शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 3:42 PM

आपण नोकरी करतो, आनंदानं करतो का? रोज ऑफिसला जाताना आनंदी असतो का? की मारून मुटकून करतो?

ठळक मुद्देतुम्हाला आवडेल असंच काम निवडा, परंतु नावडतं काम करावं लागलं तर ते नावडतं काम आवडीने करायला शिका!

- डॉ. भूषण केळकर

मी आता इकडे कॅलिफोर्नियाहून न्यूयॉर्कच्या विमानात बसण्याकरता रांगेत उभा होतो. लांबवरच्या काउंटवरच्या एक ऑफिसरने मला बोलावले, ‘चेक इन’ करायला मदत करते म्हणाली. सर्व कागदपत्रे पाहून बॅग्जचे वजन केल्यावर एका बॅगेचे वजन 54 पाउंड आणि दुसरीचे 40 पाउंड भरले. विमानात दोन बॅगा प्रत्येकी 50 पाउंडर्पयत चालतात. त्यामुळे ‘तुम्ही जरा बाजूला उभे राहून बॅग्जचे वजन अ‍ॅडजस्ट करून या’ म्हणाली. हे सगळं स्मितहास्य चेहर्‍यावर ठेवून! कपाळावर आठय़ा पाडून नव्हे!पुढे सिक्युरिटीमध्ये माझ्या हातातल्या सामानात मित्राने दिलेला ‘बाकलावा’ नावाचा खाण्याचा (चिक्कीसारखा) गोड पदार्थ होता. त्याबद्दल खात्री करून मला पुढे जायला परवानगी देताना तिथली सिक्युरिटीची मुलगी म्हणाली, यू आर गुड टू गो, बट डोण्ट फरगेट टू ब्रश व्हेन यू इट धिस!   चिक्कीसारखा गोड पदार्थ असल्याने, खाल्ल्यावर ब्रश करायला विसरू नको हे सांगण्याचा सहजपणा, त्यातला नर्म विनोद ही सारी वरकरणी दिसायला अत्यंत साधी उदाहरणं आहेत.पण मला महत्त्वाची जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या दोघींची आपलं काम  एन्जॉय करण्याची वृत्ती. आपल्याकडं कसं चित्र दिसतं? जो तो आपापल्या विवंचनेत! काम करताना आपण दुसर्‍यावर उपकार करतोय, पोट जाळायला करावंच लागतं म्हणून करतोय किंवा अन्य पर्यायच नाही म्हणून हे करतोय असे दुमरुखलेले, कंटाळलेले, कटकटलेले चेहेरे, तशीच देहबोली. त्यासह सुरू असलेलं काम.ही गोष्ट खरी आहे की भारतात विवंचना आणि प्रश्न, त्याचं स्वरूप, याची व्याप्ती वेगळी आहे. इथल्या परिस्थितीशी सरसकट तुलना पाश्चिमात्य देशांशी करणं चूकच आहे, तरीसुद्धा आपल्याला सॉफ्ट स्किल्समध्ये शिकायची गोष्ट आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे, एन्जॉय व्हाट यू डू! परदेशात तुम्ही पहाल तर अनोळखी लोक तुम्हाला सहजपणे  गुड मॉर्निग म्हणतील! आपण मात्र काही कारण असेल तरच दुसर्‍याकडे पाहून हसतो!तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. अर्थात, ती सॉफ्ट स्किलशी निगडित आहे. मोबाइल नसलेल्या काळातली ही गोष्ट. एका फॅक्टरीत एक स्त्री काम करत असते. तिथं येणार्‍या अनेक कर्मचार्‍यांमधील हीच स्त्री फक्त त्या फॅक्टरीच्या सिक्युरिटी गार्डला  सकाळी न चुकता गुड मॉर्निग म्हणत असे. काम संपवून घरी जाताना तशीच सुहास्यमुद्रेने गुडबाय म्हणायची आणि घरी जायची.एक दिवस ही स्त्री ओव्हरटाइम करते आणि कामावरून तिला घरी जायला उशीर होतो. खरंतर खूप उशीर होतो. इतका की तिच्या युनिटची सर्व दारं बंद केली जातात. ती आत फॅक्टरीत अडकते. खायला-प्यायला नाही, घरच्यांना कळवता येत नाही. अत्यंत काळजीत असताना तो सिक्युरिटी गार्ड नेमका दारं उघडून आत येतो आणि तिला म्हणतो, ओह, देअर यू आर!’ कुठलीही सूचना मिळालेली नसताना तो फॅक्टरी उघडून तिचं युनिट तपासतो कारण त्याला आठवतं की सकाळी तर या बाई आत कामाला गेल्या पण आज जाताना दिसल्या नाहीत, गुडबाय म्हणाल्या नाहीत आणि तिचं युनिट तर बंद आहे. इतर सर्व घरी गेलेत. म्हणजे ती नक्कीच अडकली आहे!गोष्ट सोपी, पण साधं सॉफ्ट स्किल्स माणसांना कसं कनेक्ट करतं आणि त्याचा काय फायदा होतो हे सांगणारी.आपलं काम आनंदानं करणं, नम्रतेनं बोलणं हे एक महत्त्वाचं सॉफ्ट स्किलच आहे. विवेकानंद म्हणत तुम्हाला आवडेल असंच काम निवडा, परंतु नावडतं काम करावं लागलं तर ते नावडतं काम आवडीने करायला शिका!