निर्माल्य दिंडी आणि श्रमदानाला सलाम
By Admin | Updated: August 29, 2014 10:37 IST2014-08-29T10:08:28+5:302014-08-29T10:37:59+5:30
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच,

निर्माल्य दिंडी आणि श्रमदानाला सलाम
>वीर हनुमान गणेश मंडळ,
खामगाव
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच, हिंदूचा सर्वांत मोठा उत्सव, दुर्देवानं दंगलीचं प्रमाणही याच काळात जास्त. मुस्लीमबांधव तर यासार्यापासून दूरच राहतात. खामगावातील वीर हनुमान गणेश मंडळ मात्र याला अपवाद आहे. या मंडळाने द्वारकाबाई चेके यांना एका वर्षी अध्यक्ष करून महिलांचा सन्मान केला तर एकदा शेख बब्बू शे.रब्बानी अध्यक्षपद दिलं. कधी शंकर धुरंदर सारखा मागासवर्गीय तरूण, तर कधी जसवंत सिंग सारखा शिख बांधव या मंडळाच्या अध्यक्षपदी राहिला आहे. अशी वेगळी ओळख सांगणार्या या मंडळाने २९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केलाय. जातीय सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यात नेहमीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही मागे वर्गणीसाठी ससेमिरा लावत नाहीत. ऐच्छिक रूपाने मिळणारी वर्गणी व o्रमदान हे या मंडळाचे वैशिष्ट्य. सन २0१२ मध्ये मिळालेल्या गणराया पुरस्काराच्या २५ हजारांच्या रकमेत या मंडळाकडील जमा रक्कम तसेच काही दानशुरांच्या मदतीने या मंडळाने आता ‘स्वर्गरथ’ खरेदी केला आहे. हा रथ खामगाव व परिसरात अत्यंयात्रेत ना नफा ना तोटा या पद्धतीने वापरला जातो. रक्तदानासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव पुढे असतात. गणेशोत्सवाच्या काळात त्या नगरातील सार्वजिनक स्वच्छता करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. या मंडळाने मोठ मोठे डिजे आतापर्यंत कधीही वापरले नाही. संपूर्ण दारूमुक्त असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीत शारीरिक कसरतींवर दिला जातो.
या मंडळाची मूर्तीही अनोखीच असते. बांबू, भांडी, कागद, कोरफड, क्रीडा साहित्य अशा साधनांचा वापर करून या मंडळाची गणेशमूर्ती साकारते. गेल्या वर्षी १५ फुटांची बांबूची मूर्ती होती व यावर्षी कागद व मातीपासून बनविलेली ११ फुटांची मूर्ती नवे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळाने प्लॉस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बसविलेली नाही. पुजेसाठी लागणारी लहान मूर्ती सुद्धा मातीचीच असेल हा नियम आहे.
दहा दिवस गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीच्या विसर्जनानंतर निर्माल्याचा प्रश्न मोठा गंभीर होतो, त्यामुळे निर्माल्य जमा करून स्वच्छतेचा संदेश देणारी या मंडळाची निर्माल्य दिंडीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळाचे कार्यकर्ते दिंडी काढून निर्माल्य गोळा करतात.
मनजितसिंग, राजेंद्र कोल्हे, पुरूषोत्तम सातव, प्रमोद जैन या युवकांनी तरूणाई फाउंडेशन स्थापन करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांचा वसा उचलला आहे. त्यामुळे यांच्या प्रत्येक कार्यात o्रमदानाचे महत्त्व सर्वाधिक आहे. पर्यावरण रक्षणाचा कृतीयुक्त संदेश देण्यासाठी दरवर्षी हे खामगाव ते शेगाव ही १८ किमीची स्वच्छता दिंडी पालखी मार्ग स्वच्छ करतात.