लाल-निळं काजळ

By Admin | Updated: July 11, 2014 08:37 IST2014-07-10T17:47:48+5:302014-07-11T08:37:51+5:30

आय मेकप’ असा शब्द वापरला तर तमाम गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या वाटायला लागतात. भल्या सकाळी कॉलेजला किंवा पहिल्यावहिल्या नोकरीला जाताना कुणाला वेळ असतो असा ‘मेकप’ करत बसायला?

Red-blue | लाल-निळं काजळ

लाल-निळं काजळ

- मिनाक्षी कुलकर्णी
(विशेष सहाय्य - धनश्री संखे)
 
‘आय मेकप’ असा शब्द वापरला तर तमाम गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या वाटायला लागतात. भल्या सकाळी कॉलेजला किंवा पहिल्यावहिल्या नोकरीला जाताना कुणाला वेळ असतो असा ‘मेकप’ करत बसायला? त्यामुळे मेकपचं चक्कर सोडू आणि आपले डोळे अधिक सुंदर दिसतील, काही झटपट क्विक गोष्टी केल्या तर भन्नाट चमक येईल डोळ्यात असं काहीतरी करू.
तर ते कसं करायचं?
 
1) आयशॅडो वापरायची की नाही, वापरायची तर रोज वापरायची की ऑकेजनली. हा निर्णय फक्त तुमचा. कारण तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण, तुमची आवडनिवड याचा अंदाज घेऊन तुम्ही हा निर्णय घ्यायचा. पण आयश्ॉडो वापरणार असाल तर आपल्या स्किन टोनशी मॅच होणा:या न्यूड रंगाची शेड निवडावी. पीच, रोझ ब्राऊन, बेबी पिंक, वॉर्म ब्राऊन या शेड्सचा त्यात समावेश होतो. पावसाळ्य़ात जास्त गडद रंग वापरण्यापेक्षा हे नॅचरल रंग वापरण्यावर भर द्यावा.
2) काजळ खरंतर प्रत्येक डोळ्यात खासच दिसते. त्यामुळे तुमच्या चेह:यावर बाकी काही मेकप नसेल तरी काजळ वापरायला काहीच हरकत नाही. कधीही-कुठंही काजळ लावलं तरी ते शोभूनच दिसतं. पूर्वी काजळ म्हटलं की फक्त काळा हा एकच रंग समोर यायचा, पण आजकाल अनेकरंगी काजळ उपलब्ध आहेत. अगदी राखाडी, पांढ:यापासून ते निळ्य़ा- लालर्पयत. प्रत्येक ड्रेसला मॅचिंग होईल, असे काजळ आजकाल बाजारात सहज मिळू शकते. पण ते विकत घेताना दोन गोष्टी तपासणं फार महत्त्वाचं. एक म्हणजे त्याचा दर्जा आणि दुसरं म्हणजे ज्या रंगाचं काजळ आपण वापरतो तो रंग आपल्या स्किन टोनला सूट होतोय की नाही हे जरा तपासून पहावं.
3)  ज्यांचे डोळे छोटे आहेत त्यांनी पांढ:या रंगाचे काजळ लावल्यास डोळे  सुंदर व मोठे दिसण्यास मदत होते. 
4) ते लावल्यावर ते डिफाईन करण्यासाठी बाहेरच्या बाजूला कॉटन बड्सच्या सहाय्याने काळ्य़ा रंगाचे काजळ लावावे म्हणजे डोळे जास्त टप्पोरे दिसतात.
5) ज्यांचे डोळे मोठे आहेत त्यांनी डार्क ब्राऊन ते सेट ब्लॅकर्पयत कोणत्याही रंगाचे काजळ वापरले तरी सुंदरच दिसते.
6) सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आयलायनर आणि काजळ दोन्ही एकत्र लावणं टाळावं. आयलायनर लावणार असाल तर काजळ लावायची गरजच नाही.
7)  बाजारात  वॉटरप्रूफ काजळ उपलब्ध आहेत. शक्यतो तीच वापरावी. नाहीतर पावसात काजळ पसरतं आणि सगळा चेहराच भयाण दिसायला लागतो.
 
 
 

 

Web Title: Red-blue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.