मॉडेलसारख्या नितळ त्वचेसाठी
By Admin | Updated: June 28, 2016 19:11 IST2016-06-28T19:01:31+5:302016-06-28T19:11:44+5:30
जाहिरातीत दिसते तशी मॉडेल्ससारखी आपली स्कीन असावी असं वाटतं, पण ते सहज शक्य नाही. खरंतर मेकअपपेक्षा नितळ, देखणी, मऊसुत त्वचा हे खरं सौंदर्य.

मॉडेलसारख्या नितळ त्वचेसाठी
>- रवींद्र मोरे
जाहिरातीत दिसते तशी मॉडेल्ससारखी आपली स्कीन असावी असं वाटतं, पण ते सहज शक्य नाही. खरंतर मेकअपपेक्षा नितळ, देखणी, मऊसुत त्वचा हे खरं सौंदर्य.
ते मिळवायचं तर बाजारातून रेडिमेड लोशन्स आणून लावली आणि ब्युटीपार्लरच्या वाºया केल्या म्हणजे मिळवलं असं होत नाही.
त्यासाठी आपण काही गोष्टी आवर्जुन करायला हव्यात.
आणि काही गोष्टी टाळायलाही हव्यात.
सुंदर त्वचेचे शत्रू
* सतत फास्ट/जंक फूड खाणं.
* त्वचेच्या स्वच्छतेकडे सतत दुर्लक्ष.
* सतत धूळ, माती व प्रदूषणात काम
* त्वचेचे विकार झालेल्यांचा संपर्क.
* केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अती वापर .
त्वचा विकाराची लक्षणं
* त्वचेला नेहमी खाज येणं व कोरडी पडणं. तारु ण्यपिटीका व पुरळ येणं
* त्वचेचा काहीभाग लालसर होणं. आग होणं.
* त्वचेचे मूळ रंग बदलणं.
* दुर्गंध येणं.
काळजी काय?
* त्वचा नीट कोरडी करा.
* डॉक्टरांच्या सल्लयानं त्वचेसाठी लोशन्स निवडा.