सॉफ्ट स्किल

By Admin | Updated: January 29, 2015 15:55 IST2015-01-29T15:55:10+5:302015-01-29T15:55:10+5:30

सॉफ्ट स्किल्स हा शब्द आपण सतत ऐकतो, अनेक सर्व्हे म्हणतात की, नुस्त्या डिग्य्रांचा काही उपयोग नाही, नव्या जगात यशस्वी व्हायचं तर गुणवत्तेबरोबर सॉफ्ट स्किल्स हवेत !

Soft skills | सॉफ्ट स्किल

सॉफ्ट स्किल

>प्रॉब्लेमची  बारा  कारणं
 
 
सॉफ्ट स्किल्स हा शब्द आपण सतत ऐकतो, अनेक सर्व्हे म्हणतात की, नुस्त्या डिग्य्रांचा काही उपयोग नाही, नव्या जगात यशस्वी व्हायचं तर गुणवत्तेबरोबर सॉफ्ट स्किल्स हवेत ! जे अगदी खरंय, अनेक हुशार आणि गुणी माणसं केवळ सॉफ्ट स्किल्स नाहीत, माणसं हाताळता, जमवता आणि टिकवता येत नाहीत म्हणून मागे पडतात. केवळ स्पर्धेतच नाही तर स्वत:च्या क्षमतेवरही अन्याय करतात.
म्हणून ही सॉफ्ट स्किल्स आपण शिकायला हवीत.
ती स्वत:ची स्वत:ला शिकता येतात का, तर येतात?
फक्त शिकण्याची युक्ती आणि दृष्टिकोन समजला पाहिजे.
आमच्याकडे कौन्सिलिंगला मुलं येतात तेव्हा त्यापैकी अनेकांमध्ये महत्त्वाचे काही स्किल्स अजिबात नाहीत असं लक्षात येतं. ते नसल्यामुळे त्यांच्याभोवती अनेक प्रश्न निर्माण होतात.
नेमकं काय कमी आहे, आपल्याकडे यावर एक नजर घातली तर पुढचे प्रश्न समजून घेणं सोपं होईल.
स्किल्सचं ढोबळपणानं १२ प्रकारात वर्गीकरण होतं, आणि प्रॉब्लेम यापैकी एका किंवा अनेक स्किल्सच्या कमतरेमुळे निर्माण होताना दिसतात. 
 
संवाद कौशल्य
बोलणं वेगळं संवाद वेगळा. काहीजणांना वाटतं आपलं मत उत्तम मांडलं साधला संवाद. मात्र संवादात समोरच्याचं ऐकून घेणं महत्त्वाचं, हेच अनेकांना माहिती नसतं.  
 
टाइम मॅनेजमेण्ट
घिसापिटा विषय. मात्र अतिशय उत्तम कामिगरी करणारे लोकही या वेळ व्यवस्थापनामध्ये मार खातात. 
 
निर्णय घेण्याची क्षमता
निर्णय घेणंच काहीजण टाळतात किंवा नेमक्या वेळेत चुकतात. ती क्षमता आपल्यात आहे असं वाटतं, पण ती नसते.
 
मीच सगळं करीन
अनेकदा आपण सर्व कामं स्वत:च करण्याचा प्रयास करतो. आणि फसतो. एकतर कामं वाटता येत नाही, आणि चुकीचं वाटप डोक्याला त्रास देतं. 
 
वाटाघाटी नि तडजोड 
किती माणसांशी बोलून, मार्ग काढून, मागेपुढे पाऊल करून कामं करावी लागतात, ते तारतम्य नसलं की घोळ होतोच.
 
क्रायसिस मॅनेजमेण्ट 
प्रश्न पडतात, घोळ होतात, संकटं येतात, त्यांचं तुम्ही काय करता, कशी रिअँक्शन देता, यात अनेकजण फसतात.
 
कार्यालयातले संघर्ष
कामाच्या ठिकाणी भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींबरोबर काम करावं लागतं आणि तरीही संघर्ष होतात, त्या संघर्षाचं तुम्ही काय करता?
 
चेंज मॅनेजमेण्ट
बदल पचवणं, त्याच्याशी जुळवून घेणं आणि इतरांना बदलायला प्रोत्साहन देणं, सोपं नसतंच. इथेच अनेक फसतात.  
 
माणसं जोडा
गोड बोलून, माणसं जोडली तर प्रगती पटकन होते. माणसं जोडणं ही कला, ती कुठं शिकवतात कॉलेजात? 
 
स्ट्रेस मॅनेजमेण्ट 
स्ट्रेस, टेन्शन अटळ आहे. जो स्वत:ला तणावाच्या प्रसंगात शांत ठेवू शकतो, तो जिंकतो. पण ही लढाई जिंकायची कशी?
 
माहिती व्यवस्थापन
भारंभार माहिती आहे, उपयोग काय? तिचं काय करायचं, हे शिकायला नको?
 
समस्या निरसन
संघर्ष वेगळे, समस्या वेगळी, ती ओळखून पुढाकार घेऊन उत्तरं शोधणं हे नवं स्किल नाही, पण ते आता दुर्मीळ होतंय.
 
 
समिंदरा हर्डीकर-सावंत
( दिशा कौन्सिलिंग सेण्टरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर)

Web Title: Soft skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.