अमृता खानविलकरचे डार्क फ्लोरल फुलाफुलांचे ड्रेस पाहिलेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:21 IST2018-08-02T15:19:33+5:302018-08-02T15:21:23+5:30
डार्क फ्लोरल म्हणजे एक सहज, सुंदर ट्रेण्ड!

अमृता खानविलकरचे डार्क फ्लोरल फुलाफुलांचे ड्रेस पाहिलेत?
- श्रुती साठे
डार्क फ्लोरल म्हणजे एक सहज, सुंदर ट्रेण्ड! अगदी लहान मुलींपासून, कॉलेजात शिकणार्या मुली, नोकरी करणार्या तरुण मुली, स्त्रिया सगळ्यांना आवडणारा आणि शोभून दिसणारा असा हा डार्क फ्लोरल ट्रेण्ड! कोणी फ्लोरल प्रिंटेड मॅक्सी वापरावी, कोणी शॉर्ट ड्रेस, कुर्ता, टॉप म्हणून वापरावे, तर कोणी फक्त स्कार्फ घ्यावा! टवटवीत आणि बांधेसूद दिसायला डार्क फ्लोरल नक्कीच मदत करतात.
अमृता खानविलकरने एका सोशल साइटवर आपले फोटोज शेअर केले ज्यात ती डार्क फ्लोरल प्रिंटेड टॉप्समध्ये दिसली. काळ्या रंगाचा लांब स्लिट असलेला शर्ट टॉप त्यावर असलेल्या मोठय़ा लाल-हिरव्या फ्लोरल प्रिंटमुळे सुंदर दिसला. लॉन्ग शर्ट आणि त्याखाली काळे लेगिंग्स आणि स्टिलेटोज यामध्ये ती खुलून दिसली. कुर्ता, लॉन्ग टॉप आणि लेगिंग हे अगदी आपले आवडीचे, रोजचेच कॉम्बिनेशन आहे. तेव्हा नेहमीच्या कॉटन कुत्र्याला ब्रेक देऊन शिफॉन, जॉर्जेट कापडामध्ये फ्लोरल प्रिंटेड कुर्ता नक्की ट्राय करा.
अमृताचा दुसरा लूक कॉलेज तरु णींना नक्कीच ट्राय करावा वाटेल! लाल रंगाचा फ्लोरल सॅटिन रॅप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स एकदम पार्टी परफेक्ट आहे!
गडद रंगाच्या बेसवर मोठे फ्लोरल प्रिंट हे कोणत्याही वेळेसाठी छान दिसणारं कॉम्बिनेशन आहे. कुठंही हमखास फ्रेश दिसायचं असल्यास मग अगदी कॉलेज, कॅज्युअल ड्रेस म्हणून, पार्टीसाठी डार्क फ्लोरल हा अचूक नेम ठरतो! शिवाय बिझी प्रिंट असल्याने फ्लोरल प्रिंट पावसाळ्यासाठी अगदी योग्य पर्याय ठरतो.