- तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!!
By Admin | Updated: March 12, 2015 15:06 IST2015-03-12T15:06:13+5:302015-03-12T15:06:13+5:30
तुम्हाला वाटतं; नाहीच जमणार आपल्याला? - तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!!

- तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!!
तुम्हाला वाटतं; नाहीच जमणार आपल्याला?
- तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!!
**
तुम्हाला वाटतं,
आपण काय गरीब-बिच्चारे!
मग आहाताच तुम्ही -बिच्चारे!!
**
तुम्हाला वाटतं, आपल्यात काय
नाही तेवढी हिंमत!
मग नसेलच ती हिंमत तुमच्यात!!
**
तुम्हाला वाटतं जिंकावंसं!
पण वाटतं, अपनी तो हार है.
तर मग हरणारच तुम्ही,
कायमच!!
**
खात्री बाळगा, जे तुम्हाला वाटतं
तेच होतं!
त्यामुळे तुम्हाला काय वाटतं,
तुम्ही काय विचार करता हे महत्त्वाचं!
तुम्ही म्हणाल, जमेल मला!
तर नक्की जमेल तुम्हाला.
तुम्ही म्हणाल, नाहीच जमणार,
तर नाहीच जमणार ते तुम्हाला!
तुम्हाला काय वाटतं ते महत्त्वाचं!!
**
मोठी स्वप्न पाहा.
मेहनतीचं बी रुजवा,
यशाचे कोंब नक्की फुटतील!
**
मग विचारा स्वत:ला,
जमेल मला!!
उत्तर तुमचं तुम्ही द्या.
म्हणा, जमेल मला!
आणि जादू पहा.
ती गोष्ट नक्की जमेल तुम्हाला!!
**
तुम्हाला वाटतं,
लोक तुम्हाला कमी लेखतात,
तर खरंच लोक तुम्हाला कमी लेखतील.
त्यापेक्षा सांगा स्वत:ला,
मला कुणी कमी लेखूच शकत नाही,
कारण मी कशातच कमी नाही!
**
स्वत:ला मान द्या,
स्वत:वर भरवसा ठेवा,
सांगा स्वत:ला, जमेल मला.
- तर खरंच जमेल तुम्हाला!
**
पण
तुम्हाला वाटतं; नाहीच जमणार आपल्याला?
- तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!!
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या एका इंग्रजी मुक्तछंदाचा स्वैर अनुवाद)