RESTORE

By Admin | Updated: September 11, 2014 17:10 IST2014-09-11T17:10:07+5:302014-09-11T17:10:07+5:30

‘जीमेल’मधले कॉण्टॅक्ट्स डीलीट झाले, तर काय कराल? अगदी सोप्पंय!

RESTORE | RESTORE

RESTORE

जगभरातल्या गोष्टी हल्ली आपण मेलवरच ठेवतो. सगळे कॉण्टॅक्ट्स तिकडे, सगळा बॅकपही घेऊन ठेवतो. त्या कॉण्टॅक्ट्सवर ईमेलचे व्यवहार अवलंबून असतात. पण एखाद्या दिवशी या अँड्रेस बुकमधले कॉण्टॅक्ट्स गायब झाले, डीलीट झाले तर? समजा जीमेल उघडलं आणि आपल्या हाताशी कुणाचाच ईमेल आयडी नाही असं लक्षात आलं तर काय कराल?  पण होतं असं अनेकदा.
तुम्ही घरी बसून कुठला तरी महत्त्वाचा ईमेल करीत असता आणि अचानक घरातलं छोटं बाळ दुडूदुडू धावत येऊन किबोर्डवर जोरात थपडथपड करतं.  आणि तुम्ही काम करीत असलेले कॉण्टॅक्ट्स डीलीट होतात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अकाऊण्ट हॅकही होऊ शकतं. त्यात ते  तुमचे सारे  कॉण्टॅक्ट्स डीलीट करून टाकू शकतात. 
अशा वेळी करायचं काय?
घाबरू नका. त्याचं उत्तरंही जीमेल अकाऊण्टमधेच सापडू शकेल.  तुमचे जीमेल अकाऊंट कॉण्टॅक्ट्स बॅकप घेण्याचं काम नियमितपणे करीत असते. कॉण्टॅक्ट्स रिस्टोर करण्यासाठी जिमेलची पद्धतही अत्यंत सोपी आहे. जीमेलची अट फक्त एवढीच आहे की, कॉण्टॅक्ट्स डीलीट होऊन ३0 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले नसावेत.
बाकी, या अगदी सोप्या सहा स्टेप्समध्ये तुम्ही जिमेलचे कॉन्टॅक्ट रिस्टोर करू शकता. 
१) लॉगीन - तुमचा जीमेलचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून जीमेलला लॉगीन करा.
२) जीमेलला लॉगीन झाल्यानंतर वरच्या डाव्या बाजूला ¬ें्र’  असं लिहिलेलं असेल त्यावर क्लीक करा. 
 कॉण्टॅक्ट्स असा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा.
३) कॉण्टॅक्ट्सवर क्लीक केल्यानंतर मोअर वर क्लीक करा.
४) ‘मोअर’वर क्लीक केल्यानंतर रिस्टोर कॉण्टॅक्ट्सवर क्लीक करा.
५) यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. जसे की, तुमचे कॉण्टॅक्ट्स कधीपासून रिस्टोअर करायचे म्हणजे १0 मिनीटापूर्वीचे, एका तासापूर्वीचे, कालपासूनचे, एक आठवड्यापासून किंवा ३0 दिवस आधीपर्यंतचे.
यापैकी कुठलेही एक पर्याय निवडा.
६) रिस्टोअर बटण क्लिक केले की झाले.
 
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com
 

 

Web Title: RESTORE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.