शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

कासव

By admin | Updated: April 7, 2017 18:35 IST

कासव या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम सिनेमा म्हणून सुवर्णकमळ लाभलं, ही बातमी तुम्हाला कळलीच असेल! पण आज जागतिक आरोग्य दिनी

 - आॅक्सिजन टीमआपल्या अवतीभोवती, आपल्यातही असे काही मानव असतील..आपण त्यांना कधी काढणार त्या काळोख्या गर्तेतून बाहेर?कासव या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम सिनेमा म्हणून सुवर्णकमळ लाभलं, ही बातमी तुम्हाला कळलीच असेल! पण आज जागतिक आरोग्य दिनी आणि ज्या दिवसाची थीमच डिप्रेशनशी लढा अशी आहे त्यादिवशी हा पुरस्कार मिळणं हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा..आयुष्यात शिरलेल्या डिप्रेशन नावाच्या अस्वस्थ भावनेशी लढण्यासाठी ही एक प्रेरणाच म्हणायला हवी. कासव गतीनं का होईना आपण मन मोकळं करायला हवं. आपलं कुढणं थांबवून त्यासंदर्भात बोलायला हवं..

कासव सिनेमा हेच सांगतो..जानकी. कासव संवर्धनासाठी एक प्रोजेक्ट करते आहे. समुद्रकिनारी दत्तूभाऊ कासवांच्या वाढीसाठी काम करत असतात. तिथं ती येवून पोहचते. तिथं ती मानव ला भेटते. मानव एक तरुण मुलगा. मात्र स्वत:च्याच कोशात हरवलेला. कासव जसं आपलं डोकं पाठीवरच्या कवचात ओढून घेतं तसा हा मानव, डिप्रेशनमध्ये हरवलेला. आनंदी जगणंच विसरलेला. जानकीला त्याच्याविषयी कणव वाटते. त्याला दोष न देता, टिका न करता, कुठल्याही प्रकारे जजमेण्टल न होता जानकी मानवला डिप्रेशनच्या गर्तेतून बाहेर येता येईल असं वातावरण तयार करते. तिचा ड्रायव्हर यदू, दत्ताभाऊ, घरातला कामाला असलेला बबल्या आणि रस्त्यावर राहणारा परशू हे सारे त्यासाठी मानवला मदत करतात. खरंतर त्यांचं परस्परांशी काही नातं नसतं पण तरीही एकमेकांच्या मदतीनं ते सारे मिळून मानवसाठी एक सपोर्ट सिस्टिम उभी करतात..ते सारं कसं घडतं हे पाहणं म्हणजे हा चित्रपट.आपल्या अवतीभोवती, आपल्यातही असे काही मानव असतील..आपण त्यांना कधी काढणार त्या काळोख्या गर्तेतून बाहेर..कधी जगण्याचा स्वीकार करुन उमलणार, बागडणार, स्वच्छंद होवून?हाच प्रश्न आजचा जागतिक आरोग्य दिनही विचारतो आहे. म्हणतो आहे,डिप्रेशन? लेट्स टॉक.अलिकडेच केलेल्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनीही हेच सांगितलं की, बोला. डिप्रेशनशी लढा द्या..त्या टप्प्यावर कासव सारख्या सिनेमाला राष्ट्रीय ओळख मिळणं ही एक मोठीच गोेष्ट आहे..आपणही जरा भिडूच वास्तवाला.. बोलू.. मनमोकळं करु!कासवचा ट्रेलर पाहण्यासाठी ही लिंक पहा..लहर समंदर तू रे..हे ऐकताना जाणवेल आपल्यातलीच अस्वस्थ खळबळ..

https://www.youtube.com/watch?v=_iONyyMmx9o