‘ते’ अॅडिक्शन वाढण्याची 3 कारणं
By Admin | Updated: October 1, 2015 18:08 IST2015-10-01T18:08:38+5:302015-10-01T18:08:38+5:30
भारतात आजच्या घडीला पोर्न पाहणा:यांच्या एकूण संख्येत बायकांचं प्रमाण 30 टक्के आहे.

‘ते’ अॅडिक्शन वाढण्याची 3 कारणं
>भारतात आजच्या घडीला पोर्न पाहणा:यांच्या
एकूण संख्येत बायकांचं प्रमाण
30 टक्के आहे.
पोर्न साइट्सला रोज एकदा तरी भेट देणा:यांत
महिलांचं प्रमाण आहे 26 टक्के
इंटरनेट आणि पोर्न अॅडिक्शन हा विषय फक्त मुलांपुरता किंवा शहरी मुलामुलींपुरता उरलेला नाही. स्मार्टफोन हातात आले आणि त्यावर दहा-वीस रुपयांचं नेटपॅक मारता येऊ लागलं तसं हे अॅडिक्शन ग्रामीण भागात आणि विशेषत: तिथल्याही मुलींर्पयत पोहोचलं.
आणि भीती अशी आहे की, जसंजसं इंटरनेटचा वापर वाढेल तसतसं हे अॅडिक्शन वाढण्याचा धोका आहेच. काही दिवसांपूर्वी जेव्हा पोर्नबंदीची चर्चा देशात सुरू होती तेव्हा एका न्यू यॉर्कच्या एका वेबसाइटने एका पोर्नसाइटच्या मदतीनं भारतातल्या व्हिजिटर्सचा एक सव्र्हे केला.
त्यांची निरीक्षणं म्हणतात की, भारतात आजच्या घडीला पोर्न पाहणा:यांच्या एकूण संख्येत बायकांचं प्रमाण 30 टक्के आहे.
विशेष म्हणजे साधारण वय पाहता 198क्नंतर जन्मलेल्या आणि आता तरुण असलेल्या पिढीतल्या महिलांना हे अॅडिक्शन जास्त आहे.
दिवसातून एकदा तरी पोर्न साइट्सला भेट देणा:या महिलांचं प्रमाण एकूण व्हिजिटर्सपैकी 26 टक्के आहे असंही आकडेवारी सांगते.
हे प्रमाण वाढतंय का?
महिलांमधल्या वाढत्या अॅडिक्शनची कारणंही या अभ्यासात सापडतात.
1) स्मार्टफोन
हे सगळ्यात मोठं कारण. हातातला स्मार्टफोन, त्यातलं इंटरनेट यामुळे अॅक्सेस वाढला. सोपा झाला. आणि मोकळ्या वेळात, कुणाला काही कळू न देता अनेक गोष्टी पाहणं बायकांना सोपं झालं. एरव्ही सायबर कॅफेत किंवा घरातल्या कम्प्युटरवर तसलं काही पाहणं शक्य नसे, पण आता हाताला फोन हेच एक मोठं साधन बनलं आहे.
2) एकटेपणा आणि ब्रेकप
अनेक तरुण मुलींच्या संदर्भात हे कारणही मोठं आहे. पूर्वी एकटेपणा आणि ब्रेकपमुळे रडत बसणा:या मुलींना आता नेट नावाचा जोडीदार मिळाला आहे. त्यामुळे आपला एकटेपणा घालवण्यासाठी इंटरनेटवर सतत नाही नाही त्या गोष्टी पाहिल्या जात आहेत.
3) थ्रिल आणि कुतूहल
तारुण्यात थ्रिल हवं असतंच, लोक जे करू नये म्हणतात तेच करून पाहण्याची बंडखोरीही असते. त्यातूनच केवळ, थ्रिल आणि कुतूहलापोटी अनेक मुली ते सारं पाहतात आणि मग व्यसन म्हणून त्यात अडकत जातात.
(आकडेवारी संदर्भ- द डेली बिस्ट आणि मिक डॉट कॉम.)