शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

टेक-बदल...तंत्रसंस्कृतीचा फायदा करून घेतला तर आपणही सीमोल्लंघन करू शकू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 05:00 IST

तंत्रसंस्कृती नवं जगणं जन्माला घालत आहे, त्याचा फायदा करून घेतला तर आपणही सीमोल्लंघन करू शकू ! डिजिटल माध्यमांची ताकद न ओळखता डेटा पॅक खर्चून व्हायरल पोस्ट पुढे ढकलत फक्त आचरट व्हिडीओ पाहण्यातच आपल्याला इंटरेस्ट असेल तर प्रगतीच्या संधी आपल्याला दिसणारच नाहीत. आज आपल्या प्रत्येकाच्या हाती तंत्रज्ञानाची शक्ती आहे आणि मनात आणलं तर ती वापरून आपण जादू करू शकतो...

- अनन्या भारद्वाज

परवा दसरा. सीमोल्लंघन.आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करून यशाचं सोनं लुटून आणण्याचा, सीमा ओलांडून यशाची पताका उंच फडकवण्याचा हा दिवस. आपण आजही दसºयाला प्रतीकात्मक सीमोल्लंघनाला जातो आणि घरी आल्यावर तांदुळात दडवलेलं सोनं शोधत आनंदाचं धन लुटतो.पण विचार करून पहा, आजच्या काळात जे तंत्रज्ञान आपल्या हातात आहे ते आपल्याला एका नव्या सीमोल्लंघनाची संधी देतं आहे का?या प्रश्नाचं उत्तर अर्थातच देतं आहे असेच आहे. फक्त त्या नजरेनं आपण त्याकडे पाहून हाती असलेल्या साधनांचा योग्य वापर करणं शिकून घेतलं पाहिजे. आपल्या हातातला एक स्मार्ट फोन, त्याच्यावरची इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आपल्याला आपल्याच कम्फर्ट झोन अर्थात सुरक्षित चाकोरीतून बाहेर पडायला मदत करू शकते. मुद्दा आहे तो आपण ती चाकोरी सोडणार का आणि नव्या नजरेनं तंत्रज्ञानाच्या उपयोगाकडे बघणार का?ते जर आपण करू शकलो तर आपलं भौगोलिक आणि आर्थिक बांधलेपण आपल्याला जखडून ठेवू शकणार नाही. आपण ग्रामीण भागात जन्मलो, तिथंच राहतो, इंग्रजी चांगलं येत नाही, किंवा उत्तम बोलता येत नाही, दिसायला बरे नाहीत, स्मार्ट लूक्स नाहीत इथपासून ते आपण फार हुशार नाही, आपल्याकडे फार पैसे नाहीत इथपर्यंत अगदी कुठंही ही न्यूनगंडाची घसरगुंडी जाऊ शकते. आणि आपल्याला वाटू शकतं की, आपण नाही पुढे जाऊ शकत. हीच आपली मर्यादा.पण आता असं चौकटीत स्वत:ला कोंबण्याचा काळ गेला. आता मदतीला आहे तंत्रज्ञान. मुख्य म्हणजे ते स्वस्त आहे आणि आपल्या हातात आहे. आपण त्याचा कसा वापर करणार यावर बºयाच गोष्टी अवलंबून आहेत. यंदा दसºयाला सीमोल्ंलघनाचा विचार करताना हे लक्षात ठेवायला हवं की, आपल्यालाही आपल्या चाकोरीतून बाहेर काढण्यासाठी हे तंत्रज्ञान सोबत आहे, आपल्या हातात आहे.आपण त्याचा वापर कसा करणार?तंत्रज्ञानाचं आगमन ते सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात त्याचा रोज, अपरिहार्य वापर या टप्प्यापर्यंत येता येता एक मोठी गोेष्ट घडली असं मत संस्कृतीचे अभ्यासक फोर्ब्ज नावाच्या जगप्रसिद्ध मासिकात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात मांडतात. ‘तंत्रज्ञानाने जगभर एक सांस्कृतिक बदल आणला’ असं हा अभ्यास म्हणतो. कल्चरल शिफ्ट. आणि त्या सांस्कृतिक बदलास देशांच्या, धर्मांच्या, वंशाच्या भिंती थांबवू शकल्या नाहीत. तो बदल केला तंत्रज्ञानानं आणि त्या तंत्रज्ञानावर बेतलेल्या उपकरणांनी. संवादाच्या साधनांनी. अजूनही हा बदल पूर्ण झालेला नाही आपण त्या तंत्रसांस्कृतिक क्रांतीच्या मधल्याच टप्प्यावर आहोत आणि येत्या काहीच दिवसांत पुढचे बदल आपल्या पुढ्यात उभे असतील.आणि हे सारं होत असताना त्या माध्यमांची ताकद न ओळखता आपण केवळ डेटा पॅक खर्चून व्हायरल पोस्ट पुढे ढकलत राहणार असू आणि आचरट व्हिडीओ पाहण्यातच वेळ वाया जाणार असेल तर आपण खºया अर्थानं आपल्या प्रगतीची संधी गमावत आहोत.आज प्रत्येक सामान्य तरुणाच्या हाती ही तंत्रज्ञानाची शक्ती आहे आणि मनात आणलं तर ती वापरून आपण जादू झाल्यागत आपली परिस्थिती पालटून, विकास आणि समाधान, आनंद या साºया गोष्टी जिथं आहोत तिथंच कमावू शकू.फक्त त्यासाठी आपल्याला आपला चाकोरीबद्ध जुना रस्ता बदलावा लागेल. जुनी ‘मला काय त्याचं’ टाइप्स आळशी वृत्ती सोडावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिकून घ्यावा लागेल.हे सारं कसं करता येईल याची ही काही सूत्रं.ती लक्षात ठेवली तरी आपल्याला आपल्या हातात आणि हातातल्या मोबाइलमध्ये ताकद आहे असं नक्की वाटू शकेल.त्यासाठी या काही गोष्टी मात्र सोबत हव्यात आणि भविष्यात होऊ घातलेल्या तंत्रक्रांतीचा अंदाजही !

(अनन्या मुक्त पत्रकार आहे.)