता करुन आईचा ओरडा खाऊन आॅफिस, कॉलेजसाठी घर सोडणं...
 लेक्चर बंक करुन ‘डीपी’ज्ला जायचं का बसायला? की मरीनड्राइव्हलाच जावं सरळ? या विचाराने स्टेशन गाठायचं. ट्रेनमध्ये उभं राहायलाही जागा नसताना ‘रामदेव बाबा’च्या पावलावर पाऊल ठेऊन त्या परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपवर ‘आॅनलाइन’ राहायचं. कुठे आहेत सगळे? निघाले का, मी दादरकडच्या पहिल्या डब्यात आहे हा.. 
आज डब्यात काय आणलयं ? संध्याकाळी डीनरला जाऊया, पण आईला काय सांगू ? अशा ‘वायफळ’ संवादांची ‘गर्दी’ अगदीच ‘टिपिकल’..
**
ट्रेनमधून उतरलं की प्रवाहात सोबत जाणं आणि मग आॅफिस, कॉलेजच्या दिशेने जाणाºयांचा शोध घेणाºया नजरा.. आॅफिसमध्ये पोहोचल्यावर टेबलवर जायच्या आधी टपरी थांबणारी पावलं... ‘बॉस’ला शिव्या देत समाधान मानत सुरु केलेला रटाळ दिवस..
आणि मग फायलींच्या गराड्यात,  डेस्कटोपच्या समोर मिनिट अन् मिनिटं मोजत दिवसं ढकलणं, तसचं काहीस कॉलेजातही! कॉलेजमध्ये गेल्यावर वर्गात न जाता कँटीनमध्ये मांडलेला ठिय्या.. इडली-सांबार, चायनिज, मॅगीवर मारलेला ताव, एखादी बर्थडे पार्टी, मूव्ही प्लॅन आणि दिवसभर स्वत: भटकायला जाताना पुस्तकी किड्यांना मात्र ‘प्रॉक्सी’साठी शपथ घालणं , हे सारचं ‘टिपिकल’..
**
संध्याकाळी सातचे वेध लागले की आॅफिसमधून कलटी मारण्यासाठी धडपडणं, साडेसातची लोकल सुटेल की काय या भितीनं तळमळणं, आणि मग एकदा आॅफिसमधून बाहेर पडलं की झापडं लावलेल्या घोड्यासारखं अवघ्या काही मिनिटांत स्टेशन गाठणं..मग तेच रोजचे चेहरे, तीच चौथी सीट, तेच रोजचं लटकणं, तीच रोजची भेळ, पुन्हा तीच धावपळ.
 ‘निघालोय आई, 
‘जानू,भेटतेस ना..’, 
‘अरे यार..वीकेन्ड आहे बसू या ना..’, 
‘या वीकमध्ये खूप बिझी आहे’, 
‘उद्या देवळात जाऊया, आईला बोलू नकोस’ 
अशा संभाषणांची गजबजलेल्या गर्दीत चाललेली घुसखोरी.. 
दिवस मावळतीला आला तरीही हे सारंसुद्धा ‘टिपिकल’...
**
स्टेशनला उतरलं की नाक्यावर जाण्याची घाई, भाजी घेण्याचं काम,  मुलाला ट्यूशनमधून घरी न्यायची घाई, पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ घरी घेऊन या हा निरोप..काहीतरी खायला कर पोहोचतोच आहे हा प्रेमळ आग्रह.. आणि मग घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन मुलांचा अभ्यास घेणं, कॅरम खेळायला बसणं, संध्याकाळचं बातम्यांचं बुलेटिन पाहणं आणि सतत दुसºयांना उपदेश देत राहणं कितीही ते  असचं असणं ‘टिपिकल’...
**
रात्रीची तयारी करताना ‘रोमँटिसिझम’ची काहीशी मनाशी प्रॅक्टिस करणं, गॅस संपलाय का ते चेक करणं, पालकसभेची आठवण करणं, पार्लरसाठी पैसे हवेत, नेटॅपक संपलाय, पुढच्या आठवड्यात पिकनिक आहे  , मुलांना शाळेत काय केलसं रे बाबा असं विचारणं, उद्यातरी बँकेच्या कामासाठी वेळ काढा, बाबांना पेन्शनच्या कामाला घेऊन जायचयं, गेल्या आठवड्यात ब्रेकअप झालं त्याच्याशी अशा एका ना अनेक लाखो-करोडो गोष्टींचा मनात गुंतागुंतीचा खेळ सुरु असणंही तितकचं ‘टिपिकल’...
**
 रात्री बारानंतर पुन्हा ‘अरे मित्रा, आलास आॅनलाइन, ‘बोल काय झाल..’, ‘आॅल सेट ना’, ‘प्लिज, लवकर ये दिड वाजल्यानंतर दुसºया ग्रूपवर बिझी असते’ हाच तो क्षण.
 पुन्हा ‘टिपिकल..एके टिपिकल’...
**
‘टिपिकल’ असण्यामुळेच अलीकडच्या जगण्यातलं ‘जगणं’ संपतयं...
भावना, नाती, ओलावा, ध्येय, स्वप्न या सगळ्यापासून आपण दुरावतोय. त्यामुळे कधीतरी ही ‘टिपिकल’ जगाचा उंबरठा ओलांडून ‘पलीकडं’ यायचा प्रयत्न करा. 
दिलखुलासपणे प्रत्येक क्षण जगत, चाकोरीबाहेरच्या गोष्टी करत, नव्या क्षितिजांचा शोध घेता येईल..
प्रयत्न तर करायला हवा, टिपीकल विचार न करता..

Web Title: ... this is a 'typical' thing, all of us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.