The simplest way to preserve the environment we learned in Sweden. | पर्यावरण जपण्याचे सोपे उपाय स्वीडनमध्ये शिकलो तेव्हा.

पर्यावरण जपण्याचे सोपे उपाय स्वीडनमध्ये शिकलो तेव्हा.

ठळक मुद्दे15 ते 19 वयोगटातले एकूण वीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने स्वीडनचा अभ्यास दौरा करून नुकतेच परतले आहेत. त्यात दहा भारतीय विद्यार्थाचा समावेश होता.

- श्रीनाभ अग्रवाल

स्वीडनला गेलो आणि पर्यावरणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पक वापर  करून कचरा व्यवस्थापन कसं करता हे मी पाहिलं.
आम्हाला रॉयल सीपोर्टला नेण्यात आलं होतं. शाश्वत शहरी विकास काय असतो हे मी इथं पाहिलं. एक उत्तम आधुनिक शहर, जे स्वयंपूर्ण आहे. तंत्रज्ञान आणि साधनांचा मेळ घालून इंधन कपात, त्यासाठीची जनजागृती आणि शाश्वत उपाय हे सारं बघायला मिळालं. स्वीडनमध्येच एक वेगळाच प्रयोग पाहिला. त्याचं नाव अ‍ॅनामॉक्स.  नायट्रोजन चक्रासंदर्भात हा प्रयोग केला जातो, ते शेवटचं चक्र सर्वाधिक कार्बनडाय ऑक्साइडचं उत्सर्जन करतं. एका विश्ष्टि प्रकारचे बॅक्टेरिया वापरून ते रोखण्यात येतं हे विशेष आहे. 
स्वीडनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीही एक विशिष्ट प्रकारचं सिंगल अ‍ॅक्सेस कार्ड दिलं जातं. ते कार्ड सर्व गाडय़ांनाच म्हणजे बस, सबवे, मेट्रो, फेरी या सार्‍यांसाठी वापरलं जातं. त्यानं लोक या साधनांचा अधिक वापर करतात, ते करणं सोपं होतं.
तेच वेगळ्या पद्धतीच्या गार्बेज बिनचं. त्यात कचरा टाकला की कचरा दाबला जातो. आकुंचन पावतो आणि त्यामुळे एकाच आकारमानाच्या कुंडीत सातपट जास्त कचरा मावतो. उपाय छोटा आहे; पण त्यानं जागेचा प्रश्न सुटतो. वेस्ट कलेक्शन टेक्नालॉजी वापरली जाते ज्यात व्हॅक्युम चेंबर्स आणि पाइपलाइन्स कचरा शोषून घेतात. हॅगबाय इकोपार्क आणि हॅगबाय रिसायकलिंग प्लानमध्ये ड्राइव्हवेज आहेत (रिसायकलिंग सेण्टर्स म्हणजे) आणि मोबाइल रिसायकलिंग व्हॅन्स आहेत त्या कचरा गोळा करतात. आणि 20 वेगळ्या गोष्टींत त्यांचं वर्गीकरण करतात. यामुळे अत्यंत प्रभावशाली अशी कचरा व्यवस्थापन पद्धती विकसित झाली आहे आणि त्यामुळे 90 टक्के कचरा पुन्हा आर्थिक चक्रात टाकून त्याचा पुर्नवापर केला जातो.
70 वर्षापूर्वीची एक जागा आहे. कचरा डेपोच म्हणा. त्याचं रूपांतर त्यांनी एका इको पार्कमध्ये केलं आहे. ही एवढी मोठी जागा वाया तर घालवली नाहीच उलट शहराच्या सौंदर्यात या पार्कने भर घातली आहे.
अजून एक अशीच मला आवडलेली सुविधा म्हणजे जुन्या पेट बोटल्स बाय बॅक करायची जागा. त्यातून तुम्हाला काही पैसे मिळतात. ते तुम्ही स्वतर्‍ वापरा अगर चॅरिटीत द्या. पण बाटल्या फेकून देण्यापेक्षा त्या विकणं हे जास्त चांगलं नाही का? उपाय सोपा आहे. फूड मार्केटही मला असंच आवडलं. सुपरमार्केटला आपण उरलेलं अन्न देऊ शकतो, तिथं गरीब लोक ते विकत घेतात.
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर असलेलं फालून कॉपर माइनलाही आम्ही भेट दिली. त्यातून वीज वितरण व्यवस्थेविषयीही मला बरंच शिकता आलं.
इथंच मला कळलं की पाण्याच्या वाफेवर चालणार्‍या व्यवस्थेत 30 टक्के पाणी वापरले जाते; पण उरतलेल्या 0 टक्के पाण्यातून जी हीट तयार होते तिचा वापर हा अक्षरशर्‍ थक्क करणारा आहे.
नोबेल बॅँक्वेट आयोजित करण्यात आला होता. ब्लू हॉल या नोबेल म्युझियमला आम्ही गेलो होतो. तिथं 2018चे नोबेल विजेत्यांविषयी जाणून घेण्यात आले. अल्फ्रेड नोबेल यांचं आयुष्य, नोबेल विजेत्याची निवड प्रक्रिया, त्यासाठीची समिती हे सारं पाहता आलं.
स्वीडिश संस्कृतीशी आमची ओळख झाली. डाला हॉर्सला गेलो तिथं नॉर्डियाक गेम्स खेळलो, स्वयंपाक करायला शिकलो, झाडांची देखभाल शिकलो हे सारं फार वेगळं आणि आनंंदाचं होतं.
भारतातही असे प्रयोग व्हायला पाहिजेत. विशेषतर्‍ सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारली, स्वीडनसारखं एकच कार्ड सगळीकडे वापरता आलं तर प्रवास अधिक सोपे होतील. त्यानं कार्बन उत्सर्जनही कमी होईल.
स्वीडनच्या कॅम्पमध्ये प्रत्येक अनुभव नवीन होता. पर्यावरण प्रश्नांकडे पाहण्याची नजरही त्यातून बदलली. त्यासाठी आयव्हीएल संस्थेचे आभार आणि पर्यावरणासाठी असे प्रय} आपल्याकडेही व्हावेत, करता यावेत ही इच्छा आहेच.

 

*****************

आयव्हीएल र्‍ स्वीडिश इन्व्हार्यन्मेण्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटने एसईके सिटी एलिट स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत भारतीय आणि चिनी मुलांना शिष्यवृत्ती दिली होती. दोन आठवडे स्टॉकहोम येथे मुक्काम करून स्वीडनमधील पर्यावरणरक्षणाच्या प्रयत्नांचा अभ्यास मुलांनी करावा, असा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. 15 ते 19 वयोगटातले एकूण वीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने स्वीडनचा अभ्यास दौरा करून नुकतेच परतले आहेत. त्यात दहा भारतीय विद्यार्थाचा समावेश होता.
आयव्हीएल या संस्थेच्या बिझनेस डेव्हलपमेंट व्यवस्थापनपदी मूळ भारतीय असलेल्या रूपाली देशमुख काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात सहभागी असलेल्या श्रीनाभचा हा अनुभव.

Web Title: The simplest way to preserve the environment we learned in Sweden.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.