शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर बदामाची मऊ किमया

By admin | Updated: March 16, 2017 22:38 IST

हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच.

- डॉ. निर्मला शेट्टी

कोरडी रखरखीत त्वचाआणि राठ केसांवरचा उपायकोणत्या दुकानात नाही तरमूठभर बदामात नक्की सापडेल!हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते?खरंतर या प्रश्नाचं उत्तर म्हणून आणखी एक प्रश्न. पूर्वी ही कॉस्मेटिक्सची दुकानं नव्हती तेव्हा आपल्या आई आजीचं काय नुकसान होत होतं? आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी त्या कशा घेत होत्या? त्या तर स्वयंपाकघरात जे उपलब्ध असेल ते चेहेऱ्याला आणि केसांना लावून मोकळ्या व्हायच्या. रोजच्या वापरातल्या भाज्या आणि फळांची ताकद जी आपल्या आई आजीला माहित होती ती आपल्याला का नाही? आयत्या कॉस्मेटिक्सच्या पर्यांयामुळे या नैसर्गिक उपायांच्या ताकदीकडे आपलं दुर्लक्ष होतय हेच खरं.  भाज्यांमध्ये-फळांमध्ये एक नैसर्गिक ताकद असते. शरीरस्वास्थ्यं राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात भाज्या आणि फळं महत्त्वाची असतात. तशीच सुंदर दिसण्यासाठीही यांचा उपयोग होवू शकतो. ज्याकाळी आजच्यासारख्या शेकडो कॉस्मेटिक क्रीम्स नव्हत्या त्याकाळी बायका आपल्या स्वयंपाकघरातलीच साधनं वापरुन सौंदर्याची निगा राखत. लिंबू, टमाटा, बटाटा ही तर अगदी हक्काची साधनं. ते वापरुन त्वचा आणि केस सुंदर ठेवण्याचे अनेक प्रयोग केले जात. आपणही हे प्रयोग सहज करू शकतो.आता बदामाचंच उदाहरण घेवू. आपल्या घरात बदाम हे नेहेमी असू द्यावेत. मान्य आहे की बदाम महाग असतात. पण तरीही त्याच्या वापराचे फायदेही खूप आहेत. त्यादृष्टीनं बदाम वापरायला लागलं की न परवडणारे बदाम इतर उपायांपेक्षा खूप किफायतशीर वाटू लागतात.  त्वचा निस्तेज दिसू लागली, तरूण वयातही चेहेऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागली, त्वचा कमालीची कोरडी झाली की समजावं आपल्याला बदाम वापरण्याची तातडीनं गरज आहे. रोज सकाळी दोन किंवा तीन भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं, खनिजं, कॅल्शियम आणि प्रथिनं मिळतात. बदामाचेही प्रकार असतात. कडसर बदाम हे खाण्यासाठी वापरू नयेत. या बदामात प्रूसिक नावाचं अ‍ॅसिड असतं. ज्याचा उपयोग तेल आणि अत्तरं बनवतांना केला जातो. बदाम खावून जसं शरीराचं पोषण होतं तसंच ते केसांना आणि त्वचेला लावलं तर त्यांचंही पोषण उत्तम होतं.राठ केसांसाठी बदामाचं दूधकेस राठ झाले असतील, केसांची चमक गेल्यासारखं वाटत असेल तर केसांच्या मुळांना पोषक तत्त्वंच मिळत नाहीत हे समजून घ्यावं. ही पोषकता बदामाच्या दुधात असते. हे बदामाचं दूध करणंही एकदम सोपं. त्यासाठी अर्धा कप बदाम आदल्या रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी भिजलेले बदाम सोलावेत. सोललेले बदाम कपभर पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. गाळणीनं बदामाचं दूध गाळून घ्यावं. दुधात बदामाचा रवाळपणा अजिबात राहता कामा नये. या मिश्रणात आता दोन चमचे बदामाचं तेल घालावं. हे लोशन थोडं थोडं हातावर घेवून त्यानं केसांच्या मुळांची हलक्या हातानं मालिश करावी. केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत हे लोशन लावलं गेलं पाहिजे. लोशन लावल्यानंतर अर्धा तास सुकू द्यावं. नंतर सौम्य हर्बल शाम्पूनं केस धुवावेत. कंडीशनरसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करावा. निस्तेज त्वचेसाठी बदामाची पेस्टचेहरा निस्तेज होवून त्यावरच्या सुरकुत्या वाढत असतील तर बदामाची पेस्ट लावणं उत्तम. ही पेस्ट करताना बदाम पाण्यात भिजवण्यापेक्षा उकळून घ्यावेत. बदामाची सालं काढून घ्यावीत. असे अर्धा कप सोललेले बदाम दूध घालून वाटून घ्यावेत. बदामाची ही मऊसर पेस्ट चेहरा आणि मानेला लावावी. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास या पेस्टने चेहऱ्याला मसाज करावा. यामुळे त्वचेखालच्या तैलग्रंथी जागृत होतात आणित्वचेचा कोरडेपणा कमी होतो. हात आणि पायाची त्वचा कोरडी असणाऱ्यांनी बदामाची पेस्ट लावल्यास त्याचा फायदा होतो.