शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

देशात पहिली आलेली एक जिद्दी मुलगी

By admin | Published: September 03, 2015 9:15 PM

‘तुम्ही अपंग आहात. तुम्हाला हे काम करता येणार नाही. सफाई कामगार म्हणूनही तुम्ही पात्र ठरणार नाही..’

- ईरा सिंघल

 
‘तुम्ही अपंग आहात. तुम्हाला हे काम करता येणार नाही. सफाई कामगार म्हणूनही तुम्ही पात्र ठरणार नाही..’
असं ईराला स्पष्ट सांगण्यात आलं. खरंतर अपार कष्ट करून तिनं 2010 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात यश मिळवत इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिस (आयआरएस) साठी ती पात्रही ठरली; मात्र तुम्ही अपंग आहात असं कारण सांगत, तिला अकार्यक्षम ठरवून हे पद नाकारण्यात आलं. यामुळं ईरा हादरून गेली. पण तिनं ठरवलंच की, आपण जर हे काम करू शकतो तर हे पद पुन्हा मिळवायचंच. जिद्दीनं तिनं सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (कॅट)मध्ये अपील केलं. एक नवी लढाईच सुरू केली. ती सोपी नव्हतीच. मणक्याच्या आजारामुळं साडेचार फूट उंची आणि एका हाताने फारसं काम करता न येणा:या ईराला आपण प्रशासकीय सेवेसाठी सक्षम असल्याचे अनेक पुरावे द्यावे लागले. सतत स्वत:ला सिद्ध करावं लागलं. तिच्या जिद्दीपुढं ‘कॅट’नेही मान्य केलं की ईरा सर्वार्थानं प्रशासकीय सेवा करायला सक्षम आहे. ती जिंकली. फेब्रुवारी 2क्14 मध्ये तिची ‘आयआरएस’मध्ये सन्मानपूर्वक निवड करण्यात आली.
मात्र ती इथंच थांबली नाही. यूपीएससी 2क्14 च्या परीक्षेत ती देशात अव्वल आली. 
आणि तिनं सिद्ध करून दाखवलं की, मुलगी असणं, थोडं अपंग असणं हे काही आपल्या वाटेतले अडथळे ठरू शकत नाहीत. उलट आपला संघर्ष आणि जिद्द आपल्याला यशाची उंच शिखरं जास्त मेहनतीनं दाखवतात. मूळची दिल्लीची असलेली ईरा, तिनं आधी इंजिनिअर, मग एमबीए केलं. कार्पोरेट सेक्टरमधे उत्तम करिअर सुरू झालं. मात्र तिला प्रशासकीय सेवेतच काम करायचं होतं. तिचं मन त्या कार्पोरेट वातावरणात रमत नव्हतं. म्हणून मग परीक्षेची तयारी करण्यासाठी तिनं उत्तम पगाराची, करिअर घडू शकणारी नोकरी सोडली. 
आणि प्रशासकीय सेवेत येण्याची तयारी सुरू झाली. पण तिच्या वाटेवर अडथळेच अनंत होते.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही तिला झगडावं लागलं, ते तर ती झगडलीच; पण त्याहून पुढचं पाऊल टाकत देशात अव्वल ठरली.
 
 
ईरा सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
 
या परीक्षेच्या तयारीचा आणि हमखास यशाचा असा काही एकच एक फॉम्यरुला नसतो. यूपीएससीची तयारी सुरू करताना आपल्या क्षमतांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही किती खोलवर अभ्यास करताय यावरच यश अवलंबून असतं. 
 ‘मी कधीच अभ्यासाचं वेळापत्रक केलं नाही. पण सुरुवातीला खूप अभ्यास केला. ‘आयएएस’साठी चार परीक्षा दिल्या. पण त्यासाठी कोचिंग इन्स्टिटय़ूटमध्ये गेले नाही. स्वत:च अभ्यास केला. पण तो करत असताना परीक्षेत चांगले गुण मिळायलाच हवेत असा हट्ट केला नाही. प्रत्येक प्रयत्नात झालेल्या चुका मात्र सुधारत गेले. आपलं आपल्याला कळतंच ना, नेमकं काय चुकलं. ते पुढच्या अॅटम्पला सुधारलं. सुरुवातीच्या काळात उत्तरं लिहिताना मला जेवढं येतंय तेवढं सगळं मी उतरवत जायचे. लिहून काढायचे. पण असं करताना उत्तरपत्रिका तपासणा:या परीक्षकांना काय हवं आहे, याचा विचारच मी केला नाही. मात्र नंतर नंतर आपलं काही तरी चुकतंय असं वाटलं. विचार केला आणि लेखनाचा पॅटर्नच बदलून टाकला. हाच निर्णय मला इथर्पयत घेऊन आला. लेखी परीक्षा देताना परीक्षकांना उत्तर म्हणून काय हवं आहे याचा विचार करून मी उत्तरं लिहायला लागले. मी आता सगळ्यांना एकच सांगते की, आपल्याला काय आणि किती येतं हे दाखवण्यापेक्षा परीक्षकांना अपेक्षित असलेली उत्तरं लिहायला हवीत. आणि दुसरं म्हणजे वेळ मारून न्यायची सवय असेल तर ती सोडून द्या. आपले पेपर तपासणारे परीक्षक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. त्यामुळं त्यांना मूर्ख बनविणारी उत्तरं लिहून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका!
मला स्वत:ला मुलाखतीमध्ये कमी गुण आहेत. पण लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी केल्यानं मला पहिला क्रमांक मिळाला. लेखन हे माझं मुख्य अस्त्र ठरलं. तोच सराव मी करत होते. शिकवण्या लावून हे सारं होत नाही. स्वत:चं स्वत:च जास्तीत जास्त काम करायला हवं. लेखी परीक्षाच काय पण मुलाखतीसाठीही मी वेगळं मार्गदर्शन घेतलेलं नाही. अनेकजण या परीक्षेचं टेन्शन घेतात. का घ्यायचं टेन्शन? मुलाखत घेणारे प्रश्न विचारणारच. तुम्ही त्यांच्यासमोर कसं प्रेङोंट होता हे महत्त्वाचं. मी मुलाखतीला आत्मविश्वासानं सामोरे गेले. जेव्हा मी अभ्यास करत होते, परीक्षा देत होते तेव्हा मी गुणांचा विचारच केला नाही. समोर बसलेल्या लोकांना आपल्यातील आत्मविश्वास दिसायला हवा हे महत्त्वाचं!
तो असेल तर मग कुठलीच परीक्षा तुम्हाला नापास करू शकत नाही.
 
नो मॅटर, हु यू आर!
मी कधीच स्वत:ची तुलना इतरांशी केली नाही. आपल्या अपंगत्वाचाही कधी विचार केला नाही. आपली कमजोरी न समजता जिद्दीनं तयारी केली. इतरांशी तुलना केली की तुम्हाला नैराश्य येतं. हे नैराश्यच तुमच्यातील आत्मविश्वास कमी करतं. परीक्षेला सामोरं जातानाही कधीच कसली अपेक्षा ठेवली नाही की कुठल्या गोष्टीला अतिआत्मविश्वासाने सामोरं गेले नाही. कधी नकारात्मक विचारही केला नाही. होतं काय की, अजूनही आपल्याकडे लोकांना वाटत नाही की महिला बडय़ा पदावरच्या जबाबदा:या पेलू शकतात. ते पुरुषांचंच काम असा एक समज. त्यात अपंगांना कमी लेखण्याची वृत्ती आहेच. त्यात शारीरिकदृष्टय़ा तुम्ही वेगळे दिसत असाल तर भेदाभेद आणखी वाढतो. या सा:याचा सामना केल्यावर मला वाटतं की, सगळ्यांनाच समान संधी मिळाली पाहिजे. आणि दुसरे ती संधी देत नसतील तर आपण स्वत:ला अशी संधी द्यायलाच हवी. आपण कुणाशीही स्वत:ची तुलना न करता, पूर्ण ताकदीनं आपली मेहनत करायची. अपमानानानं दुखावलं जाणं वेगळं, पण त्यातून तुमची लढण्याची जिद्द वाढली पाहिजे. कमी होता कामा नये!
 
एक काम की बात
यूपीएससीची तयारी करताना त्यावरच सर्वस्वी अवलंबून मात्र राहू नये असं मला वाटतं. हा प्रवास इतका सोपा नाही. त्यात वय वाढतं, पैसे कमावण्याचं प्रेशर वाढतं. म्हणून मग आपली डिग्री असेल त्या विषयात किमान एक-दोन र्वष तरी नोकरी करायला हवी. त्यातून खूप अनुभव मिळतात. त्याचा उपयोग खूप होतो. एकतर एका प्रयत्नात तुम्हाला यश येईलच असं नाही. आणि दुसरं म्हणजे हाताशी पैसा असल्यानं आत्मविश्वास कमी होत नाही. त्यामुळे मी फुलटाइम अभ्यासच करीन असं म्हणण्यापेक्षा थोडा अनुभव, थोडा पैसा त्यापूर्वी गाठीशी बांधलेला बरा!