बादशहाच्या जिंदगी शाळेत दीवाने धडे
By Admin | Updated: October 22, 2015 21:33 IST2015-10-22T21:33:25+5:302015-10-22T21:33:25+5:30
शाहरुख खानला एडीनबर्ग विद्यापीठात मानाची डॉक्टरेट मिळाली. तेव्हा विद्याथ्र्याशी संवाद साधत त्यानं आपल्याच सिनेमांच्या कथातून उलगडले जगण्याचे अफलातून धडे.

बादशहाच्या जिंदगी शाळेत दीवाने धडे
दीवाना माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात गाजलेला हा सिनेमा. नाव दीवाना. मी एका विधवेच्या प्रेमात पडतो. तेही कसं तर रॅश ड्राईव्ह करून अलमोस्ट तिच्या सासूला मारलंच होतं मी! पण तरीही मी तिच्याशी लगA केलं, म्हणजे सासूशी नव्हे त्या मुलीशी! तिच्या मनात नव्हतंच पण केलं तिनं लगA. मग माङया श्रीमंत, कमिन्या वडिलांनी तिला मारायचा प्रयत्न केला. मग वडिलांना हातभर लांब भाषण देत मी घर सोडतो. स्वत:च्या पायावर उभं राहतो. कष्ट करतो, मारामा:या करतो. आणि मग फायनली ती माङया प्रेमात पडते आणि हा हिरो म्हणजे मी आयुष्यभर सुखात राहतो.
मला अजून कळलेलं नाही की, काय म्हणून या सिनेमाचं नाव दीवाना ठेवलं असेल? पण त्या रोमॅण्टिक मॅडनेसशी असेल त्याचा संबंध!
पण या सिनेमातल्या हिरोनं शिकवलेला धडा मला फार महत्त्वाचा वाटतो.
तोच पहिला लाइफ लेसन.
काय?
तर मॅडनेस!
मस्त आनंदी आयुष्य हवं असेल तर जगण्याचं हे पागलपन हवंच! जग काही का म्हणोना, तुमच्या क्षमता, तुमच्या इच्छा आणि जगण्याची तुमची त:हा बदलू नकाच. आजवर ज्यांनी जगात शोध लावले, क्रिएटिव्ह गोष्टी केल्या, क्रांती घडवली ते सारे स्वत:च्या त:हेनं जगले, स्वत:च्या डोक्यानं वागले. ‘नॉर्मल’ जगणं जगणा:या माणसांचं हे काम नाही. नाकासमोर जगण्यात काही ‘जिंदगी’ नाही. जे वाटलं ते केलं, एवढाच हा एक धडा!
चमत्कार
चमत्कार. भुताखेताचा सिनेमा. एक भूत फक्त मलाच दिसतं, इतरांना दिसत नाही. ते भूत मला नोकरी मिळवून देतं. प्रेमाबिमात पडायला मदत करतं. ते भूत आणि मी मिळून एक क्रिकेट मॅच जिंकतो. मग सिनेमा संपता संपता त्या भुताला मुक्ती आणि न्याय मिळतो आणि मला हिरॉईन मिळते.
चमत्कारच हा. पण त्यातून मी एक धडा शिकलो.
तोच हा दुसरा लाइफ लेसन.
अगदी सारं चोरीला गेलं. पार लुटलं कुणी तुम्हाला. स्मशानात जाऊन झोपावं लागलं तरी चालेल. पण शांत झोपा. गाढ झोपा.
कारण आपलं जगणं हाच एक मोठा चमत्कार आहे. आपल्या आयुष्यात काही चमत्कार व्हावा असं आपण शोधत असतो, पण आपलं जगणं हाच एक रोज सुंदर चमत्कार आहे. तुमच्या क्षमता, तुमची बुद्धी, तुमचं प्रेमळ मन, तुमची माणसं, तुमचं आरोग्य या सा:यावर विश्वास ठेवा. हे सारं आयुष्यानं तुम्हाला भेट दिलंय. ते पूर्णपणो वापरा. त्याचा आदर करा. तुम्ही जगण्याला मान दिला, प्रत्येक क्षण वाया न घालवता नीट वापरला तर जगणं हाच एक सुंदर चमत्कार ठरतो. जगण्यात यशाची अशी काही व्याख्या नाही, मापदंड नाही. त्यातलं सूत्र एकच, आपल्याला छान, आनंदी आणि सुखी वाटलं पाहिजे.
डर आणि बाजीगर
वीस वर्षापूर्वी भारतीय सिनेमात रोल ठरलेले होते. स्टारडमची सिक्युरिटीच ते रोल द्यायचे. एक हिरो, एक व्हिलन. अॅँग्री यंग मॅन होणं जमलं तर कायम तुम्ही तेच व्हायचं. एकदा पोलिसाचा रोल केला की पुढे कायम तोच रोल करायचा. यश ठरलेलं. तेच हिरॉईन्सचंही. एकदा जी सतीसावित्री पत्नी झाली ती पुढे तीच. मग कुणी कॅब्रे डान्सर, खलनायिका, सासवा त्यांनी तीच कामं करायची. काही कलाकार स्वत:हून ट्रॅक बदलत, पण बाकी सारे याच चाकोरीत फिरत.
पण माङयाकडे अॅण्टी हिरोचा रोल आला. तो मी स्वीकारला. मी फार डॅशिंग आणि धाडसी होतो म्हणून नव्हे, तर एका दिग्दर्शक मित्रनं मला सांगितलंच शांतपणो की, तू दिसायला काही चॉकलेट हिरो नाही. बॅड गाय व्हायला तुला काही फार अॅक्टिंगही करावी लागणार नाही. मी केला मग तो रोल. डरमधला.
एक सांगतो, भीती वाटतेच. सगळ्यांना वाटते. पण त्या भीतीला जरा मोकळं सोडा. भीतीच्या खोक्यात स्वत:ला बांधू नका. त्यांनाच तुमचं धाडस बनवा. मी खात्रीनं सांगतो, तुमचं काही वाईट होणार नाही. पण जर भीती भीती करत केलीच नाही एखादी गोष्ट तर मग सारंच गाडं घसरेल. आयुष्यात तुम्हाला काहीही जमणार नाही. ज्याची भीती वाटते ती गोष्ट करायची, एवढाच सिम्पल नियम!
प्लॅनिंगच्या भानगडीत न पडता, न डरता जे वाटेल ते करा नी मोकळं व्हा!
कभी हां, कभी ना
खोटं बोलत बोलत, कन्फ्यूज झालेला हा तरुण. तसं कन्फ्यूजन अनेकांचं असतं. पण आपण कन्फ्यूज आहोत म्हणून वाईट वाटण्याचं काही कारण नाही. उगीच अति आत्मविश्वासामुळे लोकांशी उद्धट वागण्यापेक्षा आपण कन्फ्यूज असलेलं बरं! नवीन काहीतरी वाटा शोधत राहतो. त्यामुळे घाबरू नका. तुमची तत्त्वं सांभाळा. इतरांशी स्पर्धा करू नका. आपली तत्त्वं आपल्याला इतरांपेक्षा उत्तम नाही बनवत, तर ते सर्वोत्तम बनवतात.
त्यामुळे कन्फ्यूजनचं टेन्शन घेऊ नका. आपली वाट शोधा, ती सापडतेच!
ुगुड्डू
अशा नावाचाही एक सिनेमा मी केला होता.
माङया गर्लफ्रेण्डचे डोळेच अपघातात जातात. त्यात माङया मेंदूत टय़ुमर. माङो वडील, आई, मी सगळेच तिला डोळे दान करायला भांडत असतो. शेवटी माझी आई मरते, जाताना तिला डोळे देते. मी वाचतो, मग सुखात जगतो अशी काहीशी कथा.
यातून हा एक पुढचा धडा. आयुष्य फक्त घेत राहणं नव्हे, द्यायला शिका. आणि देणं म्हणजे इतरांवर उपकार करणं नव्हे. द्यायची स्वत:ला सवय लावणं. तुम्ही कुणीही असा, कितीही यशस्वी आणि श्रीमंत व्हा, मित्रंना महागडय़ा गाडय़ा देण्याची ऐपत कमवा, आपल्याला जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्यासारखी मोठी गोष्ट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांचं ऐकून घेत, त्यांना साथ देण्याइतकी मोठी गोष्ट नाही. तेव्हा देत राहा. मिळेल काय याचा विचार न करता!
कभी खुशी कभी गम
जगण्याची हीच तर गंमत आहे. कधी यश मिळतं, कधी अपयश. कधी गणितं चुकतात, कधी सहज जमतात. त्यामुळे मनापासून जगा. दिल से. स्वत:वर प्रेम करा. स्वत:च्या माणसांवर करा. स्वपAांवर, जगण्यावर, कामावर, तुमच्या मित्रंवर, शत्रूंवरही प्रेम करा. तुमच्या मनाच्या क्षमता अफाट आहेत आणि जगण्याच्या शक्यताही. कुढू नका. आणि कुणी तुम्हाला फसवलं, डिवचलं, नाकारलं तरी विश्वास ठेवा, त्यात तुमची चूक नाही. विसरून जा. जगणं असंच तर सुंदर बनतं!
( शाहरुख खाननं ‘डॉक्टर’ पदवी स्वीकारताना एडीनबर्ग विद्यापीठात केलेल्या भाषणाचा मुक्त आणि संपादित अनुवाद संबंधितांच्या सौजन्यानं.)