टेन्शन आलंय , बोअर  होतंय ? मग आवरा पसारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 19:14 IST2020-04-09T19:10:38+5:302020-04-09T19:14:04+5:30

बाकी काही सॉर्टआउट हो ना हो आपण जरा आपले कानातले गळ्यातले सॉर्टआउट करून टाकू!

sort out this is new mantra in lock down time, start with your accessories | टेन्शन आलंय , बोअर  होतंय ? मग आवरा पसारा 

टेन्शन आलंय , बोअर  होतंय ? मग आवरा पसारा 

ठळक मुद्देकानाला खडे

- सारिका पूरकर-गुजराथी

सॉर्टआउट करा असं सध्या जगभर बोललं जातं आहे.
म्हणजे आपली कुणाशी असलेली भांडणं, मनमुटाव, अबोले हे तर सॉर्टआउट कराच कारण पाहतोय ना आपण जग किती अशाश्वत आहे.
कशाला उगाच ओझी व्हायची.
याकाळात पुन्हा चर्चा आहे ती मिनिमिलीझमची. आपण इतक्या गरजा वाढवून ठेवतो. वस्तू विकत घेतो. पसारे मांडतो.
तो आवरत नाही. पैसे तर वाया जातातच, पण कचरा होतो. त्याच्या विल्हेवाटीचे प्रश्न आहेत.
अशा किती गोष्टी एकामागून एक येतात.
सगळ्याचं मूळ आपल्या वस्तू संचयात आणि पसारा मांडण्यात सापडतं.
त्यामुळे मन, नातेसंबंध आणि जमल्यास कपाटात, कपाटातल्या वस्तू, त्यातलं काही तुटकंमुटकं हे सारं सॉर्टआउट करून टाका.
म्हणजे आपली कपाटाची ड्रॉव्हर्स भरलेली असतात. ज्वेलरी बॉक्स, टेबलाचे कोपरे कानातल्या गळ्यातल्यांनी भरून वाहतात. तरी अगदी ऐनवेळी कधी कानातल्याची फिरकी सापडत नाही, कधी नेकलेसचं हूकच तुटलं म्हणून बाजूला पडत जातात. आणि पडूनच राहतात. 
बाकी जगात सॉर्टआउट करण्याचे अनेक प्रश्न आहेत, ते सुटतील तेव्हा सुटतील आपण किमान हे आपल्या भरभरून वाहणा:या आणि हौशीने घेतलेल्या कानातल्यांचे प्रश्न जरा सोडवू, सॉर्टआउट करू, मार्गी लावू.
काहींना तर एकदम न्यू लूक देत, डिझायनर बनवून टाकू.
कर के देखो. टाइमपास तर चांगला आहेच, पण आपण कष्टाचे पैसे खर्च करून जे आणलं त्याचा जरा उपयोग पण होईल.
त्यासाठी तुम्हाला यूटय़ूबवर वर काही व्हिडीओ मदतीला आहेत, पण या आणखी काही ट्रिक्स.
ट्राय धिस. घरच्या घरी. आपणच स्टाइल मारी!

1) काही चेन्स, नेकलेस यांचे पॉलिश गेल्यामुळे ते आपण वापरत नाही, मात्न त्याचे पेन्डंट्स चांगले असतील, मोठय़ा आकाराचे, काही ट्रॅडिशनल पॅटर्नचे असतील तर ते काढून घ्या. आता काही तुटलेले कानातले, ब्रेसलेट यातील क्रि स्टल बीड्स, वूडन बीड्स, स्टोन बीड्स काढून त्याची सरळ माळ ओवून घ्या आणि हे जुने पेन्डंट त्यात मध्यभागी अडकवून घ्या. नवं गळ्यातलं झालं तयार !!!
2) काही नेकलेस, माळा यांचे हूक तुटले असेल तर त्याऐवजी छान कापडी गोफ तयार करा व तो नेकलेसला अडकवा व आता हूक लावता त्याऐवजी गोफला गाठ मारून किंवा मणी अडकवून ट्राय करा. कापडी गोफ (वेणी घालतो तसा) ऐवजी चांगल्या प्रतीच्या कापडाच्या सरळ लेससारख्या पट्टय़ा अडकवल्या तरी नेकलेस एकदम नवा होऊन जाईल. कापडी पट्टीप्रमाणोच प्लेन लेस तुम्ही वापरू शकता. रंगसंगतीचा आकर्षक वापर केल्यास आणखी बेस्ट.
3) जुने बीड्स व काही शंख, शिंपले एकत्न ओवूनही कस्टमाइज्ड नेकपिस तयार होऊ शकतो.
4) जुने बीड्स, मणी, मोती यांच्याभोवती तसेच जुन्या बांगडय़ांभोवती रेशीम धागे गुंडाळून थ्रेड ज्वेलरी अगदी सहज घरच्या घरी तयार होते. त्याला जुनेच मोती, आरसे लावून सहज डिझायनर लूक देता येतो.
5) काही जुने बीड्स, चेन्स यांचे नेकपिस वापरायचे नसल्यास हेअरबेल्टभोवती गुंडाळून, चिकटवून फॅन्सी हेअरबॅॅण्ड सहज बनतो. लहान मुलीच नाही तर कॉलेज गोइंग गल्र्सही घालू शकतील हे हेअरबॅण्ड.
6) मोठे मणी, मोती यांच्याभोवती जुन्याच साडीचे उरलेले कलरफूल तुकडे, पट्टय़ा गुंडाळून व त्याच कापडाने गाठी मारून मोती/मणी व गाठ हे कॉम्बिनेशन करीत सुंदर गळ्यातलं, लाइटवेट, टेम्पररी ज्वेलरी म्हणून ट्राय करता येईल.
7) ऑक्सिडाइज्ड किंवा अन्य रंगाच्या मेटलच्या इअररिंग (कानातले नाही तर रिंग्जही ) असतील त्याभोवती धागे गुंडाळून त्याचा बोअर लूक बदलवता येईल.
8) नेकलेसच्या जुन्या चेन्स (ज्यांचे हूक तुटले आहे) फेकून न देता, त्यातच काही अंतरावर लोकरीचे गोंडे तयार करून अडकवल्यास पॉम पॉम नेकलेस तयार होईल.
9) याचप्रमाणो जुन्या कानातल्यांच्या हुकांमध्येही गोंडे अडकवून नवे कानातले तयार होतील.
1क्) काही धागे, लोकर यांचे टसल तयार करून ते जुन्या नेकलेसच्या बेसभोवती लावल्यास स्टेटमेंट नेकपिस तयार होतो.
11) जुन्या वायरच्या चोकरला धागे गुंडाळलेले बीड्स अडकवले तर क्या कहने !!!
12) खडे, पोलकी, मणी, मोत्यांच्या जुन्या ज्वेलरीला नेलपॉलिशने रंगवून एकदम हटके, फ्रेश लूक सहज देता येतो. 
13) असं खूप काही करता येतं.. एक करायला घेतलं की दुसरं सहज  सुचत जातं.. म्हणूनच नक्की ट्राय करा..


( सारिका मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: sort out this is new mantra in lock down time, start with your accessories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.