शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

ऊसाचा रस फ्रिजमध्ये गारेगार करावा का?

By admin | Updated: April 4, 2017 17:28 IST

उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे.

- वैद्य राजश्री कुलकर्णीएन्जॉय धिस समर, बट..उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे. तो बल्य म्हणजे त्वरित ताकद देणारा आहे. त्यामुळेच ऊसाचा रस प्यायला की लगेच उत्साह वाटतो, तरतरी येते. रसात प्रत्यक्ष साखरच असल्यामुळे ती रक्तात लगेच जीभेवरूनच शोषली जायला लागते आणि पट्कन उत्साह, ताकद आल्यासारखे वाटते.खरं तर ऊसाचा रस काढून पिण्यापेक्षा ऊसाचे करवे करून ते चोखून जर रस घेतला तर तो अधिक गुणकारी असतो.यंत्रातून काढलेल्या रसात उसाचे मूळ, मधले खोड आणि वरचा टोकाचा भाग सगळेच पिळले जातात. त्यामुळे तो पचायला जड होतो. त्यातही लाकडी यंत्रातून काढलेला रस जास्त गुणकारी असतो, पण धातूच्या यंत्रात काढलेल्या रसात, धातुशी संपर्क आल्याने तो लवकर काळा पडतो, लवकर खराब होतो आणि कधीकधी जळजळ निर्माण करतो.उसाचा रस शिळा करून कधीही पिऊ नये. हल्ली कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाण्या पिण्याची नवी पद्धत रूढ होत आहे, पण शिळा रस दोष उत्पन्न करतो त्यामुळे नेहमी ताजाच रस प्यावा.आवडतो म्हणून एकावेळी खूप पोटभर रस पिणेही योग्य नाही. कारण तो पचायला जड होतो आणि मग कधीकधी जुलाब होऊ शकतात. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही दक्षता नक्की घ्यावी.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रस थंड गुणाचा असतो, पण त्यात बर्फ टाकला जाणारा बर्फ मात्र केवळ स्पर्शाला थंड असतो. गुणाने मात्र तो उष्ण असतो. त्यामुळेच पुष्कळ जणांना रस दुपारच्या वेळी प्यायल्यास उलट लघवीला किंवा छातीत जळजळ होते. त्यामुळे रसाचे खरे गुण हवे असतील तर साधाच रस प्यावा किंवा निदान कमीतकमी बर्खटाकावा .ऊसाचा रस म्हणजे एक प्रकारे कच्ची साखरच असते, त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर ऊसाचा रस लगेच पिऊ नये. कारण पोट एकदम जड होते.रसाचे नियम पाळून रस प्यायल्यास त्यासारखे उत्तम, तृष्णाहर नैसिर्गक पेय नाही हे मात्र खरं!सो एन्जॉय धिस समर विथ इट!! पियो ग्लासफुल !!rajashree.abhay@gmail.com