शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

टिकटॉक, पबजी आणि जॉबलेस : कोरोनाकाळातल्या तारुण्याचं असंही एक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:36 IST

आपण भले, आपला पबजी भला, टिकटॉक बरे, असं म्हणत काहीजण त्यातच हरवून गेलेत. काही मात्र आपल्या भविष्याचं काय, म्हणत नैराश्यात रुतलेत.

ठळक मुद्देकाय करायचं या प्रश्नांचं? कुठे सापडतील उत्तरं.

- राखी राजपूत

लॉकडाउनच्या निमित्ताने थोडे दिवस का होईना घरी निवांत राहण्याचा योग आला. मात्न हा घरात बसून राहण्याचा काळ तसा फारसा सुंदर, छान असा काही नव्हता.. जवळ होती नव्हती ती पुस्तक वाचून झाली होती. थोडेफार बाकीचे कलाकुसरीचे छंदपण जोपासून झाले होते. पण काही दिवसातच वातावरणातल्या बदलाने, घामट कुंद हवेने अधिकच मरगळ यायला लागली. त्यामुळे एरवी फारसं कॉलनीमध्ये कोणाशी संबंधच न येणारी मी विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या काही माङयासारख्या चोविशी-पंचवीशीतल्या आणि काही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणा:या तरुण-तरुणींच्या जवळून संपर्कात आले. त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली जवळून अनुभवली. त्यात एरवी फक्त ऐकूनच माहीत असणा:या टिक-टॉक, पबजीसारख्या अॅप्सच अॅडिक्शन या पिढीत केवढं खोलवर भिनलेलं आहे, हे पाहून हैराण झाले ! कुठल्याशा जागेत उतरून लोकांना फक्त मारत सुटायचं आणि आपल्याला मारायला कोणी आलं तर मदतीसाठी खरोखरीच समोरच्याची मदत मागत ओरडायच! केवढा थिल्लर खेळ आहे हा. मात्न हे सगळेच तरुण काही अशा थिल्लर अॅप्सच्या आहारी गेलेले नाहीत हे बघून थोडं बरही वाटलं. मग असा कोणत्याच अॅडिक्शनमध्ये नसणारा साधारण एकविशीतला तो. एवढय़ात फारच गप्प आणि गंभीर दिसायला लागला तेव्हा त्याला नेमकं  झालं तरी काय, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानेच माङयावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला! फार गंभीर आणि गहन प्रश्न होते त्याचे.  घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे आता डिग्री घेऊन लगेच नोकरीला लागायचं आणि घराचा भार उचलायचा, मग आपल्या पायावर उभं राहिलं की पुढचं शिक्षण घ्यायचं. अशी स्वप्न रंगवत असतानाच आता कोरोनामुळे आधीच आर्थिक मंदीचे सावट येऊन ठेपल्याने अनेकांच्या नोक:यांवर गदा आली.तो विचारत होता, आता  मला कोण नोकरी देणार? उमेदीच्या काळातच आता अशी गत झाली आहे तर माङया भविष्याचं काय होईल? खरं तर ही काय फक्त त्याचीच गोष्ट नाही त्याच्या सारख्या अनेकांना आज आपल्या भविष्याची चिंता सतावत असणार आहे.तसं पाहिलं तर तुम्हाला, मुळात भारतालाच बेरोजगारी हा विषय नवा नाही. पण लॉकडाउनमुळे आता अर्थव्यवस्थेचा अधिकच बोजवारा वाजला असताना ज्यांच्या बळावर भारत महासत्ताक होऊ पाहत होता त्या तरुणांचेच भविष्य आता अधांतरी झाले आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे तरुणांचा एक वर्ग असाही आहे जो या लॉकडाउनचा वेळ मोबाइलवर पबजी खेळण्यात आणि टिक-टॉकचे व्हिडीओ बनवण्यात वेळ घालवत आहे. या वर्गाला भविष्याची चिंता तर नाहीच; पण सध्याच्या परिस्थितीशी ही यांना घेणं देणं नाही. आपण भले, आपला पबजी भला असा जीवनमंत्न आत्मसात केल्यासारखे दिवस-रात्न मोबाइलमध्ये घुसून या खेळाला अशा अॅप्सलाच त्यांनी आपलं विश्व बनवलं आहे.

 अनेकजण टिक-टॉकवर वाढलेले आपले फॉलोअर्स बघून आनंदून जातात. त्यातून मिळणा:या तोकडय़ा पैशांवर काहीजण स्वत:ला सेटल  समजतात.भविष्यात आपल्याला आता निदान पोटापाण्यासाठी तरी काही काम मिळेल का, असे प्रश्न यांच्या गावीही नाहीत. पूर्वी आपला मुलगा वयात आल्यानंतर काही व्यसनांच्या आहारी तर जात नाही ना म्हणून पालक चिंतेत असायचे मात्न आताच्या पिढीला या अॅप्सचं एवढं भयंकर व्यसन जडलं आहे की त्यापुढे त्यांना आपले आई-वडील काहीच आठवत नाही. कोणत्यातरी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत ते वावरत असतात आणि  या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यांना आहे ते जास्तच चिंतेत आहेत. भविष्याच्या चिंतेत आहेत.  आपण आयुष्यात हवं ते साध्य करू  शकलो नाही म्हणून उदास आहे.काय करायचं या प्रश्नांचं?कुठे सापडतील उत्तरं.

(राखी मुक्त पत्रकार आहे.)