समर जॉब
By Admin | Updated: April 30, 2015 17:31 IST2015-04-30T17:31:10+5:302015-04-30T17:31:10+5:30
आज 1 मे, जागतिक कामगार दिन जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ असलेल्या ‘तरुण’ देशातल्या, ताज्या दमाच्या फौजेच्या सुट्टीची आणि त्या सुट्टीत कमावण्याच्या प्रोफेशनल अनुभवांचीही एक विशेष ‘कूल’ चर्चा !

समर जॉब
>करिअर स्पेशल -1
उन्हाळ्याच्या सुट्टीचा नवा ‘कूल’, पण मेहनती अॅटिटय़ूड !
‘उन्हाळ्याची दोन महिने सुट्टी?
करणार काय?
झोपाच काढणार आणि नुस्तं हादडणार;
गावभर उकीरडे फुंकत हुंदडणार !’
- असा टिपिकल उन्हाळी डायलॉग पूज्य पिताजींनी मारलाच
तर यंदा त्यांना ठणकावून सांगा,
‘बाबा, यंदा मी समर जॉब करणार आहे !’
पण हे रॉकिंग उत्तर द्यायचं,
तर हा समर जॉब मिळवायचा कसा?
***
‘समर जॉब करणार,
त्यातच आपला प्रोजेक्टपण उरकून घेणार;
पण छोटय़ामोठय़ा कंपनीत नाही मी काम करणार?
आणि केलंच तरी, फक्त दोन तास!
आपून अपनी शर्तो पे जिता है !’
- अशा गुर्मीत तुम्ही घराबाहेर पाऊल ठेवलं
तर खुश्शाल समजायचं की,
आपल्या करिअरच्या गाडीची चारही चाकं,
पंर आहेत!
का? - शोधा उत्तर !
***
समर जॉब म्हणून काम मागायला
जाताना लाज वाटते?
भीतीच वाटते तोंड उघडायची,
आपल्याला लोकं शिपायाची कामं सांगतात,
असं वाटतं?
- मग कराच तुम्ही समर जॉब
कारण, हेच सारं पुढे तुमच्या
‘सीव्ही’ला इतरांपेक्षा वेगळं बनवेल!
कसं?
- तीच तर खरी गंमत आहे!!
***
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या लेखिका रश्मी बन्सल सांगतात,
एका आयआयएमवाल्या तरुणाला फेमस जर्मन कंपनीनं बडी ऑफर दिली,
खरं तर त्यावेळी सगळ्यांचे सीव्हीसारखे, टॅलण्टसारखं!
मग या तरुणात वेगळं काय होतं,
तर लहानपणी परिस्थिती वाईट असल्यानं,
त्यानं घरोघर जाऊन पेपर टाकले होते !
मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये काम करणा:या
त्या कंपनीनं त्याचा पेपर टाकण्याचा, आणि मीडियाशी संबंधित असण्याचा
अनुभव मोलाचा म्हणून गृहीत धरला !
- म्हणजे काय तर अनुभव, मेहनत आणि त्यातून आलेलं
शहाणपण हे कागदावरच्या डिग्य्रांपेक्षा वेगळं दिसतं!
ते कमवायचं तर कॉलेजकाळातली सुट्टी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी!
त्या संधीचा एक चेहरा
समर जॉब्ज !
***
कदाचित तुम्हाला माहितीही नसेल, पण
बडय़ा कंपन्या, बडे ब्रॅण्ड सध्या तरुणांना
स्वत:हून म्हणतातहे की,
आमच्याकडे या,
इण्टर्न व्हा, काम करा.
ते का?
**
या सा:या प्रश्नांची उत्तरं द्यायचं म्हणून तर हा विशेष अंक,
देशात मेक इन इंडियाचे नारे सुरू असताना
तरुण मनुष्यबळानं वेळीच
अनुभव कमवत व्यावसायिक जगात शिराव.
म्हणून हा उन्हाळी सुट्टीचा एक खास उपक्रम..