राइट टू लव्ह
By Admin | Updated: February 5, 2015 18:55 IST2015-02-05T18:55:57+5:302015-02-05T18:55:57+5:30
राइट टू लव्ह’ अर्थात प्रेम करण्याचा अधिकार मागत आता राज्यभरात तरुण मुलं उघड संताप व्यक्त करताहेत.आम्ही कुणावर प्रेम करायचं? कुणाला जोडीदार निवडायचं?

राइट टू लव्ह
>प्रेमात पडण्याचा अधिकार आहे आम्हाला, हे ओरडून का सांगावं लागतंय?
‘राइट टू लव्ह’ अर्थात प्रेम करण्याचा अधिकार मागत आता राज्यभरात तरुण मुलं उघड संताप व्यक्त करताहेत.आम्ही कुणावर प्रेम करायचं? कुणाला जोडीदार निवडायचं?
हे ठरवणारा समाज कोण? असा त्यांचा सवाल आहे! तुम्हाला काय वाटतं,
विशेषत: खेड्या-पाड्यात जिथं आजही कुणा मुलाली उघडपणे मुलाशी बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, जरा कुणी बोलताना दिसलं की, लगेच कुजबूज सुरू.
अशा वातावरणात खरंच आज प्रेमात पडण्याची भीतीच वाटते का? जातीपातीचे आणि घरच्यांचे काच सैल होण्याऐवजी वाढताहेत का? तुमचा अनुभव आणि मनातील बोच, संताप आणि स्पष्ट मतं.
काय ते नक्की लिहा.
अंतिम मुदत - १३ फेब्रुवारी
पत्ता - संयोजक, ऑक्सिजन, लोकमत भवन, बी- ३, एम.आय.डी.सी, आंबड, नाशिक - ४२२०१० फोन - ०२५३ - २३८५४६५ email: oxygen@lokmat.com
पाकिटावर- राइट टू लव्ह असा उल्लेख करायला विसरू नका.