ग्रामीण-मागास-दुर्गम भागातून विद्यार्थी दिल्लीत, जेएनयूत येऊन शिकतात, ते ‘शिकणं’ काय असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 07:00 AM2020-01-23T07:00:00+5:302020-01-23T07:00:04+5:30

जेएनयूमध्ये शिकणं म्हणजे भारतीय संविधानातील मूल्यांसोबत उभं राहाणं, विरोधातील आवाज ऐकून घेताना, तिचा आदर करतानाच भूमिका घ्यायला शिकणं..

Students from rural, backward and remote areas come to JNU in Delhi, what they get there? | ग्रामीण-मागास-दुर्गम भागातून विद्यार्थी दिल्लीत, जेएनयूत येऊन शिकतात, ते ‘शिकणं’ काय असतं?

ग्रामीण-मागास-दुर्गम भागातून विद्यार्थी दिल्लीत, जेएनयूत येऊन शिकतात, ते ‘शिकणं’ काय असतं?

Next
ठळक मुद्देसांगा, आज अशी कोणती जागा आहे जिथे मागास, सामान्य गरीब घरातली तरुण मुलं आणि अतिशय उच्चभ्रू घरातली तरुण मुलं एकाच बाकावर बसून शिक्षण घेतात?

- साजिद इनामदार

आजच्या ‘अपॉलिटिकल’ अर्थात ‘अराजकीय’ असण्यावर भर देणार्‍या ‘एण्ड ऑफ आयडीयॉलॉजी’ अर्थात राजकीय-सामाजिक ‘विचारधारांचा अंत’ झालाय असे म्हणणार्‍या युगात जेएनयूच्या प्रवेश प्रक्रि येचा फॉर्म भरून येथे शिकण्याचा निर्णय घेणे हीच मुळात एक ‘पॉलिटिकल’ अर्थात राजकीय कृती असते. राजधानीच्या शहरात असल्यामुळे मिळणार्‍या एक्स्पोजरमुळे म्हणा अथवा जेएनयूशी निगडित कोणत्याही मुद्दय़ाला मिळणार्‍या वारेमाप प्रसिद्धीमुळे म्हणा, हा प्रवेश अर्ज भरणार्‍याला सर्वसाधारण कल्पना असतेच की या पुढील विद्यार्थी जीवनात आपल्या पुढे काय वाढून ठेवले असणार आहे.
जेएनयूत प्रवेश मिळाला की, आपापल्या गाव-शहरातून निघत विद्यार्थी जुलै अखेर हजरत निजामुद्दीन स्टेशनवर उतरतात. आपला लवाजमा घेऊन स्टेशन बाहेर पडताच, तुम्हाला अचूक हेरून ‘जेएनयू चलना है क्या? असे विचारणार्‍या टॅक्सी चालकांपासून जेएनयूच्या प्रवासाची सुरुवात होण्याचे चान्सेस खरेच जास्त असतात. साउथ दिल्लीतील अतिशय निसर्गसंपन्न आणि जवळपास हजार एकरवर विस्तीर्ण पसरलेल्या कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच त्याचे अतिशय सर्वसाधारण म्हणता येईल असे प्रवेशद्वार पाहून तुम्हाला प्रश्न पडतो की ज्या विषयी इतके ऐकले होते ते विद्यापीठ नक्की हेच आहे का? त्यानंतर तुम्ही पोहोचता अगोदरच नंबर मिळवलेला ‘तुमच्या मित्नाच्या किंवा मित्राच्या मित्नाच्या रूमवर!
दुसर्‍या दिवशी संमेलन केंद्रावर प्रवेश प्रक्रि येचे सोपस्कार पार पाडण्यासाठी गेल्यावर जेएनयूमधील विविध ‘लाल छटां’ (यातील बहुतेक संघटना फक्त या कॅम्पसपुरत्या मर्यादित असतात)पासून तर बिरसा-आंबेडकर-फुलेवादी बापसा, काँग्रेसची एनएसयूआय आणि संघाची एबीव्हीपी अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थी संघटनांचे मंडप असतात. अर्थात, सर्वात भव्य-दिव्य मंडप एबीव्हीपीचाच! तुम्ही हे सर्व निरीक्षण करत असता-नसता तोर्पयत तुम्हाला या विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थी प्रतिनिधी-स्वयंसेवकांनी गराडा न घातला तरच नवल. त्या नंतर यातील कोणी एक कार्यकर्ता तुम्हाला त्यांच्या मंडपात घेऊन जाऊन क्लिष्ट भासणारा फॉर्म अतिशय सफाईने भरून देतो. तुम्हाला सर्व प्रकिया व्यवस्थित समजावून सांगून आपला संपर्क देऊन संमेलन केंद्रात सोडून येतो. या प्रवेश प्रक्रि येदरम्यानचा शेवटचा धक्का तेव्हा बसतो जेव्हा हे लक्षात येते की येथील प्रत्येक सहामाहीची शैक्षणिक फी (टय़ुशन फी) फक्त 250 रुपये आहे. आपण पुन्हा पुन्हा विचारत राहातो की अजून कोणती फी भरण्याची राहिली आहे का? हजारो-लाखो रु पये देऊन शिक्षण घेण्याची सवय लागलेल्या आमच्या सारख्यांसाठी यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी जेएनयूत ही शक्यता प्रत्यक्षात खरी होताना आपण पाहातो.  
जेएनयूची प्रवेशप्रक्रिया अजूनदेखील सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अतिशय पुरोगामी आहे. सर्वसाधारणपणे मुलींना आणि सामाजिक-आर्थिक दृष्टय़ा मागास व दुर्गम भागांमधून येणार्‍या मुला-मुलींना विद्यापीठात प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर प्रत्येक अभ्यासक्र मातील प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झालेल्या आणि एससी-एसटी आणि अपंग प्रवर्गातील विद्याथ्र्याना पहिल्याच दिवशी होस्टेल दिले जाते.
प्रवेश प्रक्रि येचे क्लिष्ट सोपस्कार पार पडल्यावर हा विस्तीर्ण कॅम्पस एक्स्प्लोर करणे सुरू  होते. पीएसआर, रिंग रोड, मामू का ढाबा, टी-पॉइंट, ‘ओफिशियल प्रोटेस्ट साइट’- साबरमती ढाबा, टेफ्लाज, निलगिरी ढाबा, केसी, गंगा ढाबा, ट्रिपल एस, एसएल-एसआयएस आदी शब्द हळूहळू परवलीचे होऊ लागतात. स्कूल एरिया आणि आठ मजली लायब्ररीची इमारत यांच्या भिंतीवरील पॉलिटिकल ग्राफिटी आणि मोठी पोस्टर्स ज्यात आंबेडकर, मार्क्‍स, फुले, बिरसा यांपासून ते माल्कॉम एक्स, चे गव्हेरा, रोजा लक्झम्बर्ग आदी सर्वच असतात जे आपले लक्ष वेधून घेतात. एव्हाना प्रशासनाने या ग्राफिटीज ‘स्वच्छ  जेएनयू’ या उपक्र मांतर्गत फाडून टाकून या भिंती आणखीनच ‘अस्वच्छ’ आणि बकाल केल्या आहेत; पण यातून हार मानतील ते  जेएनयूचे विद्यार्थी कसले. ही भित्तिचित्ने फाडून टाकल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून विविध विद्यार्थी संघटनांनी पुन्हा नव्या जोमाने ही मोठी पोस्टर्स बनवण्यास सुरु वात केली आणि अवघ्या काही दिवसात पुन्हा जेएनयूच्या भिंतींवर आंबेडकर, फुले, बिरसा झळकू लागले. तर ही अशी येथील रेझिस्ट करण्याची पद्धत!
ही पोस्टर्स, ग्राफिटीज, वाटेत दिसणारे कित्येक मोर आणि नीलगाय, पोपट, विविध पक्षी, कधीकधी कोल्हे तर कधी साळींदर पाहत दररोजच्या वर्ग तासिकांना जाणे आणि तेथून आपण ‘थर्ड रूममेट’ असलेल्या रूमवर संध्याकाळी परत येणे सुरू होते. तुमचा रूममेट केरळचा, तर तुमचा शेजारी उत्तर प्रदेश, बिहार किंवा नागालँडचा. कधी वर्गात तुमच्या बरोबर बाकावर बसलेला मित्न राज्यस्थानचा, तर कधी दोन तासिकांच्या मधील सुट्टीत चहा पितापिता तुमची बंगाली मित्न-मैत्रिणींबरोबर (मैत्नीण असण्याची शक्यता जास्त) ओळख होते. महाराष्ट्रीयन विद्याथ्र्याची बंगाली विद्याथ्र्याबरोबर इतक्या लवकर गट्टी कशी जमून जाते हे कोडे अजूनही मला सुटलेले नाही! हळूहळू देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि विविध सामाजिक-आर्थिक पाश्र्वभूमीतून आलेल्या सर्वानाच हा ‘आयलंड कॅम्पस’ सामावून घेऊ लागतो, सर्वाना आपलेसे करू लागतो.
कॅम्पसमध्ये येऊन महिना झालेला नसतो तर कॅम्पसमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागतात, विविध चर्चासत्ने, ज्येष्ठ पत्नकार, विचारवंत यांचे ‘पोस्ट-डिनर मेस टॉक्स (जे अगदी मध्यरात्नीर्पयत चालतात), वेगळ्या धाटणीच्या परंतु अतिशय आशयपूर्ण आणि प्रसंगोचित चित्नपटांचे स्क्र ीनिंग सुरू होते. निवडणुका जवळ आल्यावर रूम टू रूम, मेस कॅम्पेन, ढाबा कॅम्पेन आदी जोरात सुरू होतात. ‘मेस परचा’, होस्टेल्स-स्कूल बिल्डिंग्सवरील पोस्टर्स यामधून आपापल्या संघटनांचा, विचारधारेचा प्रचार सुरू होतो. निवडणूकसंबंधीच्या चर्चा-खलबते हळूहळू तुमच्या जीवनाचा भाग होऊ लागतात. कितीही अपॉलिटिकल राहण्याचा प्रयत्न केला तरीही इथले वातावरण तुम्हाला भूमिका न घेण्याची मुभा देत नाही. ‘पर्सनल इज पोलिटिकॅल’ हा महत्त्वाचा धडा येथील राजकारण शिकवून जाते.
निवडणुका झाल्यानंतर काही दिवसातच मीड सेमिस्टर एक्झाम्स येऊन ठेपलेल्या असतात. मात्न येथील परीक्षांमुळे कसलेही दडपण येत नाही. या परीक्षा देताना हमखास शिक्षक विद्याथ्र्यासाठी चहा, कॉफी, सरबत मागवतात. त्यामुळे परीक्षा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात.
इथं विद्यार्थी आणि शिक्षकांचे नातेही शिकवण्यापलीकडे मर्यादित राहात नाही. कित्येक वेळी असे होते की सकाळी तुम्ही सायकल चालवण्यासाठी होस्टेलबाहेर चालला आहात आणि तुमची गाठ मॉर्निग वॉकला  निघालेल्या प्रोफेसरशी पडते. इतकेच काय तर कि त्येक प्रोफेसरांनी जेएनयूमध्ये मागील काही दिवसांपासून चाललेल्या आंदोलनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या घरी आमच्या तासिका घेतल्या आहेत. या तासिकांच्या दरम्यान प्रोफेसरांनी बनवलेला चहा/ कॉफी आणि बिस्किट्स घेत आम्ही शिकण्याचा आनंद लुटला आहे. हेच कारण आहे की इथे शिक्षक आणि विद्याथ्र्यामध्ये अगदी मैत्नीचे नाते निर्माण झालेले असते. ते विद्याथ्र्याना आपल्या पालकांच्या सम भासतात. अशा अनेक लहान-मोठय़ा गोष्टींमध्ये जेएनयूच्या विद्यार्थी जीवनाचे वैशिष्टय़ दडलेले आहे.
जेएनयूमध्ये मागील 70 दिवसांपासून चाललेल्या आंदोलनाविषयी बरे-वाईट खूप काही लिहिले गेले आहे; परंतु या आंदोलनाच्या मागील एक मूळ भूमिका अगदी सुरु वातीपासूनच ही राहिली आहे की जेएनयूत जे सर्वसमावेशक आणि माफक दरातील दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे ते फक्त जेएनयूपुरते मर्यादित न राहाता इतरही सरकारी विद्यापीठं आणि कॉलेजेसमधून दिले जावे. म्हणजेच जेएनयू हे ‘एक्ससेपशन’ न राहाता ‘रु ल’ बनावा. 
जेएनयू फक्त जनतेच्या पैशांवर चालणारे केंद्रीय विद्यापीठ नसून हे एक असे स्वप्न आहे जिथे आपल्या विरु द्ध विचारांचा आदर केला जातो. त्यास चालना दिली जाते, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो, शोषितांचा आवाज बुलंद केला जातो. सांगा, आज अशी कोणती जागा आहे जिथे मागास, अतिसामन्यातील सामान्य घरातला मुलगा आणि अतिशय उच्चभ्रू घरातील विद्यार्थी एकाच बाकावर बसून शिक्षण घेतात? इथे शिकणारे अनेकजण पुढे जाऊन नोबेल विजेते, विदेश मंत्नी, गृहमंत्नी, अर्थशास्त्नी, वैज्ञानिक, अगणित सरकारी अधिकारी, विद्वान, राजकीय नेते, पत्नकार इ. बनतात? आजच्या पौरु षसत्ताक जगात इथे महिला नेतृत्वाला नेहमीच चालना दिली जाते. त्यामुळेच जेएनयूसारख्या संस्थाचा समर्थनार्थ उभे राहाणे, त्यांचे जतन करणे म्हणजे भारतीय संविधानातील मूल्यांसोबत उभे राहाणे आणि या मूल्यांचे जतन करण्यासारखे आहे.  


(साजिद जेएनयूमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि क्षेत्न अध्ययन या विषयात 
पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)
 

Web Title: Students from rural, backward and remote areas come to JNU in Delhi, what they get there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.