बडय़ा फाईल्स इझी पाठवा !

By Admin | Updated: September 4, 2014 16:38 IST2014-09-04T16:38:25+5:302014-09-04T16:38:25+5:30

प्रेझेंटेशनची फाईल किंवा एखादा कामाचा फोटो ई-मेल करायचा झाला तरी मोठय़ा फाईल साईजमुळे नेहमी आपली पंचाईत होते. पण मग यावर उपाय काय? सध्या अनेक वेबसाईटस् अशा मोठय़ा फाईल्स पाठविण्यासाठी सेवा देत आहेत.

Send Buddy Files Easy! | बडय़ा फाईल्स इझी पाठवा !

बडय़ा फाईल्स इझी पाठवा !

अनिल भापकर anil.bhapkar@lokmat.com

एखादी प्रेझेंटेशनची फाईल किंवा एखादा कामाचा फोटो ई-मेल करायचा झाला तरी  मोठय़ा फाईल साईजमुळे नेहमी आपली पंचाईत होते.  पण मग यावर उपाय काय? सध्या अनेक वेबसाईटस् अशा मोठय़ा फाईल्स पाठविण्यासाठी सेवा देत आहेत. त्यांची पेड सव्र्हिस घेतली असता आणखी जास्त साईजच्या फाईल्स आपण पाठवू शकतो.

अशा प्रकारच्या वेबसाईटवर आपल्याला आपले नाव तसेच ई-मेल आणि ज्याला ही फाईल पाठवायची त्याचे नाव आणि ई-मेल अॅड्रेस द्यावा लागतो. त्यानंतर तिथे आपली भली मोठी फाईल साईज असलेली फाईल अॅटॅच करण्याची सोय असते. यावर क्लिक केले की, आपली फाईल या वेबाईटवर अपलोड होते. आणि मग ती तेथून डाऊनलोड करण्यासाठीची लिंक आपल्याला ज्याला फाईल पाठवायची आहे त्याला पाठविली जाते.  म्हणजे प्रत्यक्षात फाईल ई मेल न  होता त्याची डाऊनलोड लिंक फक्त समोरच्या पाठविली जाते. म्हणजे या लिंकवर क्लिक करून फाईल डाऊनलोड करता येते. अशा ब:याच वेबसाईटवर फाईल पाठविण्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागते. आज अशा मोठी फाईल पाठविण्यासाठी मोफत सेवा देणा:या काही वेबसाईट विषयी जाणूव घेऊ.
 
www.filemail.com
ही वेबसाईट मागील अनेक वर्षापासून मोठी फाईल  मोफत पाठविण्यासाठी सेवा देते. यामध्ये फाईल पाठविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. यामध्ये जवळपास 2 जीबीर्पयत फाईल मोफत पाठवता येऊ शकते. अगदी सोपे आणि सुटसुटीत  ऑप्शन्स यामध्ये आहेत. फाईल कोणाला पाठवायची त्याचा ई-मेल आयडी टाकून फाईल कोणी पाठविली त्याचाही ई- मेल आयडी टाकावा लागतो. त्याचबरोबर काही मेसेज लिहायचा असल्यास त्याचीही सुविधा यामध्ये आहे. त्या बरोबरच सिंगल क्लिकमध्ये एकापेक्षा जास्त फाईल अॅटॅच करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. अजून महत्त्वाचे म्हणजे समोरच्याने फाईल किती वेळा डाऊनलोड करावी याची सुद्धा मर्यादा आपण घालून देऊ शकतो. त्याचबरोबर फाईल किती दिवस वेबसाईटवर राहावी, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. समोरच्याने फाईल डाऊनलोड केली की, त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळते. 
 
www.transferbigfiles.com
या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. यावरही सोपे आणि सुटसुटीत असे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामध्ये 20 एमबीर्पयत फाईल मोफत पाठवता येऊ शकते. यामध्ये एकूण 25 फाईल्स आपण अॅटॅच करू शकतो. वरीलप्रमाणो ज्याला फाईल पाठवायची त्याचा ई-मेल आयडी टाकून आणि ज्याचे फाईल पाठविली त्याचा ई-मेल आयडी टाकवा लागतो. या वेबसाईटवर पाच दिवस किंवा 2क्  डाऊनलोड र्पयत फाईल वेबसाईटवर राहते. यामध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही. 
 
www.fileapartment.com
यामध्ये 1 जीबीर्पयत फाईल मोफत पाठवता येऊ शकते. फाईल पाठविण्याची पद्धत वरील बेसाईटप्रमाणोच आहे. यावर फरक फक्त एवढाच आहे की, तुम्ही वेबाईटवर फाईल फक्त 1  दिवस किंवा 1 डाऊनर्पयतच ठेवू शकता त्यापेक्षा जास्त दिवस किंवा डाऊनलोडला ही वेबसाईट परवानगी देत नाही. 
 
www.dropsend.com
यामध्ये जवळपास 4 जीबीर्पयत फाईल पाठवता येऊ शकते. फाईल पाठविण्याची पद्धत वरील वेबसाईटप्रमाणोच आहे. फरक फक्त एवढाच आहे की, यामध्ये एकाच वेळेस एकापेक्षा अनेक लोकांना एकच फाईल आपण पाठवू शकतो.
 

 

 

Web Title: Send Buddy Files Easy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.