तरुणांचं SWOT अॅनालिसिस

By Admin | Updated: April 30, 2015 17:15 IST2015-04-30T17:15:08+5:302015-04-30T17:15:08+5:30

आजची तरुण पिढीची ताकद काय ? कच्चे दुवे कोणते ?

SWOT analysis of youngsters | तरुणांचं SWOT अॅनालिसिस

तरुणांचं SWOT अॅनालिसिस

>आजची तरुण पिढीची ताकद काय ? कच्चे दुवे कोणते ?
 
ताकद काय ?
1) ही पिढी अनेक गोष्टी चटकन शिकते. हुशार आहे. टॅलेण्टेड आहे. प्रचंड डेडिकेशननं काम करते.
2) पण ते जे करतात, ते स्वत:च्या मर्जीनं करतात. निर्णय त्यांचा, एकदा जे ठरवलं तेच ते करतात. मागच्या पिढय़ा या नोकरीला महत्त्व द्यायच्या. सगळं काम डय़ुटी बेस.  या मुलांना तसं वाटत नाही. पैसा आणि इतर अडचणी यापेक्षा चांगलं काम हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. तेच ते निवडतात.
3) त्यांना एक्सपोजरही खूप जास्त आहे. टेक्नॉलॉजी हातात आहे. माहिती एका क्लिकवर मिळते.  ती त्यांची ताकद आहे. माहितीसाठी ते दुस:यांवर अवलंबून नाहीत.
4) त्यांना संधीही प्रचंड आहे. भारतातलं वातावरण बदललं आहे. तुम्हाला अमूकच बनायला हवं, असं काही बंधन उरलेलं नाही. काम कुठलं हे निवडण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठीच्या संधीही आहेतच.
 
उणिवा कुठल्या ?
1) ही पिढी प्रचंड इम्पेशण्ट आहे. तरुण अधीर असतातच, पण हल्लीचे तरुण जास्तच अधीर आहेत. ते वाट पहायला तयार नाहीत.
आज काही काम केलं तर त्याचं फळ लगेच मिळायला हवं, असं त्यांना वाटतं. पैसेही पटकन हवेत, यशही; मात्र असं एका रात्रीत काही मिळत नाही हे त्यांना कळत नाही.
2) अपयश मान्य नाही. आपण कधीतरी ‘फेल’ होऊ शकतो, अपयशी ठरू शकतो, हे मान्य नाही.
पण लक्षात ठेवायला हवं की दुनिया रोज बदलतेय, आपणही बदलतोय. एकदा अपयश आलं तर परत लढू, परत करू.
एवढं काय, असं म्हणता यायला हवं !

Web Title: SWOT analysis of youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.