शूट इट!
By Admin | Updated: July 11, 2016 14:01 IST2016-07-11T14:01:39+5:302016-07-11T14:01:39+5:30
आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मग त्या पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह

शूट इट!
- विनोद चव्हाण
आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मग त्या पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह. आपल्याला काही गोष्टीही नेहमीच खटकतात. आपल्याला जाणिव करून देतात की, आपण ती समस्या समाजासमोर आणलीच पाहिजे.
पण जमणार कसं? इतके दिवस साधनं नव्हती, आता आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप तर आहेतच परंतु याही पुढे जाऊन परिस्थितीचे गांभीर्य व्हिज्युअल स्वरूपात दाखविण्यासाठी शॉर्टफिल्म हा देखील उत्तम पर्याय आहे.
आणि अनेकांना आता शॉर्टफिल्म बनवावीशीही वाटते आहे.
कशी बनवाल शॉर्टफिल्म
सर्वप्रथम एखाद्या अनुभवी व्यक्तीला भेटा. त्याची नक्कीच तुम्हाला मदत होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्टफिल्मस बघा. निरीक्षण करा. यासाठी तुम्हाला थोड्या आर्थिक खर्चाची तयारी ठेवावी लागेल.
* शॉर्टफिल्मचा विषय ठरवायला लागेल.
* त्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग.
* शॉर्टफिल्ममध्ये काम करणारे कलाकार शक्यतो तुमचे मित्र, शेजारी, नातेवाईक यांनाच तयार करा. जेणेकरून तुम्हाला शॉर्टफिल्मसाठी कलाकारांवर होणारा खर्च कमी होईल.
* त्यानंतर फिल्म व्यवस्थितपणे शूट करा. जास्तीत जास्त शॉर्टफिल्म ही ३० मिनिटांचीच असते. परंतु कमीत कमी वेळेत जास्त मांडण्याचा प्रयत्न करा.
-त्यानंतर अनुभवी व्यक्तीकडून शॉर्टफिल्मचे एडिटिंग करा. साजेसे म्युझिक द्या.
आणि मग यु ट्युब, फेसबुक इथं तुमची फिल्म पोस्ट करुन कौतूकही कमावता येईल!