टय़ुनिक्स कुर्ती शर्ट स्टाइल कुर्ता

By Admin | Updated: November 13, 2014 20:31 IST2014-11-13T20:31:28+5:302014-11-13T20:31:28+5:30

नेहमीचा प्रश्न, टिपीकल पंजाबी ड्रेस तर घालायचा नसतो पण घट्ट-तोकडे टॉप, टीशर्ट्सही घालणं बरं दिसत नाही.

Tunics kurta shirt styled kurta | टय़ुनिक्स कुर्ती शर्ट स्टाइल कुर्ता

टय़ुनिक्स कुर्ती शर्ट स्टाइल कुर्ता

 - प्राची खाडे 

(स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)
 
नेहमीचा प्रश्न, टिपीकल पंजाबी ड्रेस तर घालायचा नसतो पण घट्ट-तोकडे टॉप, टीशर्ट्सही घालणं बरं दिसत नाही.
अशावेळी काय घालावं? मुख्य म्हणजे टय़ुनिक्स, कुर्ती, शर्ट स्टाइल कुर्ते असं बरंच काय काय फॅशनेबल कानावर येतं? पण हे सगळं कशावर आणि कसं घालायचं? मुख्य म्हणजे टय़ुनिक्स, कुर्ती, शर्ट स्टाइल कुर्ते यांच्यातला फरक ओळखून  नेमक्यावेळी नेमकं घालायचं कसं?
मुळात त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण नेमक्या ओळखल्या पाहिजेत.
टय़ुनिक्स- म्हणजे खरंतर लॉँग काहीसे ढगळे टॉप्स. साधारण कंबरेर्पयत त्यांची लांबी असते.
कुर्ती - गुढघ्यार्पयतच्या उंचीची असते. दोन्ही बांजूनी कुर्तीना कट असतो. कुत्र्यापेक्षाही काहीशी लहान असते.
शर्ट स्टाइल कुर्ता किंवा टय़ुनिक्स - 
हे खरंतर शर्टासारखेच कॉलर, पुढून बटन असलेले लॉँग टॉप्स.
आता मुद्दा हा की, हे प्रकार नेमके कधी आणि कशावर घालायचे?
टय़ुनिक्स कशावर घालायचे?
टुनिक्स हे आधी म्हटलं तसं जेमतेम कंबरेर्पयत येतात. त्यामुळे चालताना, वाकताना, काम करताना तुमचा पाश्र्वभाग थोडा तरी दिसतोच. तुमची फिगर खूपच चांगली असेल आणि तुम्ही कम्पर्टेबल असाल तर काही हरकत नाही. पण एरव्ही मात्र घट्ट पॅण्ट्सवर, अंगाला चिकटणा:या चुडीदारवर ते घालू नयेत. फार वाईट दिसतं.
कशावर घालाल?
पटीयाला, लूज लिनन पॅण्ट्स, हेरम पॅण्ट्स, जिन्स, स्कर्ट्स, सेमी फिटेड कॅप्रीज यांच्यावर टय़ुनिक्स बिंधास्त वापरा.
काय टाळाल?
लेगिन्स, चुडीदार, स्किनी तंग पॅण्ट्स, यांच्यावर नाही म्हणजे नाहीच घालायचं टय़ुनिक्स.
कुर्तीज कशावर घालाव्यात?
कुर्तीज खरंतर कशावरही घालता येतात. कुणीही बिंधास वापरावा असा हा प्रकार. मात्र कुर्तीना साईड कट, फ्रण्ट कट अनेकदा असतात. त्यामुळे तुमच्या मांडय़ा जाडजूड असतील तर थोडी सावधानता हवीच.
कशावर घालाल?
विशेषत: जाड मुलींनी पटीयाला, लूज लिनन पॅण्ट्स, हेरम पॅण्टस, जिन्स, स्कर्ट्स, स्ट्रेट कट पॅण्ट्स यांच्यावर कुर्ती वापरल्या तर त्या जास्त चांगल्या दिसतात. बारीक मुलींनाही हे पर्याय आहेतच, त्यांनी चुडीदार किंवा लेगिन्सही वापरल्या तरी हरकत नाही.
काय टाळाल ?
शक्यतो लेगिन्स, चुडीदार, स्किनी पॅण्ट्स, नी लेंथ केप्रीज, थ्री-फोर्थ लेगिन्स यांच्यावर कुर्ती घालू नयेत.
शर्ट स्टाइल टय़ुनिक्स / कुर्ता 
कशावर घालायचे?
तुमचा शर्ट स्टाइल कुर्ता जर गुडघ्यार्पयत असेल तर त्याच्याखाली ढगळंढुगळं काही घालू नये. ते अजागळ दिसतं. त्यापेक्षा स्ट्रेट कट, सेमी-फिटेड-फिटेड बॉटम पॅण्ट्स, चुडीदार, जिन्स यावर हे कुर्ते वापरणं जास्त चांगलं.
कशावर घालाल?
जिन्स, स्ट्रेट कट पॅण्ट्स, लेगिन्स, चुडीदार, स्किनी पॅण्ट्स, फुल लेंथ स्कर्ट यावर शर्ट स्टाइल कुर्ते घालणं योग्य.
पटियाला, लूज लिनन पॅण्ट्स, हेरम पॅण्ट्स, थ्रीफोर्थ लेगिन्स, केप्रिजवर अजिबात घालू नयेत.
 

Web Title: Tunics kurta shirt styled kurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.