शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 7:00 AM

20 वर्षाची तिची कारकीर्द. आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिनं गाजवल्या; पण ऑलिम्पिकचं स्वप्न मात्र आजही हाका मारतं, त्यासाठी ती आता जोमाने तयारी करतेय.

ठळक मुद्दे प्रवास ऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरेर्पयतचा आणि त्या पुढचाही कष्टांचा आणि सरावाचाही!

संतोष मिठारी

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धामध्ये ती जिंकत होती. अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत होती. मात्र, तिचं स्वप्न असणार्‍या ऑलिम्पिकची संधी मात्र हुकत होती. एक-दोन नव्हे, तर चौदा वर्षे ती प्रयत्न करत राहिली. काहीही झालं तरी ऑलिम्पिक गाठायचंच असा निर्धार होता. अखेर दोहा इथं झालेल्या स्पर्धेत तिनं आपली ऑलिम्पिक ‘पात्रता’ सिद्ध केली आणि चौदा वर्षाचा वनवास यंदा संपवला. ती म्हणजे अर्थातच कोल्हापूरची ‘गोल्डन गर्ल’, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत.नेमबाजीत करिअरची 20 वर्षे पूर्ण करणार्‍या तेजस्विीनं आता ऑलिम्पिकचा ध्यास घेतला आहे.ऑलिम्पिकच्या तयारीतून जरा वेळ काढत कोल्हापूरला चार दिवसांच्या सुटीवर आलेल्या तेजस्विनीशी ‘ऑक्सिजन’ने खास गप्पा मारल्या.तिला विचारलंच की, 20 वर्षाची तुझी प्रदीर्घ कारकीर्द एकीकडे आणि आता ऑलिम्पिकला जाण्याची तयारी दुसरीकडे, अतीव परफेक्ट असलेल्या ऑलिम्पिकच्या या वारीची तयारी कशी करते आहेस?ती सांगते, ‘ऑलिम्पिक हे एक चार वर्षाचं चक्र (सायकल) असतं. कोणत्याही क्रीडाप्रकारातील खेळाडू असू दे, एक ऑलिम्पिक झालं की, तो पुन्हा पुढच्या ऑलिम्पिकची तयारी शून्यपासून करतो. त्याला मीदेखील अपवाद नाही.  त्यामुळे  साहजिकच टोकियो ऑलिम्पिकची तयारी मी 2016 पासूनच सुरू केली होती.प्रशिक्षक कुहेली गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली मी रणनीती ठरवली. काही चढउतार होव्ऊ शकतात, म्हणून आम्ही शॉर्ट टर्म गोल्स  ठरवले. एकेक पाऊल पुढं सरकू लागलो. मी रोज सात तास सराव करत होते. दिवस पहाटे पाच वाजल्यापासून सुरू व्हायचा. योगाभ्यास, ध्यानध्यारणा करून सकाळी साडेआठ वाजता मी शूटिंग रेंजमध्ये सराव सुरू करायचे. सायंकाळी सात वाजता सराव संपायचा. म्हणायला टोकियो ऑलिम्पिकसाठी अजून दहा महिने आहेत. पण तिथवर ‘फोकस्ड’ राहणं यासाठी आता सर्वतोपरी प्रय} करतेय.’

हे ‘फोकस्ड’ राहण्यासाठी नक्की काय करावं लागतं असं विचारलं तर मनस्विनी सांगते, ‘2006 पासून मला ऑलिम्पिकला जायचंच होतं. पण प्रयत्न करूनदेखील मी पोहोचू शकले नाही. आजवर अनेक मोठे टायटल्स जिंकले. मात्र, ऑलिम्पिक कोटा मिळत नव्हता. पण मी जिद्द सोडली नाही. माझे कुटुंबीय आणि प्रशिक्षक सोबत होते, त्यांनी मला बळ दिलं. माझं मनोधैर्य ते उंचावत राहिले. प्रशिक्षकांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून माझी तयारी करून घेतली. त्या बळावर कॉमनवेल्थ गेम्स (2006) मध्ये कोणाला अपेक्षित नसताना दोन पदकं मी मिळविली. पुढे 2018 र्पयत हा सिलसिला कायम राहिला. आंतरराष्ट्रीय पदकं तर मी जिंकत होतेच; पण समोर ऑलिम्पिक होतं. 2018 लाही मी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलं. तेव्हाही लक्ष्य समोर होतंच. त्यामुळे आपलं ध्येय समोर ठेवून चालत राहणं मी या काळात करत राहिले, असं तेजस्विनी सांगते.राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू म्हणतात, की तुम्हा कोल्हापूरकरांकडे काहीतरी एक असा ‘एक्स फॅक्टर’ आहे की, जो तुम्हाला कुठेही थांबू देत नाही. ‘असं कसं होत नाही, थांबा दाखवितो करून!’  या अ‍ॅटिटय़ूडसह पाठबळ, प्रोत्साहन, सराव आणि मेहनत यांचा हात मीही सोडला नाही. ’तेजस्विनी सांगत असते तिचा प्रवास. आणि 20 वर्षे सलग कारकीर्द गाजवणारी, एक-दोन नव्हे तर 88 पदकं जिंकणारी ही खेळाडू. मात्र आता तिच्यासमोर तिचं ध्येय आहे. आणि त्यासाठी तिची कठोर मेहनत सुरू आहे.ेआपली स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत तर उठून कामालाच लावतात, आणि शिकवतात कष्ट याचंच उत्तम उदाहरण म्हणजे तेजस्विनीची ही ऑलिम्पिकची तयारी आणि दीर्घ तपश्चर्या.त्याला यावेळी यश येवो याच शुभेच्छा!

( लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ बातमीदार आहेत.)