True Voters - app for voters | ट्र व्होटर - हे घ्या मतदारांसाठी खास अ‍ॅप

ट्र व्होटर - हे घ्या मतदारांसाठी खास अ‍ॅप

प्रा. योगेश हांडगे 

निवडणूक जवळ आली आहे. आपलं नाव मतदान यादीत आहे की नाही हे तपासा.
त्यासाठी तुम्ही अ‍ॅपचाही वापर करू शकता.
या अ‍ॅपचा उपयोग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र किंवा यादीतील आपला क्रमांक मोबाइलमध्ये एका क्लिकवर आपल्याला शोधण्याकरता होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्या ‘ट्र व्होटर’ हे अ‍ॅप मतदारांकरता उपलब्ध करून दिले आहे.
ट्र व्होटर अ‍ॅपद्वारे मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्र मांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणं, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणं, मतदानाबाबतची माहिती घेणं, स्वतर्‍ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाइल क्र मांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणं, कुटुंब व मित्नांचा गट तयार करणं, गैरहजर, स्थलांतरित, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळवणं, स्वतर्‍चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणं, आपात्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्र मांक जतन करणं, एकाच मोबाइलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणं शक्य आहे. निवडणुकीचा निकाल पाहणं इत्यादी कामं सहजपणे  या अ‍ॅपद्वारे करता येणार आहे.

सिटिझन ऑन पॅन्ट्राँल (कॉप)
‘‘कॉप’’चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणं हा आहे. 
या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये एखादा पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचा भंग करीत असेल तर त्याची तक्र ार आता आपल्याकडे असलेल्या मोबाइलवरून थेट निवडणूक यंत्नणेकडे करता येणार आहे. 
या अ‍ॅपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय सामावला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रि येवर नजर ठेवू शकतील.
 या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्नासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्नणांच्या निदर्शनास आणून देता येईल.
या अ‍ॅपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्र ारीवर जलद गतीने कारवाई  करणे आहे. या अ‍ॅपद्वारे तक्र ार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.
प्रचाराच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्नासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्नणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्नण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल.
या कॉपद्वारे मतदारांना पुढील गैरप्रकाराना आळा घालणं सहज शक्य झालं आहे. पैसे, भेटवस्तू, मद्यवाटप, शस्र बाळगणे, सरकारी गाडय़ांचा गैरवापर, लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर, घोषणा व जाहिराती, पेड न्यूज, सोशल मीडिया, प्रचार रॅली, प्रार्थना स्थळांचा वापर,  भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, इत्यादीसाठी सिटिझन ऑन पेट्रोल हे अ‍ॅप वापरता येईल.
या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्र ारी नागरिक सुलभपणे दाखल करू शकतील. तसेच मतदारांना उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल व गैर आढळल्यास त्याची तात्काळ तक्र ार नोंदवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवालदेखील तक्र ारदारास अ‍ॅपमार्फत दिसून येईल.


 

Web Title: True Voters - app for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.