बोटावर टॅटू अंगठी
By Admin | Updated: October 15, 2015 17:33 IST2015-10-15T17:33:40+5:302015-10-15T17:33:40+5:30
नवरात्रात नटून थटून गरबा-दांडिया खेळायला जाणा:यांमध्ये यंदा एक नवीन ट्रेण्ड आहे.. टॅटू करून घेण्याचा. पण परमनण्टट टॅटू नव्हे तर टेम्पररी टॅटू. तेही बोटांवर. आणि अंगठय़ांसारखे!

बोटावर टॅटू अंगठी
नवरात्रात नटून थटून गरबा-दांडिया खेळायला जाणा:यांमध्ये यंदा एक नवीन ट्रेण्ड आहे.. टॅटू करून घेण्याचा. पण परमनण्टट टॅटू नव्हे तर टेम्पररी टॅटू. तेही बोटांवर. आणि अंगठय़ांसारखे!
सध्या याच एक वेडानं अनेक तरुण मुलामुलींना खुळ लावलंय.
म्हणजे काय तर हाताच्या एका बोटावर किंवा पायाच्याही बोटावर अंगणीसारखा गोलाकार किंवा उभट-लांबुळका टॅटू करायचा.
लांबून पाहणा:याला अंगठीच घातलेली आहे असं वाटतं.
पण जवळ गेल्यावर कळतं की, हा तर टॅटू आहे.
काहीजण आपल्या ‘त्याचं’ किंवा ‘तिचं’ नावही बोटावर अंगठीसारखं लिहिताहेत.
वेडिंग रिंग असल्यासारखं!
तर काहीजण पानं-फुलं आणि अन्य डिझाईन्स.
ुकुणाकुणाच्या एकाच बोटावर टॅटू दिसतो तर कुणाच्या दहाही बोटांवर रिंग टॅटू सजतो.
पायाच्या अंगठय़ावरही टॅटू काढले जाताहेत.
त्यामुळे या टेम्पररी अंगठीवाल्या टॅटूंची सध्या चांगलीच धूम आहे..
एक भन्नाट फॅशन टीप.
तुम्हाला अलमोस्ट फुकटात टॅटू काढून मिळू शकतो. कसा?
सोप्पंय.
मेहंदीचा कोन घ्या.
आणि बोटांवर अंगठी टॅटू काढा.
तेही खूप सुंदर आणि वेगळं दिसतं!
ट्राय इट!
- श्रवणी बॅनर्जी