सोशल मीडिया आपकी करन्सी हैं!- हरगून कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 07:57 AM2021-02-25T07:57:29+5:302021-02-25T08:00:12+5:30

(अमृतसरच्या हरगून कौरचा आवाज ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘द व्हॉइस’मुळे सर्वपरिचित झाला. हिंदी, मराठी, पंजाबी, इंग्रजी, गुजराती, तेलुगू इतक्या भाषांमध्ये ती गायलीय. खुद्द रेहमान यांनी जिचं ‘जय हो’ म्हणून कौतुक केलं.)

Social media is your currency! - Hargun Kaur | सोशल मीडिया आपकी करन्सी हैं!- हरगून कौर

सोशल मीडिया आपकी करन्सी हैं!- हरगून कौर

Next
ठळक मुद्देभावपूर्ण स्वरांचा संस्मरणीय वारसा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार नुकताच हरगून कौर आणि प्रथमेश लघाटे या युवा आणि आश्वासक गायकांना देण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्याशी गप्पा...

 

मुलाखत- सोनाली नवांगुळ

छायाचित्रे - दत्ता खेडेकर, मुंबई

 

आशा भोसले, ए.आर. रेहमानपासून कितीतरी सामान्य लोकांचीही तू लवकर लाडकी झालीस. कसं वाटतं?

 

बहुत अच्छा लगता हैं. घरच्यांना खूप लवकर कळलं होतं की माझं ‘रुझान’ संगीताकडे आहे. जुने फोटो काढून बसते तेव्हा वाटतं, कसली ‘क्रेझी जर्नी’ आहे ही! आत्मविश्‍वास आहे, पण ‘पिंच ऑफ नर्व्हसनेस’ सोबत. तेही चांगलंच. अ‍लर्ट राहतो आपण. त्यामुळं देव सगळ्यांना असं सकारात्मक दडपण देवो असं म्हणेन.

 

तुझा आवाज थोडा जाडसर आहे, ताकदीचा. त्याचा फायदा-तोटा? तुलना होते कुणाशी?

बडी चीज को छोटा करना मुश्किल होता हैं, पर आप ढाल सकते हो. आवाज ब्रॉड नि मोकळा असण्याची गंमत ही अशी. योग्य तंत्र वापरून ते जमवता येतं. आजकाल असा आवाज ‘ट्रेंड’ होतोय. लाइव्ह कार्यक्रमात भरपूर प्रभाव पडतो; पण चूक झाली की लगेच कळतं, क्रॅक होतो आवाज. नाजूक पातळ आवाज असणाऱ्यांना परिस्थिती मारून नेता येते. तरी सांगेन, मी अजून प्रोसेस करतेय हे समजून घेण्याबाबतीत. किशोर कुमारांचं ‘आके सिधी लगी दिल पे जैसे कटरिया’ मी म्हणेपर्यंत चॅनल्सच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच पुरुषांनी गायलं होतं. माझा आवाज मस्क्युलाइन असणं, त्यातून खेळायला व शोधायला मिळणं याची मला मजा आली. तुलनेचं काय, ती होत राहते. कुणी रिचा शर्मा नि सुनीधी चौहानसारखं गातेस म्हणतं. या दोघी केवढ्या मेहनतीनं त्यांच्या जागेवर बसल्या आहेत. दे आर लिजेंड्स! आपण नकळत आपल्या आयडॉल्सना मिमिक करतो. तसं माझ्याकडून व्हायला नको हे मी बघत राहते. वेगवेगळ्या जॉन्राचं म्युझिक स्वत:त मुरवून मला हरगून व्हायचं आहे...

 

संगीत तंत्रज्ञानमय झालंय. तुला काय वाटतं?

 

नुकतंच मी मुंबई विद्यापीठातून एम.फील. पूर्ण केलं, ‘चेंजिंग ट्रेंड्स ऑफ बॉलीवूड म्युझिक विथ टेक्नॉलॉजी’ हा माझा विषय होता. अ‍ॅनालॉग बेस्ड सिस्टम अब डिजिटाइझ हो गयी हैं. या सगळ्या काळाचे फायदे-तोटे, प्रभाव अशा अंगानं हा अभ्यास होता आणि माझ्या लक्षात आलं तंत्रज्ञानाचे बदल गेल्या काही वर्षांत प्रचंड झपाट्यानं व सतत झालेत. कुठलाही नवा बदल एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत जुना होतोय. कोई भी बुकिश रेफरन्स, डॉक्युमेंटरी एव्हीडन्स मेरे पास नहीं था. कारण अभ्यास म्हणून संगीत क्षेत्रातील या बदलांना कुणी स्पर्श केलेला नाही. लक्ष्मीकांत पॅरेलालजी नि असे कैक नामी संगीतकार नि संगीतसंचालक आपण बघितले, पण लिखित शब्द हवेत ना? मी शक्य तितक्या म्युझिक डिरेक्टर्स नि प्रोड्यूसर्सशी बोलले. केवढे लोक एकत्र यायचे. चारचार ट्रॅक, शंभरशंभर वादक, निरनिराळी वाद्यं. केवढं मोठं कोलॅबरेटिव्ह, कलेक्टिव्ह होतं. ती एकत्र एनर्जी किती पॉझिटिव्ह असेल. त्यातून गाणी एव्हरग्रीन व्हायची. सोशल प्रोसेसचा प्रचंड अनुभव असणार तो. आज लिरिक्स, कॉम्पोजिशन दिली जाते आम्ही डब करायला जातो तेव्हा. एवढा सगळा सरंजाम उभारण्यासाठी वेळ नि पैसा नाही लावत कोणी. बजेट कंन्स्ट्रेंट. किती इंटरफेस आहेत आज, तेव्हाचा काळ एकदा विटनेस करायला आवडेल मला. हा बदल, इन्ट्रिग मी अ लॉट! बेडरूम स्टुडिओची कल्पना कुणी केली असती का तेव्हा? आज अ‍ॅक्सेसिबिलिटी वाढलीय, 20 लाखांचं परिपूर्ण युनिट मी एका छोट्या बॅगेत भरून घरात लावू शकते. बदलांकडं काळं-पांढरं बघता येत नाही इतकं सांगेन.

 

सोशल मीडियाच्या प्रचारतंत्राचा ताण असतो अलीकडे... त्याबद्दल काय म्हणशील?

 

आता आपण अशा काळात राहतोय की तुमचा मीडिया, तिथं तुम्ही करीत असलेलं इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी हीच तुमची करन्सी आहे. तुमच्या कल्पनेपलीकडं इथं घडू शकतं. ते एक पॉवरफूल टूल आहे. एरवी कुठल्यातरी रिअ‍ॅलिटी शो नि सिनेमात असला तर तुम्ही दिसाल तुमच्या आर्टसह; पण 130 करोड जनतेमध्ये तुमचा नंबर केव्हा लागणार? टॅलेंट हो तो लाइफ चेंज कर सकते हो आप इससे; पण एक आहे की डिस्ट्रॅक्शनही खूप होतं. मला अमुक इतके व्ह्यूज नाहीत म्हणजे मी वर्थ नाही का, माझे फॉलोअर नि पोस्ट शेअरिंग का कमी होतंय? असा मेंटल स्ट्रेस घेऊन डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना मी पाहते आहे. व्हिडिओत पहिल्या तीन सेकंदांत प्रभाव पाडण्याचा असह्य ताण घेऊन तडफडणारी माणसं काय तऱ्हेनं डील करतात ते बघितलंय. जगण्याचा काळ तुम्ही प्रसिद्ध असा की नसा तितकाच असणार आहे. हो जाता हैं कभी कभी मेसअप, यही जिन्दगी हैं, हे समजून मग खेळावं लागेल. आणि बाकी आवडी छंद असतात की! मी लॉकडाऊनमध्ये स्वयंपाक शिकले. पंजाबी नि फूडी हे माझंही कॉम्बो. फिक्शन वाचते खूप. बडबडते. दिमाग भटकाना ना हो तो सुफी गाती हूँ. तसं मेडिटेशन कुठंच नाही मिळणार.

Web Title: Social media is your currency! - Hargun Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.