श्रद्धा कपूरचा हा सिल्क अनारकली कुर्ता- new fashion!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST2018-09-06T07:00:00+5:302018-09-06T07:00:00+5:30

लग्नसमारंभात, रिसेप्शनसाठी सिल्क वापरायचं असल्यास साडीऐवजी हा पर्याय

Shraddha Kapoor's silk Anarkali kurta- new fashion! | श्रद्धा कपूरचा हा सिल्क अनारकली कुर्ता- new fashion!

श्रद्धा कपूरचा हा सिल्क अनारकली कुर्ता- new fashion!

ठळक मुद्देश्रद्धा सारखेच तुम्ही सुद्धा सिल्क, कॉण्ट्रास्ट, अनारकली विथ पलाझो असा प्रयोग नक्की करून पाहा! 

श्रुती साठे 

स्थळ, काळ, वेळ बाजूला ठेऊन प्रत्येक स्त्री  ज्याच्या मोहात पडते ते म्हणजे रेशीम, अर्थातच सिल्क! मग ती पैठणी असो की कांजीवरम, बनारस सिल्क असो की ओरिसा आपले मन नक्कीच त्याकडे ओढले जाते.
साडी, लेहेंगा चोली, सलवार कमीज, ओढणी, स्टोल, कुठल्याही रूपात सिल्क सुंदरच दिसते. एखाद्या लग्नसमारंभात, रिसेप्शनसाठी सिल्क वापरायचं असल्यास साडीऐवजी कित्येक तरुणी सिल्क अनारकली कुर्त्यामध्ये  दिसतात. 
श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्नपटाच्या प्रमोशनसाठी हजर राहिली ती एका बनारसी सिल्क आउटफिटमध्ये. गुलाबी रंगाचा बनारसी सिल्कमध्ये बनवलेला अनारकली कुर्ता त्यावरील नाजूक बुट्टे आणि भरजरी बाह्यांमुळे सुंदर दिसला. त्या खाली तिने प्लेन रॉ सिल्कमधील पलाझो आणि कॉण्ट्रास्ट ओढणी वापरली. ओढणीदेखील निळ्या रंगावर भरजरी बनारसी बुट्टे आणि ठसठशीत काठ यामुळे भाव खाऊन गेली! 
 कपडय़ांमध्ये कॉटन आणि सिल्क, कॉम्बिनेशनमध्ये मोनोक्र ोम आणि कॉण्ट्रास्ट हे कधीच ट्रेण्डच्या बाहेर न जाणारे असे घटक आहेत.फिरून फिरून यामध्येच फॅशनचे जग रमताना दिसते. याशिवाय हल्ली बहुतांशी  लेगिंग्जऐवजी पलाझो वापरण्याचा ट्रेण्ड आहे, मग अगदी अनारकली खाली पलाझोदेखील सुरेख दिसतो. 
त्यामुळे श्रद्धा सारखेच तुम्ही सुद्धा सिल्क, कॉण्ट्रास्ट, अनारकली विथ पलाझो असा प्रयोग नक्की करून पाहा! 

 


 

Web Title: Shraddha Kapoor's silk Anarkali kurta- new fashion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.