थरावर थर

By Admin | Updated: October 30, 2014 19:29 IST2014-10-30T19:29:55+5:302014-10-30T19:29:55+5:30

थंडीत ‘स्मार्ट’ दिसायचंय ! ‘लेअरिंग’चा ‘ब्राईट’ फॉर्म्युला वापरा.

Thunder layer | थरावर थर

थरावर थर

प्राची खाडे, स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर
 
दिवाळी सरली.
हवेत मस्त गारवा आला.
गुलाबी थंडी निदान पहाटे तरी जाणवतेच.
आपलं नशीब फार चांगलं की, आपल्या भागात अतिथंडी नसते. निदान या सुरुवातीच्या दिवसात तरी थंडीचा कडाका नसतो. कपडय़ांवर कपडे आणि स्वेटर घालून नाही बसावं लागतं. त्यामुळे ¨हवाळा हा ‘ट्रेण्डी’ दिसण्यासाठीचा सगळ्यात मस्त सुखावणारा ऋतू. 
त्यामुळे या हिवाळ्यात जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर या काही ‘खास’ गोष्टी कराच.
रेड-ऑरेंज-यलो
हिवाळा म्हणजे उष्ण रंगाचा उत्सवच. उबदार रंग अंगावर मिरवण्याची एक खास संधी. काळा, लाल रंगाच्या सर्व शेडस, ऑरेंज, यलो हे सगळे ‘वॉर्म’ कलर. हे रंग उष्णता परावर्तित करत नाहीत तर ती शोषून घेतात. म्हणून खरं तर हिवाळ्यात हे रंग वापरायचे. त्यामुळे या काळात हे सगळे रंग भरपूर वापरा. प्रिण्टेडमध्ये हे रंग वापरू शकता. मस्त ब्राईट दिसू शकता.
रफटफ कापड
हिवाळ्यात कपडे घेताना जर कापड पाहिलं पाहिजे. थिक पाहिजे फॅब्रिक. असं जाडसर कापड जे उष्णता शोषून घेईल. त्यामुळेच लोकरी, फ्लीस, कारड्रॉय, लेदर, स्यूड यासारखे कापड घ्यावे. कोरडय़ा हवेमुळे काही प्रकारचं कापड अंगाला चिकटतं. उदाहरणार्थ सॅटिन. त्यामुळेच असं कापड शक्यतो घेऊ नये.
लेअरिंग कराच.
सगळ्यात महत्त्वाचं ट्रेण्ड म्हणजे लेअरिंग. पण ते जरा स्मार्टली करायला हवं. नाहीतर घामेघूम व्हायला होतं. त्यामुळे शर्टावर टी-शर्ट, टी-शर्टवर स्वेटर, हे सगळं घालताना आपल्याला गरम होणार नाही, आणि बाहेर कुठं स्वेटर काढून टाकलं तरी शर्ट गबाळा दिसणार नाही असं पाहा. लेअरिंग करताना वर सांगितलेल्या वॉर्म कलरचं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल.
लेअरिंग करताना एखादा छानसं मफलर, शर्टापेक्षा कॉण्ट्रास्ट कलरचं वापरा. शर्टावर एखादं लाईट कलाचं जॅकेट वापरता येईल. झीपर्ड जर्सी, डेनिम जॅकेट, कार्डिगन्स हेसुद्धा लेअरिंग करून एकदम खास दिसतं.
 

 

Web Title: Thunder layer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.