शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

धावणारी स्वप्नं : पूनम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 12:00 IST

ती बुलडाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यातली. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. धावण्याच्या ओढीनं नाशिकला आली. आणि आत्ता ती चीनला निघालीय.. परवा होणाºया एशियन क्रॉस कंट्रीसाठी!

नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर पूनम सोनूने या अ‍ॅथलिटला भेटलो तेव्हाही ती तिथे सरावच करत होती.पण तिचं आयुष्यच धावण्यात गेलं आहे. लहानपणापासून ती धावतेच आहे. चार वर्षांपूर्वी ती नाशिकला आली, आता नाशिकचीच झालीय. बारावीत शिकतेय. पण खरं तर ती बुलडाणा जिल्ह्यातल्या सागवन या लहानशा खेड्यातली. तिचे आई-वडील दोन्हीही शेतमजूर आहेत. शेतातच राबतात. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातच पत्र्याच्या शेडचं दोन रूमचं त्यांचं घर आहे. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. पाचवीपर्यंत गावीच तिचं शिक्षण झालं. पण आणखी चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सहावीपासून ती बुलडाण्याला आली. तिच्या गावापासून शाळा तीन-चार किलोमीटर अंतरावर. रोज पायीच शाळेत जायची. शाळेच्या मैदानावर पळायची. शाळेच्या लहान-मोठ्या स्पर्धांत भाग घ्यायची. सुरेंद्र चव्हाण या क्रीडाशिक्षकानं हे पाहिलं आणि स्वत:च्या पैशांतून तिला एक जुनी सायकल घेऊन दिली. पूनम त्यावेळी सातवीत होती. त्यानंतर घर ते शाळा असा सायकलनं तिचा प्रवास सुरू झाला. आठवीत असताना या प्रवासाला अचानक कलाटणी मिळाली.

त्या वर्षी कांदिवलीत धावण्याची एक राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यावेळी एका सरांनी नाशिकचे अ‍ॅथलेटिक कोच विजेंद्रसिंग यांच्याशी तिची ओळख करून दिली. विजेंदसिंग सरांची, ज्या मोठमोठ्या खेळाडूंना ते ट्रेनिंग देतात, त्यांची माहिती सांगितली. कविता राऊतचे फोटो पूनम वर्तमानपत्रांतून ओळखतच होती. त्याच क्षणी तिला वाटलं, आपणही नाशिकला जावं. पूनम सांगते, ‘डोक्यात नाशिकचा किडा तर वळवळायला लागला, पण ते इतकं सोपं नव्हतं. पैशाचा तर मोठ्ठाच प्रश्न, शिवाय शिकायचं कुठे, राहायचं कुठे, आपल्याला ट्रेनिंगसाठी सर परवानगी देतील की नाही, शिवाय ‘मुलगी’ असण्याचे तोटे! एकट्या मुलीला परक्या शहरात कसं पाठवायचं, असे प्रश्न...’पूनमच्या डोक्यात दिवसरात्र नाशिकचाच विचार. घरीही तिनं वडिलांना पटवून ठेवलं; पण जायचं कसं? बुलडाण्यात पाटील म्हणून होमगार्डचे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्या ओळखीनं पूनमनं मग विजेंद्रसिंग सरांशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर पूनम वडिलांसह नाशिकला विजेंद्रसिंग सरांना भेटायला आली. ‘मला ट्रेनिंगसाठी घ्या’ म्हणून त्यांना विनंती केली.

सरांनी परवानगी दिली आणि दहावीत, २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पूनम नाशिकमध्ये दाखल झाली. ती तारीख तिला चांगलीच लक्षात आहे!पण इथे आल्यावरचा प्रवास आणखीच खडतर होता. भोसला विद्यालयात दहावीला तिनं अ‍ॅडमिशन घेतली. त्यासाठी दहा हजार रुपये लागले. नाशिकच्याच रचना विद्यालयाच्या होस्टेलमध्ये प्रवेश घेतला. होस्टेलची फी अगोदर अडीच हजार, नंतर तीन हजार रुपये महिना...कसेबसे पैसे जमवले.. त्यानंतरही वडील उधार उसनवारी करून पूनमला खर्चासाठी पैसे पाठवत होते. दोन वर्षं अशीच खूप ओढग्रस्तीत, पाच पाच पैसे वाचवून तिनं काढले.तिकडेही लोकं वडिलांना टोचून बोलतच होते, ‘तुम्ही एवढे लॅण्डलॉर्ड लागून गेलेत का?.. ऐपत नसतानाही बाहेरगावी मुलीला शिकवता.. शेवटी मुलगी परक्याचंच धन आहे..’ ..पण वडिलांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि पूनमलाही काहीही झालं तरी नाशिक सोडायचं नव्हतं. मैदानावर एवढी घाम गाळायची, पण त्यानंतरही बºयाचदा तिचा आहार असायचा एक कप चहा आणि दोन बिस्किट!२०१६ मध्ये हा प्रवास थोडा सुसह्य झाला. भोसलाच्या होस्टेलवर राहायची तिला परवानगी मिळाली. एकलव्य अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा यांसारख्या स्पॉन्सर्सकडून काही मदत मिळाली.भोसलातच शिकायचं आणि तिथल्याच मैदानावर प्रॅक्टिसही करायची!पूनमची दगदग बºयापैकी कमी झाली, रोजचं टेन्शन थोडं कमी झालं आणि मग तिचा मैदानावरचा परफॉर्मन्सही झपाट्यानं सुधारला.गेलं, २०१७ हे वर्षं तर तिनं अक्षरश: गाजवलं.पुण्यात बालेवाडीला झालेल्या अंडर नाइनटीन स्कूल नॅशनलमध्ये तिनं थेट दोन गोल्ड मेडल्सना गवसणी घातली.हैदराबादला झालेल्या युथ नॅशनलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.गेल्याच वर्षी बॅँकॉक येथे झालेल्या युथ एशियन चॅम्पियनशिपसाठीही तिचं सिलेक्शन झालं आणि त्यात चौथ्या क्रमांकापर्यंत तिनं झेप घेतली. तिचं ब्रॉँझ मेडल थोडक्यात हुकलं.यंदा दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेतही तिनं गोल्डवर आपलाच हक्क सांगितला.मैदानावरच्या अफलातून कामगिरीमुळे चीनमध्ये होणाºया एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेसाठीही तिचं सिलेक्शन झालंय. त्यासाठी ती रवाना होतेय..याच आठवड्यात १५ मार्चला चीनमध्ये ही स्पर्धा आहे..पूनम सांगते, मी जेव्हा नाशिकला आले, त्यावेळी नॅशनलपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, एवढंच मिनिमम ध्येय मी समोर ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपण कधी खेळू असा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. त्या तुलनेत चांगला पल्ला मी गाठला आहे; पण मुळातच फार पुढचा विचार मी करत नाही. आज, आत्ता बेस्ट करायचं एवढंच ध्येय मी डोळ्यांसमोर ठेवते. आॅलिम्पिक खेळायला कोणालाही आवडेल; पण आत्ता तरी माझ्या डोळ्यांसमोर आहे ते एशियन क्रॉस कंट्री.. त्यात उत्तम कामगिरी मला करायचीय. पुढंच पुढे पाहू..’

विशेषांक लेखन - समीर मराठे

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)