शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शहरांत-गावांत कुठंही पचापच थुंकणार्‍या तरुणांना काही थेट सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:47 IST

तंबाखू, पान, गुटखा, खर्रा, हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे का? आपल्या आरोग्याशी हेळसांड करून आपण रस्त्यावर पचापच थुंकतो आणि इतरांनाही अनारोग्य देतो. हे थुंकणं स्टायलिश आहे, हे तुम्हाला कुणी सांगितलं?

ठळक मुद्देकुठेही पचकन थुकणं म्हणजे स्टाइल मारणं नाही बॉस! 

- प्राची पाठक 

चौकाचौकांत, गावांत-शहरांत, बस स्टँडच्या आडोशाने, पानटपर्‍यांवर लहानसा घोळका करून चकाटय़ा पिटणार्‍या मुलांमध्ये असतात तरी कोण मुलं? कुठून येतात ही तरु ण टोळकी? नेमकं काय करत असतात घोळक्यांमध्ये? चित्न-विचित्न हेअर स्टाइल्स, वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे, आजूबाजूला पार्क करून ठेवलेल्या बुलेटपासून ते माउंटन बाइक्स सायकलर्पयतच्या विविध गाडय़ा, हातात महागडे फोन्स, फोनमध्ये डोकं  खुपसून सुरू असलेली खुसर-पुसर इतकंच या मुलांचं वैशिष्टय़ नसतं. फोनमध्ये एकत्न गेम्स खेळणं सुरु  असतं काहींचं. कोणाचं व्हिडीओ पाहणं सुरू असतं. कोणी कसलं शूटिंग करत असतात, तर कोणी कसले मेसेजेस चेक करत असतात. कोणाचं सेल्फी घेणं सुरू  असतं. इथेच ही गोष्ट संपत नाही. त्यांच्या ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीची समाधी भंग करून काहीतरी प्रश्न विचारावा या मुलांना. एखादा रस्ता, एखादा पत्ता विचारावा. मग त्यांच्यातला मेन हिरो पुढे येतो आणि सर्वात आधी काय करतो, तर पचकन थुंकतो. जिथे दिसेल तिथे पचकन थुंकतो. थुंकल्याशिवाय तो तोंडच उघडू शकत नसतो.तोंडात बराच वेळापासून काहीतरी घोळवत ठेवलेले अनेक लोक थुंकायला मिळत नाही, तोवर खाणाखुणांच्या भाषेत बोलत राहतात. अगदीच अनावर झालं की बोलता बोलता समोरच्याच्या बाजूलाच पचकन थुंकून येतात आणि तोंडातून थुंकीचे थेंब उडवत बोलायला लागतात. त्यात किशोरवयीन मुलं, तरुण, वयस्क पुरुष असतात. ते शिकलेले असो की अशिक्षित असो, आपल्या तोंडात जे मुळातच थुंकून टाकावं लागतं, इतकं टाकाऊ काहीतरी तासन्तास घोळवत बसतात. जिथे जागा सापडेल तिथे थुंकत राहतात. सार्वजनिक जागी पचापच थुंकू नाही, वगैरे शाळेत शिकलेलं शाळेतच सोडायचं असतं असं वाटतं का यांना? शाळेच्याच कोपर्‍यात कुठेतरी पिंक टाकत असतात. कॉलेजला गेलो, हाताला-पोटाला काही काम मिळवलं, कोणी इलेक्ट्रिशियन झालं, कोणी प्लंबर, कोणी रिक्षावाला, कोणी गवंडी, कोणी आयटीवाला, कोणी पोलिसांत गेलं, कोणी शिक्षक झालं, कोणी इंजिनिअर तरी थुंकणं काही सुटत नाही. तुमच्याकडे भारीतली बुलेट असो की आणखीन महागडी कार. बुलेट चालवत, कारची काच खाली करत आम्ही थुंकणार म्हणजे थुंकणारच! जणू रस्त्यावर थुंकणं आपला अधिकार आहे आणि त्याविरुद्ध कोणी अगदी सहज काही बोललं तरी त्याच्या अंगावरच धावून जायचं लायसन्ससुद्धा आपल्याला मिळालेलंच आहे.पुन्हा कुणी हटकलंच तर ते  समोरच्यालाच विचारतात.‘इथे नाही, तर कुठे थुंकू?’ ‘आली थुंकी तोंडात, तर काय घरी जाऊ का थुंकायला?’ ‘सगळेच थुंकतात, तर मी का नको थुंकू?’ ‘त्या माणसाला आधी बोलून या, मग मला सांगा थुंकू नको ते’‘इथे आधीच घाण आहे. मी थुंकलं तर काय फरक पडतो?’‘कोण म्हणालं, थुंकीतून रोगराई वाढते?’आपलं शिक्षण, आपलं पद, आपल्या हातात पालकांच्या कृपेने असलेला इझी मनी, आपण चालवत असलेल्या बाइक्स, घालत असलेले ब्रँडेड कपडे, शूज, हातातले मोबाइल्स आणि आपलं थुंकणं यांचा काहीही संबंध नसतो. सार्वजनिक स्वच्छता वगैरे मुद्दे थेट डस्टबिनमध्येच. ते फक्त बोलायला असतं! सार्वजनिक स्वच्छतेचं एक वेळ सोडून देऊ, स्वतर्‍च्या आरोग्याचं तरी भान असावं. अशी कोणती उबळ असते की सतत रस्त्यावर थुंकावं लागेल असं आपण काहीतरी आपल्या तोंडात सारत असतो सतत? काय खातो मावा की गुटखा?आपल्या थुंकीतून रोगराई पसरू शकते, इतरांना ते किळसवाणं वाटू शकतं, याचं किमान भान तरी ठेवतो का आपण? शिक्षण आणि सामाजिक, आर्थिकस्तर याच्या पलीकडे जाऊन ते सार्वजनिक जागी थुंकायची सवय बाळगून असतात. इतकं की नवीन इमारत झाली, जुन्या इमारतीला रंगरंगोटी झाली की लोक कोपर्‍या-कोपर्‍्यात देवांचे फोटो लावून ठेवतात. तरीही लोक थुंकतच असतात.घरात, मित्नांमध्ये घुमे म्हणून प्रसिद्ध असलेले तरु ण मुलं, पुरुष तोंड उघडतात की नाही, मनातलं बोलतात की नाही, असे प्रश्न पडणार्‍या लोकांना गमतीत सांगितलं जातं, ‘तो फक्त थुंकायलाच तोंड उघडतो. बाकी, आजकालच्या तरु ण मुलांच्या मनात नेमकं  काय सुरु  असतं, ते सांगणं अवघडच’. तंबाखू, पान, खर्रा, सिगारेट्स हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे का, की आपल्या आरोग्याशी हेळसांड करून आपण असे रस्त्यावर पचापच थुंकणारे होऊन जातो? चुईंग गम्स आपण स्टाइलसाठी खाणार आणि खाऊन झाल्यावर तोंडात उरलेलं चुईंग गम कुठेतरी चिकटवून ठेवणार. कुठेतरी पचकन थुंकणार. इतरांना त्याने त्नास होईल याची जाणीवदेखील आपण ठेवणार नाही. का थुंकत असतो आपण सार्वजनिक जागी? कफ अनावर झाल्यावर लोकांना थुंकावं लागतं. विशिष्ट पान-तंबाखू खाल्ल्यावर थुंकावं लागतं. पण मुळात जे तोंडात टाकून बाहेर फेकून द्यायच्या लायकीचं आहे, ते आपण आपल्या शरीरात ढकलतोच कशाला? त्यातून कफ वाढणार आणि पुन्हा थुंकण्याची उबळ येणार. आपलं स्वतर्‍चं थुंकीपात्न घेऊन घरातून बाहेर पडावं का मग, जे कायम आपल्या सोबत राहील? कॉलेजचं प्रोजेक्ट म्हणून आपण किमान एखादं आधुनिक, सुटसुटीत थुंकीपात्नच का विकसित करू नये?आपल्या आजूबाजूचे तरु ण सतत का थुंकत असतात, त्यांच्याशी बोलायचं का प्रेमाने? आपल्या हातातला मोबाइल आपल्याला एकदम भारीतला हवा असतो. त्याला झकास अ‍ॅक्सेसरीज आपण जोडतो. कपडे ब्रँडेड घालतो, शूज भारीतले आणतो. परवडत नसेल, तर कधी ना कधी आपण असे शूज, असे कपडे, अशा बाइक्स आणि अशा कार घेऊनच राहू अशी स्वप्न बघतो. ती स्वप्न साकारायला जे शरीर आपल्याला साथ देणार असतं, त्याची अशी कचराकुंडी का करून ठेवतो आपण? आपल्या तोंडात अशी काय घाण साचते की आपल्याला ती सारखी बाहेर थुंकत बसावी लागते? विचार करूया..सार्वजनिक जागी पचकन थुंकणार्‍या आपल्या मित्न-मैत्रिणींनासुद्धा विचार करायला भाग पाडूया. कुठेही पचकन थुकणं म्हणजे स्टाइल मारणं नाही बॉस!