शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

गोष्टी... न संपणाऱ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:12 PM

‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...

ठळक मुद्दे ‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...गोष्ट कायम भूतकाळातच लिहायची असा शाळेत शिकवलेला नियम पाळायचं ठरवलं तर फक्त घडून गेलेल्या गोष्टीच ‘गोष्टी’ ठरतील.

- प्रसाद सांडभोर 

    ‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...गोष्ट कायम भूतकाळातच लिहायची असा शाळेत शिकवलेला नियम पाळायचं ठरवलं तर फक्त घडून गेलेल्या गोष्टीच ‘गोष्टी’ ठरतील. पण मग आता - इथे - लाइव्ह घडणाऱ्या - बिघडणाऱ्या गोष्टी ‘गोष्टी’ नाहीत का? आणि भविष्यातल्या कल्पना, दिवास्वप्नांच्या गोष्टी? त्यांचं काय? मुळात एखाद्या गोष्टीला काळाचं बंधन हवंच कशाला? नियम तोडून, खुल्या-मोकळ्या मनानं, आजूबाजूला पहावं तर सगळीकडे गोष्टीच गोष्टी आहेत...

टेबलाजवळ जरा तिरकी उभी एक एकटी खुर्ची...कपाच्या तळाशी उरलेली- थंड झालेली - तीन घोट कॉफी.खिडकीतून दिसणाऱ्या झाडाची विशिष्ट कोनात वळलेली फांदी.रस्त्याच्या मधोमध पडलेली एक चिमुरडी चप्पल.अंगावर कुठे एखाद्या जखमेचा राहून गेलेला व्रण.फुटपाथवरच्या सिमेंटमध्ये पक्के झालेले कुणा कुत्रुल्याच्या पायांचे ठसे.या साऱ्या गोष्टीच गोष्टी...

   आपण नीट लक्ष देऊन ऐकल्या, पाहिल्या तरच वाचता येणार ! काही गोष्टी शोधाव्या, आठवाव्या लागणार. काही कायम लक्षात राहणार. काही गोष्टी लांबच लांब, काही गोष्टी छोट्याशाच. लहानसहान. काही गोष्टी अनंत - अखंड - न संपणाऱ्या. काही गोष्टी संपून पुन्हा सुरू होणाऱ्या.   आणि काही गोष्टी मात्र अशाच - बिनसुरुवात - बिनशेवट - नुसत्याच ‘असणाऱ्या’.