त्वचेला उन्हाळी
By Admin | Updated: April 16, 2015 16:44 IST2015-04-16T16:44:30+5:302015-04-16T16:44:30+5:30
वाढत्या उन्हाचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर बराच परिणाम होत असतो. उन्हाळ्यात आपली त्वचा बरेचदा काळवंडते. कोरडी पडते. त्वचेचा पोत बिघडतो.

त्वचेला उन्हाळी
>उन्हाळ्यात काळवंडणा-या त्वचेला तजेला कसा द्यायचा?
वाढत्या उन्हाचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर बराच परिणाम होत असतो. उन्हाळ्यात आपली त्वचा बरेचदा काळवंडते. कोरडी पडते. त्वचेचा पोत बिघडतो. त्वचा पॅची दिसू लागते, अर्थात त्वचेवर काळपट पॅच दिसू लागतात. त्वचेची नियमित काळजी घेतली तर आपण आपली त्वचा सुंदर-नितळ राखू शकू.
मात्र याकाळात अनेक मुलींचा प्रश्न असतो की, एवढय़ा शेकडो क्रिममधून आपल्यासाठी बेस्ट काय हे निवडायचं कसं?
1) नियमित चांगल्या प्रतीचा फेसवॉश वापरा. चांगला म्हणजे त्याच्यावर लिहिलेली माहिती वाचा. त्याचा एसपीएफ कमीत कमी 3क् ते 45 असा असलाच पाहिजे. फेसवॉश घेताना कंपनी पाहू नका. त्या बाटलीवर लिहिलेली स्पेसिफिकेशन पहा, वाचा, मग घ्या.
2) उन्हापासून त्वचेचं रक्षण करायचं तर चांगला फेसवॉशही महत्वाचा असतो.
3) रात्री चांगलं नाईटक्रीम लावा. या क्रीममधे असलेल्या व्हिटॅमिन्सचा त्वचेला खाद्य म्हणून उपयोग होईल. ग्लूकोजही मिळेल, आणि ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला होईल.
4) महिन्यातून एकदा फेशियल कराच. फेशियलमुळे रक्ताभिसरण सुधारतं. दुषित घटक बाहेर टाकायला मदत होते. त्वचेची रंध्र मोकळी होतात, त्वचा लवकर म्हतारी होत नाही ती यामुळेच!
- लीना खांडेकर