शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

चिंध्या पांघरूण सोनं विकताय?- ते कोण आणि का घेईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 4:36 PM

सॉफ्ट स्किल्स फार महत्त्वाचे असं सगळेच म्हणतात. मात्र सॉफ्ट स्किल्स म्हणजे नेमकं काय? बदलत्या काळात कोणत्या स्किल्सना ‘सॉफ्ट’ म्हणायचं?

ठळक मुद्देकरिअर घडवणारं आणि बिघडवणारं हे प्रकरण सोपं नाही, ते का?

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्स हा शब्द हल्ली सर्रास वापरला जातो.हा शब्द इतका सहज वापरता येतो की, त्यातलं सगळ्यांना सगळं कळतं असंही अनेकांना वाटतं. मात्र प्रत्यक्षात तसं नाही.मला सॉफ्ट स्किल्स म्हटलं की, सुधाकर गायधनी यांच्या काही ओळी आठवतात. आम्ही चिंध्या पांघरूण सोनं विकायला बसलो, गिर्‍हाईक फिरकता फिरकेना।सोनं पांघरूण चिंध्या विकत बसलो,गर्दी पेलता पेलवेना !!मला तर वाटलं की, ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणजे नेमकी काय, याचं ‘सार’ 60 वर्षापूर्वीच या कवितेनं सांगून टाकलं आहे. तुम्हाला आठवत असेल, ऑक्सिजन पुरवणीतूनच मी ‘इंडस्ट्री 4.0’च्या विषयावर संवाद साधला होता. काळ कसा वेगानं बदलतो आहे याविषयी आपण बोललो. या बदलत्या काळात टिकायचं तर आपल्याकडे कुठले सॉफ्ट स्किल्स हवेत याविषयी आता बोलू. सॉफ्ट स्किल्स ही गोष्ट किंवा संकल्पना खरं तर आता घासून घासून गुळगुळीत झाली आहे. लाइफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स इत्यादी नावांनी ते ओळखले जातात. परंतु मला वाटतं की, या कौशल्यांविषयी वरवर बोलण्यापेक्षा आपण त्याच्या गाभ्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. एकत्रितपणे !सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय नाही?मला वाटतं की सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यापूर्वी आपण सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय ‘नाही’ हे आपण आधी पाहू. म्हणजे ते काय ‘आहे’ हे कळायला अधिक मदत होईल. आणि आपल्या संवादाला टोक आणि सहजता येईल.1) गोडगोड बोलणं, पुढं पुढं करणे आणि यांसारख्या अनेक गोष्टी यांचा संबंध ‘सॉफ्ट स्किल्स’शी जोडला जातो. आपण हे लक्षात घेऊ की सॉफ्ट स्किल्स यापेक्षा खूप वेगळे आहेत.2) संभाषण कौशल्यं म्हणजे सॉफ्ट स्किल्स असं काहीजण मानतात. आणि त्याचा अर्थ काय काढतात तर  फाडफाड इंग्रजी बोलता येणं. मी तुम्हाला ठामपणे आणि शपथेवर सांगतो, हो अगदी स्टॅम्प पेपरवर  लिहून द्यायलापण तयार आहे की, केवळ इंग्रजी छान येणं म्हणजे चांगलं संभाषण कौशल्य नव्हे. इतकंच नाही तर इंग्रजी जेमतेम असणार्‍या अनेक लोकांचं कम्युनिकेशन स्किल्स किंवा संभाषण कौशल्य हे विलक्षण परिणामकारक असल्याचा अनुभव मी स्वतर्‍ घेतलाय आणि तोही जगभर !3) तुम्हाला एक उदाहरण देतो इंग्लंडमध्ये मी आयबीएमसाठी रिक्रूटमेण्ट करत असताना इंजिनिअर असणार्‍या एका मुलाला विचारलं की, तुझा फायनल इअर प्रोजेक्ट काय होता ते मला विस्तृतपणे सांग. हा मुलगा पूर्णपणे गोंधळलेला होता त्याच्याच प्रोजेक्टविषयी सांगायला कुठून सुरुवात करावी हे त्याला कळेना, त्यामुळे पुढचं सगळं गाडच अडलं. अर्थात त्याची निवड आम्ही केली नाही.आता बघा हा मुलगा होता इंग्लंडमधला ! मी त्याची इंग्रजीतून मुलाखत घेत होतो. माझं सारं शिक्षण झालं मराठीतूनच. त्याची मातृभाषा इंग्रजी तरी त्याला उत्तर देता आलं नाही कारण त्याला इंग्रजी येत होतं; पण संभाषण कौशल्य त्याच्याकडे नव्हतं.4) मित्रमैत्रिणींनो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, इंग्रजी त्याची मातृभाषाच नव्हती तर पितृभाषा होती, काकाभाषा होती, आत्याभाषा होती आणि आजी-आजोबा भाषासुद्धा होती. ती त्याच्या रोमारोमात होती ! तरी त्याच्या तोंडातून शब्द फुटेना.  म्हणून म्हणतो की हे सॉफ्ट स्किल्स प्रकरण इतकं साधं नाही.5) चांगला पाडलेला भांग, छान कपडे आणि फाड्फाड् इंग्लिश ‘सकट’ भारी स्मार्ट ‘दिसणं’, या खूप पलीकडे आहेत ती सॉफ्ट स्किल्स. चांगली सॉफ्ट स्किल्स तुम्हाला आत्मविश्वास देतील, यशस्वी बनवतील आणि एखाद दुसरी नोकरीच नाही तर उत्तम ‘करिअर’ देतील.6) म्हणून आपल्याला सॉफ्ट स्किल्सची नीट ओळख करून घ्यायची आहे ती ‘लंबी रेस का घोडा’ होऊन करिअरचा अश्वमेध जिंकण्यासाठी !!

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)