robot brothers , russian robot soldier | रोबोट ब्रदर्स - रशियानं तयार केलेत रोबोट सैनिक, आता युद्धावर तेच जाणार !

रोबोट ब्रदर्स - रशियानं तयार केलेत रोबोट सैनिक, आता युद्धावर तेच जाणार !

ठळक मुद्देलवकरच त्यांच्या तुकडय़ाही आकार घेतील, अशी चर्चा आहे.

- प्रसाद ताम्हनकर 

आपल्या देशाच्या सैन्यात घातक शस्नस्रं दाखल करू नका असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने विविध देशांना वारंवार केलं आहे.
काहीवेळेला दबाव टाकण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. 
मात्न तरीही संरक्षण क्षेत्नात अधिकाधिक गुंतवणूक करत, आपली संरक्षणव्यवस्था अधिक घातक, अधिक आधुनिक करण्याचा अनेक मोठय़ा राष्ट्रांचा प्रयत्न सतत चालू असतो. हे प्रयत्न कधी छुप्या मार्गाने चालू असतात, तरी कधी उघडपणो. 
आता रशियाच्या अॅडव्हान्स रिसर्च फाउण्डेशन या अधिकृत सरकारी संस्थेनं दावा केला आहे, की लवकरच रशियाच्या पायदळ सैनिकांची जागा रोबोट्स अर्थात यंत्नमानव घेणार आहेत. 
युद्धात होणारी सैनिकांची जीवितहानी त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकते. तसंच सैनिकांची वाहतूक, त्यांच्यातील संदेशवहन, अचूकता आणि शत्नुसैन्याची अधिकाधिक हानी करणं हे सारं हे रोबोटच करतील.
क्रेमलिन लवकरच ‘टर्मिनेटर’सारख्या दिसणा:या या रोबोट्सना पायदळात दाखल करत आहे. तेथील मानवी सैनिकांची जागा हे नवे ‘रोबोट ब्रदर्स’ घेणार आहेत. 
डॅव्हिडोव्ह या अधिका:यानं नुकतीच ही माहिती दिली. डॅव्हिडोव्ह हे अॅडव्हान्स रिसर्च फाउण्डेशनचे डेप्युटी डिरेक्टर आहेत. 
हे नवे रोबोट ब्रदर्स टर्मिनेटरपेक्षाही अधिक धोकादायक असणार आहेत. हे रोबोट ब्रदर्स मानवी सैनिकांपेक्षा अधिक उत्तम प्रकारे हल्ल्यासाठी आपले लक्ष्य निवडू शकतील. अधिक वेगाने, अचूकतेने लक्ष्यभेद करू शकतील. सेन्सर्स डेटाला रिस्पॉन्स देऊ शकणा:या रोबोट ब्रदर्ससाठी एक वेगळा अल्गोरिदमदेखील लिहिण्यात आला आहे, ज्याद्वारे त्यांच्या गोळीबाराचे नियंत्नण करता येणो शक्य होणार आहे.
 रशियन संरक्षण मंत्नालयाचे म्हणणो आहे की मानवांची जागा घेणारे रोबोट मानवी सैनिकांना जीवितहानीच्या धोक्यातून वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.
सेंटर फॉर नेव्हल अॅनालिसेसचे सल्लागार सॅम्युअल बेंडेट यांनी एका मुलाखतीत सांगितले. रोबोट ब्रदर्सची ही अत्याधुनिक मानवरहित व्यवस्था वेळप्रसंगी नागरीवस्ती आणि सैनिकी लक्ष्यं कोणती हे ओळखण्यात सक्षम असतील त्यामुळे मनुष्यहानी टळू शकेल.
रशिया गेल्या काही काळापासून रोबो फायटर तयार करण्यासाठी प्रयत्न करत होती. फेब्रुवारी 2019 मध्ये, रशियाच्या अॅडव्हान्स्ड रिसर्च फाउण्डेशनने छोटय़ा रणगाडय़ांचा एक एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये सैन्याच्या पुढे आघाडीवरती हे छोटे रणगाडे आणि त्यांच्या जोडीला संरक्षक ड्रोन्सची मोठी टोळी अशी योजना असणार आहे. 
असे मानले जात आहे, की हे रणगाडे आणि त्यांच्या बरोबरीचे ड्रोन्स शत्नूच्या हालचाली बेमालूमपणो, अचूकतेने टिपून मागे तैनात असलेल्या या रोबोट ब्रदर्सच्या सैन्याकडे पोहोचवतील. त्या माहितीच्या जोरावर आपले लक्ष्य निश्चित करून हे रोबोट सैनिक आपापल्या लक्ष्यांवरती वेगवान हल्ले सुरू करतील.
 रशियन सैन्याने सिरीया युद्धामध्ये मिळवलेल्या अनुभवाच्या आधारे 2क्2क् नंतर शहरी 
भागात लढण्यासाठी आधी ग्राउण्ड रोबोटचा वापर केला जाईल, असे सांगितले जात आहे. 
अर्थात संयुक्त राष्ट्रसंघासह अनेकांनी या प्रकारच्या घातक तंत्नज्ञानाच्या वापरावरती पूर्णपणो मानवी नियंत्नणाची गरज असल्याचा मुद्दा मांडला आहे. 
मात्र त्याला न जुमानता अमेरिकेनेही रोबोटिक तंत्नज्ञानामध्ये जोरदार गुंतवणूक केली आहे. रशियाने तर यापुढे पाऊल टाकत यावर्षी अशा रोबोट सैनिकांना सैन्यात तैनात करण्याचीच योजना आखली आहे.
लवकरच त्यांच्या तुकडय़ाही आकार घेतील, अशी चर्चा आहे.


( प्रसाद तंत्रज्ञानविषयक लेखक/पत्रकार आहे.)
स्र1ं2ं.ि3ेंँंल्ल‘ं1ॅें्र’.ूे

Web Title: robot brothers , russian robot soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.