गरब्याच्या तालावर साल्सा + झुंबा

By Admin | Updated: October 8, 2015 21:00 IST2015-10-08T21:00:19+5:302015-10-08T21:00:19+5:30

एक जमाना था, जब गरबा-दांडिया सिर्फ माताजी की पूजा के रूप में खेला जाता था, अब तो यह इव्हेण्ट बन गया है.

Salsa + Zumba on Garbha Taal | गरब्याच्या तालावर साल्सा + झुंबा

गरब्याच्या तालावर साल्सा + झुंबा

- अल्पेश सोळंकी

एक जमाना था, जब गरबा-दांडिया सिर्फ माताजी की पूजा के रूप में खेला जाता था, अब तो यह इव्हेण्ट बन गया है.
और इव्हेण्ट है, तो एन्जॉयमेण्टभी आ ही जाता है.’
- अल्पेश सोळंकी सांगतो. हा अल्पेश डान्स टीचर आहे. पण साधासुधा नाही, तो गरबा-दांडियाचे क्लासेस घेतो, तेही बडेबडे कार्पोरेटवाले. आणि ज्या टीमने ‘रामलीला’मधे दीपिका आणि रणवीरला गरबा स्टेप्स शिकवल्या, ज्या काही सुंदर गिरक्या शिकवल्या, त्या टीमचा अल्पेश हा एक भाग होता.
त्यामुळे सध्या दीपिकाला गरबा शिकवणारा गरबा टीचर अशी त्याची ओळख आहे.
‘ऑक्सिजन’ने त्यालाच विचारलं की, यंदा जे गरबा शिकायला येतात, त्यांना काय शिकायला आवडतंय? नेमकी क्रेझ कसली आहे?
त्यानं सांगितलेले गरब्याचे हे काही भन्नाट प्रकार.
नवीनच अर्थात. कारण मूळ पारंपरिक गरब्यात हे काही नव्हतं. पण ग्लोबल होऊ पाहणारा गरबाही नव्या गोष्टींना कसा सामावून घेतो आहे, याची ही एक झलक.
पूर्वी पारंपरिक पद्धतीनं एकमेकांशी ताल जुळवत गरबा व्हायचा. गरबा हा कधीच एकटय़ाचा, स्वत:च्या मर्जीनं चालणारा खेळ नव्हता. पण आता नऊ दिवस गरबा खेळायचा आणि त्यापूर्वी पंधरा दिवस तो शिकून सराव करायचा तर त्यातूनही काहीतरी भन्नाट आणि आपल्या फायद्याचं तरुण मुलंमुली शोधू लागले. त्यांना काहीतरी हटके हवं होतं. ग्लॅमरसही, वेगळंही, स्टायलिशही. त्यात नव्या आधुनिक डान्सफॉर्मची क्रेझ.
मग गरबा शिकवणारेही नव्या-जुन्याचा मेळ घालत नवेच गरबे घालताहेत.
त्यातून काही नवीनच गरबा प्रकार निर्माण झाले.
त्या सा:यांना एकाच संकल्पनेत घालायचं तर त्याला ‘फ्युजन गरबा’ असं म्हणता येईल!
या फ्युजन गरब्याचीच सध्या क्रेझ आहे.
आणि मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांतच नाही, तर अनेक लहानमोठय़ा शहरांत सध्या दिवसरात्र फ्युजन गरब्याच्या शिकवण्या सुरू आहेत.
त्यातून गरबा वेस्टर्न होतोय असं नाही म्हणता येणार, तर वेस्टर्न गोष्टी गरब्याचा ताल धरून नाचताहेत असं म्हणावं लागेल.
कारण मूळ गरब्याचा आत्मा तसाच ठेवून आता नवनव्या गिरक्या नी उडय़ा मारल्या जाताहेत, ज्या दुस:या डान्स प्रकारातून येत आहेत.
त्यातही सध्या सगळ्यात जास्त क्रेझ असलेल्या गरब्यांची ही एक झलक !!
 
 
1) साल्सा गरबा
टीव्हीवरचे डान्सचे कार्यक्रम पाहून पाहून सध्या साल्साची क्रेझ तशीही तरुणांमधे मोठी आहे. त्यातूनच आता गरबा शिकणारेही त्यात साल्साचे प्रयोग करताहेत. साल्सातल्या गिरक्या, दोघांनी मिळून नाचताना करण्याच्या डान्स स्टेप्स आता गरब्याच्या निमित्तानं गरब्याशी जुळवल्या जात आहेत. आणि त्यातूनच साल्सा गरबा लोकप्रिय होतो आहे. अनेक तरुण कपल्स आता जोडीनं साल्सा गरब्याच्या शिकवणीला जात आहेत.
2) झुंबा गरबा
झुंबा हा अनेकांना डान्स फॉर्म वाटत असला तरी आहे तो व्यायामच. त्यामुळे गरब्यातून व्यायाम करू पाहणारे आणि नवरात्रत उपवास करणारे अनेकजण वजन कमी करण्याचे बहाणो म्हणून या झुंबा गरब्याकडे वळत आहेत. झुंबाचे बिट्स, त्यातले ताल, गरब्याचा ताल यावरून स्टेप्स केल्या जातात आणि घसघशीत व्यायाम होत वजन कमी करण्याचे प्रय} सुरू होतात. हा व्यायाम प्रकार अधिक गरबा नंतर घरीही करता येऊ शकतो. म्हणून सध्या झुंबा गरबाची शिकवणी अनेकजण लावताहेत.
3) बेली डान्सिंग
सुटलेल्या पोटाचे प्रश्न तर सगळ्यांनाच छळतात. त्यात मुलीच नाही तर मुलंही आता सिक्स पॅकच्या जमान्यातले. त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हावी म्हणून प्रय} करणारेच जास्त. त्यातून बेली डान्सिंगची क्रेझ. आणि बारीक होण्याचा सोस.
म्हणून मग गरब्यातही बेली डान्सिंग येतंय. अनेक जण बेली गरबा शिकताहेत. प्रय} असा की, त्यातून तरी आपलं वजन कमी व्हावं.
4) हीपहॉप आणि फ्युजन
हीपहॉपचंही तेच. त्या डान्स प्रकाराची ओढ आणि गरब्याची हौस. वेळ कमी. मग त्यातल्या काही स्टेप्स गरब्यासोबत शिकवून नवीन फ्युजन गरबा आकार घेतोय. बडय़ा इव्हेण्टी गरब्यात मागच्याही वर्षी याच हीपहॉप गरब्याची क्रेझ होती.
5) पारंपरिक गरबा
हे सारं एकीकडे होत असताना जास्त ऑथेण्टिक, जास्त लोककलात्मक गरबा शिकण्याची हौसही वाढते आहे. अनेकजण असा पारंपरिक गरबाही शिकताहेत. त्यातूनच पारंपरिक, हरवत चाललेल्या मूळ रूपातील गरबाही पुन्हा तरुण करतील आणि तो जपतील अशी आशाही वाढते आहे.
 

Web Title: Salsa + Zumba on Garbha Taal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.