टॅटूवाला पीएम

By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30

कॅनडाला लाभलाय फक्त 42 वर्षाचा तरुण पंतप्रधान. ज्याच्या दंडावर टॅटू आहे, जो फॅशनेबल आहे, बॉक्सर आहे, शिक्षक आहे आणि रिअल चेंजची मागणी करत नवा देश घडवायला निघालेला धडाडीचा राजकारणी आहे. राजकारणाला तरुण नेतृत्व हवं, म्हणणा-या जगभरातल्या ट्रेण्डचा तो एक प्रतिनिधीच आहे.

Tattoo PM | टॅटूवाला पीएम

टॅटूवाला पीएम

>नेता म्हटला की तो खूपच अनुभवी असावा, राजकारणात प्रदीर्घ काळ व्यतीत केलेला असावा म्हणजे मगच त्याच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता येते अशी काहीशी संकल्पना आपल्याकडे आहे. कॅनेडियन लोकांनी मात्र अशा पारंपरिक संकल्पनांना छेद देत एकदम नव्या को:या आणि तरुण चेह:याला पंतप्रधानपदी निवडून दिले आहे. वयाच्या 42 व्या वर्षीच लिबरल पक्षाच्या जस्टीन ट्रुडो यांना कॅनडाचे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे.
जगभरातला तरुण, फॅशनेबल, ट्रेण्डी आणि तितकाच सडेतोड नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे.
गेली दहा वर्षे कॅनडामध्ये कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाची सत्ता होती. प्रचंड लोकप्रियता लाभलेले स्टीफन हार्पर हे दशकभर पंतप्रधानपदी होते. त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमादेखील मोठी होती. त्यामुळे कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाला आव्हान देणो हे तितकेसे सोपे नव्हते. पण सर्व अडथळ्यांना तोंड देत जस्टीन यांनी आपल्या पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. जस्टीन ट्रुडो यांनी 2क्13 मध्ये लिबरल पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जस्टीन हे अत्यंत लहान असून, नेतृत्व करण्यास पक्व नाहीत, असे मत अनेक राजकीय पंडितांचे होते. मात्र कॅनडाला ख:या बदलाची गरज आहे असे सांगत ‘रिअल चेंज’ अशी घोषणाच त्यांनी दिली होती आणि जिंकूनही दाखवलं.
जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची आई मार्गारेट आणि वडील पिएरे विभक्त झाले. त्यानंतर कॅनडाच्या मॅकगील विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फ्रेंच आणि गणित शिकविण्याचे काम करू लागले. वर्ष 2क्क्क् पासूनच त्यांनी पक्षाच्या कामामधे अत्यंत तरुण वयात असतानाच लक्ष देण्यास सुरुवात केली होती. 2क्क्8 मधे पॅपिनेऊ मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
 आता हा नवा नेता केवळ वयाने तरुण आहे म्हणून युवा नेता नाही हे त्यांनी आपल्या अनेक मतांमधून आणि कृतीमधूनही दाखवून दिलेले आहे. बॉक्सिंग आणि रिव्हर राफ्टिंगच्या छंदामुळेही ते अधिकाधिक चर्चेमधे आहेत. इतकेच नाही तर राजकारणामधे असताना 2क्12 मधे कर्करोगाच्या संशोधनासाठी निधी जमविण्यासाठी त्यांनी कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाचे खासदार पॅट्रिक ब्राङोव्हू यांच्याशी बॉक्सिंगचा सामना खेळून जिंकूनही दाखवला. माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचा मुलगा या ओळखीपेक्षा या सामन्यामुळे संपूर्ण कॅनडाभर जस्टीन प्रसिद्ध झाले. कॅनडातील प्रसारमाध्यमांनी आपल्याकडे वळविलेला मोहरा 2क्15 र्पयत टिकवून ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. सर्वसामान्य तरुणांच्या मनातील प्रश्नावर बोलणं, कधी एखाद्या कार्यक्रमात स्वत: सहभाग घेणं, सार्वजनिक ठिकाणी भीड न बाळगता प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणं ही सगळी पद्धत कॅनेडीयन मतदारांना प्रचंड भावली. सर्वात उल्लेखनीय म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत अकृत्रिम अशी होती. त्याचा परिणाम मतदानात दिसून आला. आधीच्या सरकारची ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरणाचे प्रश्न हाताळण्याची पद्धती, स्थलांतरितांना, आश्रय मागणा:यांना वागवण्याची योजना यावर ट्रुडो यांनी सडकून टीका केली होती आणि स्वत:ची उदारमतवादी प्रणाली मांडली होती. त्यांच्या अनेक मुद्दय़ांवर आक्षेपही नोंदविण्यात आले आहेत. कॅनडाने गांजाचे सेवन कायदेशीर ठरवावे अशी त्यांनी केलेली मागणी अत्यंत वादग्रस्त ठरली होती. आताही सत्तेमधे येताच इराक आणि सीरियामधे इसिसविरोधात लढणारी कॅनडाची एफ-35 लढाऊ विमाने मागे बोलावण्याचा निर्णय त्यांनी 24 तासांच्या आत घेतला, तर 26 हजार सीरियन स्थलांतरितांना स्वीकारत असल्याचेही जाहीर केले. यावरही कॅनडामधे अनेकांनी टीका केली आहे.
असे असले तरी आगामी काळामधे जस्टीन यांना कॅनेडियन नागरिकांनी सोपविलेली जबाबदारी समर्थपणो पार पाडून दाखवावी लागणार आहे. हार्पर यांच्याप्रमाणो आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची केवळ छापच नव्हे, तर स्वतंत्र प्रतिमा तयार करावी लागणार आहे. पक्व राजकारणासह देशांतर्गत मुद्दय़ांवर भर देत विविध वांशिक, फ्रेंच-इंग्रजी भाषिक गटांना सांभाळून घेत काम करायचे आहे. वाट सोपी नाहीच. बघायचं आता, हा जगभरात कौतुकाचा विषय ठरलेला तरुण नेता नक्की काय करतो ते!
- ओंकार करंबळेकर
 
 
 
बाळाचे पाय पाळण्यात. 
जस्टीनचे बाबा प्रिएरे कॅनडाचे लोकप्रिय पंतप्रधान होते. तत्कालीन आंतरराष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. प्रिएरे पंतप्रधानपदी असताना 1972 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन कॅनडाच्या अधिकृत राजकीय भेटीसाठी आले होते. कॅनडा सरकारतर्फे देण्यात आलेल्या भोजनावेळेस निक्सन यांनी आय वाँट टू टोस्ट विथ फ्युचर प्राईम मिनिस्टर ऑफ कॅनडा असे म्हणत केवळ काही महिने वयाच्या जस्टीनकडे पाहत पेयाचा चषक उंचावला होता. एकेदिवशी हादेखील पंतप्रधान होईल हे निक्सन यांचे भाकीत खरोखरच वास्तवात आले आहे.
 
टॅटूवाला पीएम
जस्टीन सध्या तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत आहेत. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. दंडावर टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत. हा टॅटूदेखील चर्चेचा विषय झाला असून, ते तरुणांना अधिकच जवळचे वाटू लागले आहेत.
 
 
बॉक्सर, टीचर, अॅक्टर, प्राईम मिनिस्टर
बॉक्सिंग करणारा, शाळेत शिकवणारा हा आगळावेगळा पंतप्रधान कॅनडाला लाभला आहे. त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित द ग्रेट वॉर या सिनेमातही त्यांनी काम केले आहे. 

Web Title: Tattoo PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.