मन की बात
By Admin | Updated: July 4, 2016 13:05 IST2016-07-04T13:05:56+5:302016-07-04T13:05:56+5:30
सगळंच कसं व्हावं, आपल्या मनासारखं? सारंच कसं असेल, आपण म्हणू तसं? पाऊस कितीही वाटला आपला, हवासा तरी तो तरी कुठं आपल्या मनासारखा वागतो?

मन की बात
>सगळंच कसं व्हावं, आपल्या मनासारखं?
सारंच कसं असेल, आपण म्हणू तसं?
पाऊस कितीही वाटला आपला, हवासा
तरी तो तरी कुठं आपल्या मनासारखा वागतो?
आपण म्हणू तेव्हा येतो,
आपण म्हणू तेव्हा थांबतो.
तो त्याच्यासारखाच..
कधी कोसळधार, कधी नुस्ताच घुसमटलेला,
रिपरिपा, कधी चिकचिका,
कधी तर नुस्ती भूरभूर, भर उन्हातली..
आपण आपली चिडचिड करतो,
असा कसा बिनभरवशाचा म्हणतो?
पण असतो तो असाच खरा,
जसं असेल तसं
त्याला स्वीकारण्याशिवाय
आपल्या हातात तरी काय असतं?
आणि आपलं मन तरी
या पावसाहून कुठं वेगळं असतं?
कधी आनंदानं रिमझिमतं,
कधी इमोशनल होत हुप्प होऊन बसतं,
दाटलं आभाळ जसं,
नुस्तंच निराश. कोंदट. हटवादी.
आणि कधी झिम्माड होऊन कोसळतं,
तेव्हा आवरता आवरत नाही..
करणार काय?
मनपाऊस होतं तेव्हा..
होऊ द्यावं..
अजून काय?
-ऊर्जा