State Drama Competition: youth & drama, whats the future? | हौसेखातर पदरमोड करून किती दिवस नाटक करायचं?
हौसेखातर पदरमोड करून किती दिवस नाटक करायचं?

ठळक मुद्देराज्य नाटय़स्पर्धा : जिवाचं नाटक करायचे दिवस.

- साहेबराव नरसाळे

अहमदनगरमधील माउली सभागृह़ काहींची तिकीट खिडकीत लगबग, तर काहींची जागा पकडण्यासाठी धावपऴ विंगेतल्या कलाकारांची धाकधुक शिगेला पोहोचलेली़ काहीच वेळात टिर्र्ऱ़़ टिर्र्ऱ़़ टिर्र्ऱ़़ अशी तीनवेळा घंटा वाजत़े तिसर्‍या घंटेला कलाकार रंगमंचावर आलेल़े़ हळूहळू पडदा मागे सरकतो़ प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात अन् सुरू होतो जीवंत कलेचा आविष्कार!
निमित्त होतं, महाराष्ट्र शासनाच्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचं़ नगर केंद्रावर 17 नाटके सादर झाली़ त्यात 8 नाटके ग्रामीण कलाकारांची होती, हे विशेष! नाटय़ स्पर्धेचं परीक्षण करायचं म्हणून मी ही स्पर्धा कव्हर करायला गेलो खरा.
पण नाटकं, त्यातली स्पर्धा, चुरस यापलीकडे त्यातलं काही सापडत गेलं, दिसलं.
आणि शहरीच काय ग्रामीण तारुण्याच्याही कलेचा एक वेगळाच चेहरा समोर आला.
त्याच्या या फक्त काही नोंदी.
ज्या स्पर्धेविषयी नाहीत तर नाटक करणार्‍यांविषयी आहेत.
नाटक हा तसाही जीवंत कलेचा प्रकाऱ त्यात रिटेकची संधी नाही़ चुकीला माफी नाही आणि एडीट करून वेगवेगळे इफेक्ट किंवा डबिंग तर अजिबातच नाही़ जे काही करायचंय ते लाइव्ह़ शब्द इकडचे तिकडे झाले, चेहर्‍यावरचे भाव बिघडले, फंबल झालं तर कोणी खपवून घेत नाही़  मख्ख चेहर्‍यानं उभं राहणं तर अजिबात मान्य नाही़ 
आणि तरीही नाटक करायचंच, यंदा राज्य नाटय़ करायचंच हे ठरवून अनेक तरुण कलाकार दोन-तीन महिने खपतात. नोकरी, व्यवसाय सांभाळून नाटक उभं करतात. खरं तर  त्यातून मिळतं काय? तर फक्त कौतुकाचे चार-दोन शब्द़ तेही लोकांना नाटक आवडलं तरच़ अन्यथा ‘कशाला गेलता चव घालायला’, अशा शब्दात अवहेलना ठरलेलीच़
ही अवहेलना पचवून कलाकार पुन्हा उभे राहातात, तयारी करतात पुढच्या वर्षीच्या नाटकाची़ त्यासाठी पैसाही त्यांनाच उभा करावा लागतो़ शासनाकडून चवीपुरतं निर्मिती खर्चाचं लोणचं मिळतं़ ते नेपथ्य उभं करायलाही पुरत नाही़ 
अ. नगरला तर ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी उद्घाटनाच्या भाषणातच कलाकारांची ही व्यथा मांडली़ ग्रामीण कलाकारांचे दुखणे तर खूप मोठे असत़े त्यांची फरपट कलाकार मिळविण्यापासून सुरू होत़े तंत्रज्ञ तर अक्षरशर्‍ विकत घ्यावे लागतात़ स्री भूमिका असेल तर अवघड दुखणं़ स्री कलाकार मिळवणं म्हणजे दिग्दर्शकाने राज्य जिंकल्यासारखंच (शहरात ही समस्या नाही). काहीजण वर्षानुवर्षे एकाच स्री कलाकाराला सांभाळतात़ ती नसेल तर वर्षवर्ष मेहनत घेऊन स्री कलाकार घडवतात़ तिला तयार करून तिच्या कुटुंबीयांचा विश्वास जिंकण्याची तारेवरची कसरत, पुढे दोन-तीन महिने नाटकाची तालिम आणि त्यानंतर हे कलाकार उभे राहातात रंगमंचावऱ 
शब्दांमधले भाव चेहर्‍यावर उमटवणं, स्वतर्‍ला विसरून ते पात्र आपल्यात भिनवणं, दिसतं तितकं सोप्प नसतंच़ पत्नीचं दुखणं, कौटुंबिक अडचणी, घरातलंच कुणीतरी निर्वतलेलं आहे, हे सारं दुर्‍ख लपवून ते प्रेक्षकांसमोर उभे राहिले, हे या राज्य नाटय़ स्पर्धेचं विशेष! 
आपल्या दुर्‍खाची भणकही लागू न देता चेहर्‍यावर रंग लावून प्रेक्षकांची मनं रिझवणारे कलाकार या स्पर्धेत दिसल़े 
रवींद्र काळे हे चुलत्याच्या निधनाचं दुर्‍ख विसरून रंगमंचावर आल़े एका कलाकाराच्या पत्नीला दुर्दम्य आजाऱ तरीही त्यानं कलेला अंतर दिलं नाही़ अविनाश कराळे यांचा नाटक सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर अपघात झाला़ डोक्याला, तोंडाला मार लागला़ ऑपरेशन होतं़ तासभर ते ऑपरेशन थिएटरमध्येच होत़े तोर्पयत इतरांनी नाटक रद्द करण्याचा निर्णय घेतला़ नाटकाची वेळ रात्री आठची़ ते साडेसहा वाजेर्पयत हॉस्पिटलमध्येच होत़े साडेसहा वाजता ते हॉस्पिटलमधून निघाले अन् चला नाटक करायचंय, असं म्हणत थेट सभागृहातच पोहोचल़े डोक्याला टाके टाकलेले, ठिकठिकाणी पट्टय़ा बांधलेल्या आणि ते कलाकारांना सूचना देत होत़े मार्गदर्शन करत होत़े समर्पण, नाटकाला वाहून घेणं म्हणतात ते ह़े असे अनेक कलाकार नगरच्या नाटय़ परिघात आहेत़ त्यांनीच हे नगरी नाटय़ विश्व समृद्ध केलंय़ 
नेवासा तालुक्यातील घोडेगाव हे छोटसं खेडं़ वगसम्राट नाथा मास्तर घोडेगावकरांसाठी ओळखलं जातं़ घोडेगावच्या कलाकारांनी ‘रात संपता संपेना’ हे अस्सल गावरान ढंगातलं नाटक सादर केलं अन् सर्वानीच त्यांना डोक्यावर घेतलं़ नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या खेडय़ातल्या शाळकरी मुलांनी ‘गाभण’ नाटकात धम्माल केली़ राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर येथील कलाकारांनी चांगले प्रयोग केल़े 
आता नगरमधून ‘एक होता बांबूकाका’ व ‘मोमोज’ ही दोन नाटके राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहेत़ 
 पण हे सारं होत असताना कलाकारांना शासनाकडून काय हवंय? पैसा? तो तर कोणाला नकोय? पण किमान शासनाने नाटय़ कार्यशाळा घ्याव्यात, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून द्यावे, ग्रामीण कलाकारांना विशेष प्रोत्साहन द्यावे की निव्वळ हौसची चूळ भरायला लावावी? हौसेखातर पदरमोड करून किती दिवस नाटक करायचं? हौसेला काही मोल मिळणार की नाही?

****************

स्वर्गीय रघुनाथ क्षीरसागर, सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत काम केलेले 65 वर्षाचे पी़ डी़ कुलकर्णी यावर्षी पुन्हा रंगमंचावर आल़े पूर्वा खताळ या चिमुकलीचा हात धरत त्यांनी पाचव्या पिढीसोबत नाटक केलं़ पूर्वा खताळ ही 7-8 वर्षाची गोडुली़ 10 वर्षाची सर्वज्ञा कराळे, कोजागरी जोशी 13 वर्षाची, तर मार्दव लोटके 14 वर्षाचा़ तसं पाहिलं तर क्रमिक पुस्तकातील धडेही नीट न समजण्याचं त्यांचं वय़; पण नाटकाचे सर्व धडे, सूत्र त्यांनी जगलेत असंच वाटावं, असा त्यांचा अभिनय़ शब्दन्शब्द पाठ करायचा़ नुसता पाठ करायचा नाही तर त्यातले भाव समजून घ्यायच़े ते चेहर्‍यावर उमटवायच़े क्षणात दुर्‍खी व्हायचे, रडायचे - क्षणात हसायचे, आपला देहदेखील रडका-हसरा दिसला पाहिजे, हे सारं त्यांनी शिकून घेतलं न कळत्या वयात़


(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत़)
 

Web Title: State Drama Competition: youth & drama, whats the future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.